चेहऱ्यावरील कोरडेपणा कायमचा होईल नष्ट! स्वयंपाक घरातील 'या' नॅचरल पदार्थांचा केल्यास त्वचेवर येईल काचेसारखी चमक
थंड वातावरणामुळे त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. सतत बदलणारे वातवरण, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी आणि टॅन झाल्यासारखी दिसते. चेहऱ्यावर पांढरेपणा दिसणे, लाल रॅश, लालसरपणा, त्वचेला खाज येणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. तरीसुद्धा फारसा बदल दिसून येत नाही. वारंवार स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे उतार वयात त्वचेच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि त्वचा खूप जास्त कोरडी होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय अतिशय प्रभावी ठरतील. (फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात बेडरूम ठेवा उबदार! आजारीही पडणार नाहीत आणि होईल थंडीपासून बचाव
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच स्त्रिया खोबऱ्याच्या तेलाचा वापर करतात. खोबऱ्याचे तेल त्वचा आणि केसांवर लावले जाते. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल आणि ग्लिसरीन मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण मिक्स झाल्यानंतर रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावून सकाळी उठल्यानंतर धुवून टाका. यामुळे डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग कमी होण्यासोबतच त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल. आठवडाभर नियमित खोबऱ्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास साकारात्मक परिणाम दिसून येतील.
थंडीच्या दिवसांमध्ये काहींची त्वचा अतिशय कोरडी होऊन जाते. अशावेळी कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी दह्याचा वापर करावा. वाटीमध्ये दही घेऊन व्यवस्थित मिक्स करून पातळ करावे. त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण चेहर्यावर दही लावून घ्या. काहीवेळ ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरडफ जेलचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल आणि मध मिक्स करून घ्या. तयार केलेली फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मधामध्ये असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-एजिंग गुणधर्म त्वचा नैसर्गिकरित्या मऊ आणि मुलायम ठेवण्यास मदत करते.






