Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारातील महागडे Toner वापरण्याची भासणार नाही आवश्यकता! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा स्वस्तात मस्त होममेड टोनर

चेहऱ्यावरील ओलेपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांपासून टोनर बनवावे. यामुळे त्वचा हायड्रेट राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 20, 2025 | 01:42 PM
बाजारातील महागडे Toner वापरण्याची भासणार नाही आवश्यकता! 'या' पद्धतीने घरीच तयार करा स्वस्तात मस्त होममेड टोनर

बाजारातील महागडे Toner वापरण्याची भासणार नाही आवश्यकता! 'या' पद्धतीने घरीच तयार करा स्वस्तात मस्त होममेड टोनर

Follow Us
Close
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कायमच हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. थंड वारे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी मेकअप करण्याआधी टोनर लावले जाते. टोनर लावल्यामुळे त्वचेवर ओपन पॉर्स बंद होतात आणि त्वचा घट्ट राहते. पण त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच बाजारातील महागड्या स्किन केअरचा आणि टोनरचा वापर केला जातो. बाजारात मिळणाऱ्या टोनर आणि इतर प्रॉडक्टमध्ये केमिकलयुक्त घटक वापरले जातात, ज्यामुळे काहीकाळ त्वचा चांगली दिसते. पण कालांतराने त्वचेमध्ये अनेक बदल दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील कोरडेपणा कायमचा होईल नष्ट! स्वयंपाक घरातील ‘या’ नॅचरल पदार्थांचा केल्यास त्वचेवर येईल काचेसारखी चमक

ग्रीन टीपासून टोनर:

सकाळी उठल्यानंतर अनेकांना ग्रीन टी पिण्याची सवय असते. ग्रीन टी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. ग्रीन टी मध्ये असलेले घटक संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहेत. ग्रीन टी टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ग्रीन टी टाकून काहीवेळ उकळवा. त्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करा. तयार केलेले पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. दिवसभरातून दोन ते तीन वेळा टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचेवर ताजेपणा जाणवेल आणि त्वचेवरील पोअर्स टाइट होण्यास मदत होईल.

कोरफड जेल टोनर:

बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे टोनर उपलब्ध आहेत. पण केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, २ चमचे कोरफड जेल पाण्यात मिक्स करा. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर नियमित लावल्यास त्वचा कायमच हायड्रेट राहील. याशिवाय चेहऱ्यावर ताजेपणा टिकून राहील. कोरफड टोनर त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.

एका रात्रीत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! ‘या’ पद्धतीने करा तुळशीच्या पानांचा वापर, त्वचा राहील कायमच तुकतुकीत

गुलाबपाणी काकडी टोनर:

बऱ्याचदा चेहऱ्यावर जळजळ किंवा लालसरपणा वाढू लागतो. चेहऱ्यावर वाढलेला लालसरपणा कमी करण्यासाठी काकडी आणि गुलाब पाण्याचा वापर करून बनवलेले टोनर वापरावे. यासाठी काकडीच्या रसात गुलाब पाणी मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. सकाळ संध्याकाळ नियमित चेहऱ्यावर टोनर स्प्रे करा. काकडीमुळे त्वचेमधील उष्णता कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: You wont need to use expensive toners from the market prepare a great homemade toner at home inexpensively using this method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक
1

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
2

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार
3

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर
4

सप्तपदीच्या नऊवारी साडीवर शिवून घ्या आरी वर्क केलेले लेटेस्ट डिझाईन ब्लाऊज, नवरीच्या साज शृंगारात पडेल भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.