Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा ‘ही’ घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी महागड्या केमिकल युक्त क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती क्रीम लावावी. यामुळे त्वचेवरील नॅचरल ग्लो पुन्हा येतो आणि डोळ्यांवरील काळे डाग कमी होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2026 | 09:44 AM
डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा 'ही' घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

डार्क सर्कल्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग रात्री झोपताना लावा 'ही' घरगुती क्रीम, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, रात्रभर जागरण किंवा उशिरा झोप, मोबाईलचा अतिवापर, तासनतास स्किन समोर बसून राहणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. यामुळे डोळ्यांखाली काळे डाग येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज दिसू लागते. डार्क सर्कल्स आल्यामुळे काहीवेळा आजारी असल्यासारखे वाटते. कारण त्वचेवरील ग्लो पूर्णपणे नाहीसा होतो. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. फेसपॅक, आयक्रीम, सीरम, फेस क्रीम यासोबतच महागड्या स्किन ट्रीटमेंट आणि डार्क सर्कल्स घालवण्यासाठी ट्रीटमेंट केल्या जातात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर करणे त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी घरगुती क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. महिनाभर नियमित क्रीम लावल्यास फरक दिसून येईल.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात का वाढतो Fungal Infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

घरगुती फेसक्रीम बनवण्याची सोपी पद्धत:

क्रीम तयार करण्यासाठी मोठ्या बाऊलमध्ये बटाट्याचा रस, विटामिन ई कँप्सूल, ऑलिव्ह ऑईल आणि कोरफड जेल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेली क्रीम व्यवस्थित फेटून झाल्यानंतर तिचा रंग हलकासा बदलेल. तयार केलेली क्रीम हवाबंद डब्यात भरून ठेवा. जेणेकरून लवकर खराब होणार नाही. तयार केलेली क्रीम फ्रिजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहते. लवकर खराब होत नाही.

रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर डोळ्यांखाली क्रीम लावून १ ते २ मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे डोळ्यांखालील त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि पेशींची गुणवत्ता सुधारेल. हा उपाय नियमित केल्यास २ आठवड्यांमध्ये फरक दिसून येईल. क्रिममध्ये बटाट्याचा रस वापरल्यामुळे काळेपणा कमी होण्यास मदत होईल. एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस तयार केलेली क्रीम वापरू नये.

आठवडाभरात चेहऱ्यावरील डाग होतील कायमचे गायब! कच्च्या दुधाचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी करण्यासाठी केवळ महागड्या क्रीमच नाहीतर आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. रोजच्या आहारात विटामिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. नियमित टोमॅटो, पालक, गाजर आणि विटामिन सी युक्त फळांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि इतर थंड पेय प्यावी. ताक, दूध, लस्सी इत्यादींमुळे पचनक्रिया निरोगी राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डार्क सर्कल्स का होतात?

    Ans: झोपेची कमतरता, ताण, आनुवंशिकता, वाढते वय, त्वचेतील कोलेजन कमी होणे, अॅलर्जी, डिहायड्रेशन आणि काही आरोग्य समस्या यांमुळे डार्क सर्कल्स दिसू शकतात.

  • Que: घरगुती क्रीम लावल्याने डार्क सर्कल्स पूर्णपणे नाहीसे होतात का?

    Ans: नाही. कोणतेही घरगुती क्रीम डार्क सर्कल्स पूर्णपणे घालवेल याची खात्री देता येत नाही. काही नैसर्गिक घटक त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि तात्पुरता तजेला देण्यास मदत करू शकतात, पण परिणाम व्यक्तीनुसार वेगळे असतात.

  • Que: डोळ्यांखाली कोणते नैसर्गिक घटक वापरू शकतात?

    Ans: अॅलोवेरा जेल, बदाम तेल, काकडीचा रस किंवा गुलाबपाणी यांसारखे काही सौम्य घटक वापरले जातात. मात्र डोळ्यांच्या संवेदनशील भागावर कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी आणि जळजळ झाल्यास वापर थांबवावा.

Web Title: Your skin become dull due to dark circles then apply this homemade cream before going to bed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • skin problem

संबंधित बातम्या

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
1

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
2

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
3

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.