Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World IVF Day: तिशीत केले जाणारे आयव्हीएफ आणि 40 वयातील आयव्हीएफमधील फरक

IVF ही आता बऱ्यापैकी सोपी प्रक्रिया झाली आहे. मात्र साधारण तिशीच्या वयात आणि 40 नंतर ही प्रक्रिया करताना काय फरक जाणवतो याबाबत आपण आज जाणून घेऊया. तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 25, 2025 | 02:51 PM
IVF कोणत्या वयात करणे योग्य (फोटो सौजन्य - iStock)

IVF कोणत्या वयात करणे योग्य (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हल्ली बहुतांश जोडपी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा पर्याय निवडताना पहायला मिळतात.  एककीकडे आयव्हीएफ अनेक जोडप्यांसाठी आशेचे किरण ठरत असताना दुसरीकडे वय हे त्या प्रक्रियेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) ही एक प्रक्रिया आहे जिथे स्त्रीबीज प्रयोगशाळेत शुक्राणूंनी फलित केली जातात आणि नंतर गर्भाशयात ठेवली जातात. यामुळे प्रजनन समस्यांना तोंड देणाऱ्या जोडप्यांना मूल होण्यास आणि पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. 

आयव्हीएफ विशेषतः अशा महिलांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्या फॅलोपियन ट्युब ब्लॉक झालेल्या आहेत, स्त्रीबीजांची संख्या आणि दर्जा खालावणे, पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस) किंवा वंध्यत्वासारख्या आजारांचे निदान झाले आहे. हे शुक्राणूंची संख्या  कमी असलेल्या पुरुषांकरिता देखील फायदेशीर ठरते. ज्या वयात स्त्री आयव्हीएफ करते त्यावर त्या प्रक्रियेचे यश  अवलंबून असते. डॉ. अश्विनी राठोड, सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ञ, अंकुरा महिला आणि बाल रुग्णालय, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

World IVF Day: आयव्हीएफला सुरुवात करण्याआधी मानसिक तयारी किती गरजेचे, तज्ज्ञांनी दिल्या खास टिप्स

जाणून घ्या फरक 

३० व्या वर्षी आयव्हीएफ: ज्या महिला ३० व्या वर्षी आयव्हीएफ करण्याचा पर्याय निवडतात त्यांना चांगले परिणाम मिळतात. या वयात स्त्रीबीज निरोगी असतात, हार्मोन्सची पातळी अधिक स्थिर असते आणि शरीर प्रजननासंबंधी औषधांना चांगला प्रतिसाद देखील देते. या वयात गर्भपात आणि अनुवांशिक समस्यांचा धोका देखील कमी असतो. सरासरी, या वयोगटात आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते.

४० व्या वर्षी  केले जाणारे आयव्हीएफ: या वयात आयव्हीएफ प्रक्रिया शक्य आहे, परंतु अनेक जोडप्यांसाछी ती आव्हानात्मक ठरु शकते. जेव्हा एखादी महिला चाळीशीत पोहोचते तेव्हा तिच्या अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्या वयानुसार कमी होते आणि गुणसूत्र विकृतींची शक्यता वाढते. अशावेळी अधिक आयव्हीएफ चक्रांची आवश्यकता भासू शकते आणि काही महिलांना दात्याच्या स्त्रीबीजांची आवश्यकता भासू शकते. या वयात गर्भपात आणि गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा धोका देखील जास्त असतो. तरीही, ४० व्या वर्षीच्या अनेक महिला योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाने गर्भधारणा साध्य करु शकतात.

महत्त्वाच्या टिप्स: 

आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी, अशा तज्ज्ञांना भेटणे आवश्यक आहे जे तुम्हाला प्रक्रियेबद्दल योग्य मार्गदर्शन करतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वरीत प्रजनन क्षमता मूल्यांकन करा, निरोगी वजन आणि योग्य जीवनशैली बाळगा, धूम्रपान, मद्यपान आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा, योग आणि ध्यान करून तणावावर मात करा, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात रहा, दररोज व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा आणि जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे टाळा. जर तुम्हाला डॉक्टरांनी शिफारस केली असेल तर आयव्हीएफ उपचार घेण्यास अजिबात संकोच बाळगू नका.

World IVF Day: आयव्हीएफ म्हणजे काय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली सविस्तर माहिती

Web Title: World ivf day 2025 what is the difference between ivf in your 30s and ivf in your 40s health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Health News
  • IVF
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
1

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान
2

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान

पुण्यात Dengue चा डंख! वर्षभरात तब्बल ‘इतके’ संशयित रुग्ण; महापालिका हायअलर्टवर…
3

पुण्यात Dengue चा डंख! वर्षभरात तब्बल ‘इतके’ संशयित रुग्ण; महापालिका हायअलर्टवर…

अरेच्चा! पहिले दिला मुलाला जन्म, 5 दिवसांनी 3 नव्या बाळांना जन्म, Multiple Pregnancy म्हणजे काय? किती जोखमीचे
4

अरेच्चा! पहिले दिला मुलाला जन्म, 5 दिवसांनी 3 नव्या बाळांना जन्म, Multiple Pregnancy म्हणजे काय? किती जोखमीचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.