Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओवा, मेथी दाणे आणि बडीशेपपासून तयार केलेले पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालू राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 08:19 AM
महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा 'या' पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Follow Us
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
ओवा आणि मेथी दाण्यांचे फायदे?
वजन वाढण्याची कारणे?

वाढलेले वजन, लठ्ठपणा, मधुमेह, खराब कोलेस्ट्रॉल इत्यादी अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. वजन वाढलेल्या ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी महागडा डाएट घेतला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे सप्लिमेंट्स, गोळ्या औषध घेऊन वजन कमी केले जाते. याशिवाय अनेक लोक वजन कमी करण्यासाठी तासनतास उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात थकवा, अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडून जाते. अनेक वेगवेगळे उपाय करून सुद्धा वजन कमी न झाल्यास महिलांसह पुरुषसुद्धा वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतात. यामुळे झपाट्याने वजन कमी होते पण वाढत्या वयात शरीराला गंभीर हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोणत्या पेयाचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

चमकदार दातांसाठी महागड्या ट्रीटमेंट करत असाल तर थांबा! ‘हा’ घरगुती उपाय केल्यास दातांवरील पिवळेपणा कायमचा होईल नष्ट

वजन कमी करण्यासाठी सोपे उपाय:

वजन कमी करण्यासाठी कायमच महागड्या सप्लिमेंट्स आणि गोळ्यांची आवश्यकता नाही. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात जिरं, ओवा आणि मेथी दाणे घालून भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून उकळवून घ्या. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी हलकेसे कोमट करा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी हे पेय फार गुणकारी ठरेल. या दाण्यांमध्ये असलेल्या घटकांमुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. महिनाभर नियमित पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी हे पेय खूप जास्त फायदेशीर ठरेल.

सकाळी उठल्यानंतर अर्धा तास चालणे फार आवश्यक आहे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. अर्धा तास चालणे शक्य न झाल्यास किमान १५ मिनिटं चालावे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच शरीराला अनेक फायदे सुद्धा होतील.

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

चालून आल्यानंतर नियमित ग्रीन टी प्यावी. ग्रीन टी प्यायल्यानंतर पोटभर नाश्ता करावा. ग्रीन टी च्या सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. वजन होईपर्यंत महिनाभर नियमित हे रुटीन चालू ठेवल्यास पोटावर वाढलेली चरबी जळून जाईल. याशिवाय दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. पोळी, भाकरी या पदार्थांवर नियंत्रण ठेवून आहारात भाज्या, सलाड, कडधान्य खाण्यावर जास्त भर द्यावा. तसेच वजन कमी करण्यासाठी जंक फूड पूर्णपणे बंद करावे. चहा, कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी पेय घेणे फायदेशीर आहे का?

    Ans: सकाळी योग्य पेय घेतल्याने शरीराला हायड्रेशन मिळू शकते आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र केवळ एका पेयामुळे वजन कमी होत नाही.

  • Que: वजन कमी करण्यासाठी कोणते पेय उपाशीपोटी घेता येते?

    Ans: कोमट पाणी, साखर नसलेले काही हर्बल पेय किंवा इतर पौष्टिक पेये आहाराचा भाग म्हणून घेता येऊ शकतात.

  • Que: उपाशीपोटी पेय घेतल्याने पचनक्रिया सुधारते का?

    Ans: पुरेसे द्रवपदार्थ घेतल्याने शरीर हायड्रेट राहते आणि काही लोकांमध्ये पचनक्रियेला मदत होऊ शकते.

Web Title: Your clothes will become loose within a month consume this drink on an empty stomach to lose weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 08:19 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
1

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
2

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
3

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.