स्ट्रोकची धोक्याची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित; आपत्कालीन उपचार घेण्यास विलंब न करण्याचे डॉक्टरांचे आवाहन
World Stroke Day: अचानक चक्कर येणे, बोलताना अडचण येणे किंवा एका हातात अशक्तपणा जाणवणे, ही लक्षणे सुरुवातीला फार गंभीर वाटतीलच असे नाही. अनेकदा लोक याकडे थकवा, वेळेवर जेवण न होणे किंवा थोड्या विश्रांतीची गरज म्हणून पाहतात. मात्र, ही लक्षणे अचानक दिसून आल्यास ती स्ट्रोकची (मेंदूचा झटका) संकेत असू शकतात. स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असून, उपचारासाठी गेलेला प्रत्येक क्षण रुग्णाच्या बरे होण्याच्या शक्यतेवर परिणाम करू शकतो.(फोटो सौजन्य – istock)
“स्ट्रोकच्या उपचारांमध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरुवातीची धोक्याची लक्षणे वेळेत ओळखता येत नाहीत. लक्षणे आपोआप कमी होतील, या अपेक्षेने ते वाट पाहतात, घरगुती उपाय करून पाहतात किंवा रुग्णालयात जाणे पुढे ढकलतात. मात्र, या विलंबामुळे वेळेत उपचार मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते आणि कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका वाढू शकतो,” असे डॉ. इशांत रेगे, Consultant, Neurosurgery and Neurointervention, Apollo Hospitals, Pune, सांगतात.

स्ट्रोकची धोक्याची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित; आपत्कालीन उपचार घेण्यास विलंब न करण्याचे डॉक्टरांचे आवाहन
मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यास स्ट्रोक येऊ शकतो. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होऊ लागते. मेंदूचा कोणता भाग प्रभावित झाला आहे, यानुसार रुग्णाला हालचाल करणे, बोलणे, दिसणे, शरीराचा समतोल राखणे किंवा गोष्टी समजून घेणे यामध्ये अडचणी येऊ शकतात.
चेहरा एका बाजूला वाकणे: हसताना चेहऱ्याची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा वेगळी किंवा खाली झुकलेली दिसू शकते.
हातात अशक्तपणा किंवा बधिरपणा: अचानक एका हातात अशक्तपणा जाणवू शकतो किंवा हात वर उचलणे कठीण होऊ शकते.
बोलण्यात अडचण: बोलताना शब्द अस्पष्ट होणे, बोलणे अडखळणे किंवा इतरांचे बोलणे समजण्यात अडचण येणे.
अचानक दृष्टीत बदल: अंधुक दिसणे किंवा पाहण्यात अडचण येणे.
शरीराचा समतोल बिघडणे: अचानक चक्कर येणे, चालताना अडचण येणे किंवा शरीराचा समन्वय बिघडणे.
तीव्र डोकेदुखी: कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक आणि असह्य डोकेदुखी होणे हेही धोक्याचे लक्षण असू शकते.
“स्ट्रोकची लक्षणे वेदना न होताही दिसू शकतात, त्यामुळे अनेकदा लोक परिस्थितीचे गांभीर्य ओळखत नाहीत. काही मिनिटांत लक्षणे नाहीशी झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA) म्हणजेच तात्पुरता स्ट्रोक किंवा ‘मिनी स्ट्रोक’ याची असू शकतात. अशा परिस्थितीतही तातडीने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे,” असे डॉ. रेगे स्पष्ट करतात.स्ट्रोकची लक्षणे नेहमीच तीव्र स्वरूपात दिसतील असे नाही. काही वेळा त्यांचा थकवा, अशक्तपणा किंवा तात्पुरती शारीरिक समस्या म्हणून गैरसमज होऊ शकतो.
स्ट्रोकवरील उपचार त्याचा प्रकार, लक्षणे सुरू झाल्याची वेळ आणि रुग्णाची प्रकृती यावर अवलंबून असतात. काही उपचार ठरावीक कालमर्यादेतच देता येत असल्याने रुग्णाला लवकर रुग्णालयात नेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लक्षणे कमी होण्याची वाट न पाहता तातडीने रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधावा.
लक्षणे नेमकी कधी सुरू झाली किंवा रुग्ण शेवटचा सामान्य अवस्थेत कधी दिसला, याची वेळ नोंदवून ठेवावी.
घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये किंवा वैद्यकीय मदतीशिवाय लक्षणांवर उपचार करण्याचा प्रयत्न करू नये.
Ans: मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा थांबला किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव झाला, तर स्ट्रोक येऊ शकतो.
Ans: चेहरा एका बाजूला वाकणे, एका हातात किंवा पायात अचानक अशक्तपणा जाणवणे, बोलताना अडखळणे किंवा बोललेले समजण्यास त्रास होणे, अचानक दृष्टी कमी होणे, तोल जाणे आणि तीव्र डोकेदुखी ही स्ट्रोकची संभाव्य लक्षणे आहेत.
Ans: उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल, धूम्रपान, हृदयाचे काही आजार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढते वय यांमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.






