एका रात्रीत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! 'या' पद्धतीने करा तुळशीच्या पानांचा वापर
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. स्किन केअर, डाएट, भरपूर पाण्याचे सेवन, पौष्टिक आहार इत्यादी अनेक गोष्टी कायमच फॉलो केल्या जातात. पण जीवनशैलीत होणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, डेड स्किन, टॅनिंग, बारीक मुरूम येऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. यासोबतच चेहऱ्यावर पिगमेंटेशन, ऍक्ने, गालांवर ओपन पोअर्स मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर किंवा ट्रीटमेंट करून घेतात. स्किन ट्रीटमेंट केल्यानंतर त्वचा काहीकाळ अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण वय वाढल्यानंतर त्वचेसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. (फोटो सौजन्य – istock)
धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचेवर खूप जास्त घाण आणि डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे फोड येतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा कशा पद्धतीने वापर करावा, याबदलं सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुळशीच्या पानांचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि तुम्ही कायमच सुंदर दिसाल. तुळशीच्या पानांमध्ये असलेले आयुर्वेदिक घटक त्वचेची गुणवत्ता सुधारतात.
कमी वयात चेहऱ्यावर आलेले ओपन पोअर्स कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करावा. यासाठी एका टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे. पाणी गरम झाल्यानंतर त्यात तुळशीची ८ ते १० पाने बारीक करून टाकावी. त्यानंतर पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करून घ्या. थंड झालेल्या पाण्यात एक चमचा गुलाब पाणी घालून पाणी गाळून घ्या. तयार केलेले पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर नियमित स्प्रे करा. दिवसभरात दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर तुळशीच्या पानांचा स्प्रे मारल्यास ओपन पोअर्स कमी होऊन त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल.
दैनंदिन आहारात सतत तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे त्वचेवर सतत पिंपल्स आणि मुरुमांचे फोड येतात. काहीवेळ पिंपल्समधून रक्त सुद्धा येते. अशावेळी कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी तुळशीच्या पानांचा रस काढून चेहऱ्यावर लावून ठेवा. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर तुळशीच्या पानांचा रस लावून काहीवेळानंतर धुवून टाका. यामुळे पिंपल्स नष्ट होतील. तसेच पिंपल्समध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल.






