आठवडाभरात चेहऱ्यावरील डाग होतील कायमचे गायब! कच्च्या दुधाचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो
कामाच्या धावपळीमधून त्वचेची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. कायमच त्वचेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे पिंपल्स, काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्या सुद्धा वाढू लागतात. त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे चेहरा पूर्णपणे निस्तेज होतो. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या फेस सीरम किंवा फेस मास्कचा वापर केला जातो. पण यामुळे काहीकाळ त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालांतराने त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे वारंवार चेहऱ्यावर केमिकल प्रॉडक्ट किंवा क्रीम लावू नये. यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला कच्च्या दुधाचा वापर करून फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
कच्च्या दुधाचा वापर केल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करू नये. मिल्क फेशिअल करण्यासाठी सर्वप्रथम, त्वचा क्लिंझिंग करणे फार आवश्यक आहे. यासाठी फ्रिजमध्ये ठेवलेले थंडगार दूध घ्यावे. त्यानंतर दुधात हळद मिक्स करून घ्या. कॉटनच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेले मिल्क लावून त्वचेवर लावा आणि त्वचा व्यवस्थित स्वच्छ करा. हळद आणि दूध त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते.
दुसऱ्या स्टेपमध्ये त्वचा स्क्रबिंग करून घ्यावी. चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि डेड स्किन घालवण्यासाठी स्क्रब करणे फार आवश्यक आहे. यासाठी वाटीमध्ये कच्चे दूध आणि तांदळाचे पीठ एकत्र मिक्स करून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि हातांना पाणी लावून हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
तिसऱ्या स्टेपमध्ये त्वचेला ५ ते ७ मिनिटे मसाज द्यावा. यामुळे त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यासाठी कोरफड जेल आणि कच्चे दूध एकत्र मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेच्या पेशी सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर चौथ्या स्टेपला फेसपॅक लावावा. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, बेसन आणि गव्हाचं पीठ एकत्र करून त्यात कच्चे दूध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून ठेवा आणि थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. फेसपॅक लावून त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉईश्चराईज लावणे फार आवश्यक आहे. यामुळे त्वचेमध्ये बदल दिसून येईल.
Ans: कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक अॅसिडसारखे घटक असतात, जे त्वचेवरील मृत पेशी हलक्या प्रमाणात दूर करण्यास मदत करू शकतात. मात्र याचे परिणाम प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगवेगळे असू शकतात.
Ans: संवेदनशील किंवा मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेवर कच्चे दूध वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा जळजळ झाल्यास वापर थांबवून त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Ans: सामान्यतः आठवड्यातून एकदाच घरगुती फेशिअल करणे पुरेसे असते. अतिप्रमाणात स्क्रब किंवा फेशिअल केल्यास त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कमी होऊ शकते.






