Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Live Updates Today:  शरद पवारांचे खासदार आज पंतप्रधान मोदींच्या भेटीला 

Maharashtra Breaking: खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत या भेटीबाबत माहिती दिली आहे. दिल्लीतील या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या असल्या, तरी आमदार रोहित पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 10, 2026 | 09:50 AM
LIVE
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 10 Aug 2026 09:50 AM (IST)

    10 Aug 2026 09:50 AM (IST)

    आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का?

    भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना आज आठवड्याच्या सुरुवातीलााच धक्का बसणार आहे. आज १० ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडने देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा १२ अंकांनी अधिक, सुमारे २४,६६७ अंकांवर व्यवहार करत होता.

  • 10 Aug 2026 09:40 AM (IST)

    10 Aug 2026 09:40 AM (IST)

    सोन्याच्या दरात किंचित घसरण

    भारतात 10 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,234 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,964 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,425 रुपये आहे. भारतात 10 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,39,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,52,340 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,250 रुपये आहे. भारतात 10 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 244.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,44,900 रुपये आहे.

  • 10 Aug 2026 09:30 AM (IST)

    10 Aug 2026 09:30 AM (IST)

    Sarfaraz Khan Team India Return: सरफराज खानचे भारतीय संघात पुनरागमन 

    Sarfaraz Khan Team India Return:   मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान याचे भारतीय कसोटी संघात तब्बल पावणेदोन वर्षांनंतर धमाकेदार पुनरागमन झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुखापतग्रस्त/बाहेर पडलेल्या साई सुदर्शनच्या जागी सरफराज खान याचा श्रीलंका दौऱ्यासाठी संघात समावेश केला आहे. २८ वर्षीय सरफराज खानने भारतासाठी आपला शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये खेळला होता. भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून त्यांनी नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात श्रीलंका एकादशचा पराभव केला आहे. आता भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी गॉलकडे रवाना होणार आहे.

  • 10 Aug 2026 09:21 AM (IST)

    10 Aug 2026 09:21 AM (IST)

    Maharashtra Teacher Recruitment: 'पवित्र' पोर्टलवर तांत्रिक अडचणींचा खोळंबा 

    Maharashtra Teacher Recruitment:  १५ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पवित्र पोर्टल सुरू झाले. पण  शिक्षक भरती प्रक्रियेत  उमेदवारांना पुन्हा एकदा मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम (Preference Selection) नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण  सर्व्हरवरील प्रचंड ताणामुळे उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

    अनेक उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विषय आणि पदांचे पसंतीक्रम पोर्टलवर दाखवले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

    पोर्टलवर आवश्यक माहिती आणि पर्याय व्यवस्थित लोडिंग होत नसल्याने अर्ज प्रक्रियेत अडथळा येत आहे.

    वेबसाईटवर एकाच वेळी प्रचंड ट्रॅफिक आल्यामुळे लॉगिन आणि व्हेrification साठी लागणारा ओटीपी मिळण्यास मोठा विलंब होत आहे.

  • 10 Aug 2026 09:14 AM (IST)

    10 Aug 2026 09:14 AM (IST)

    Maharashtra Weather Update: १३ ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता 

    Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून  पावसाने विश्रांती घेतली आहे,  तरी लवकरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला असून, परिणामी १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

    हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ ऑगस्टपासून विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाची स्थिती समाधानकारक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, आगामी काही दिवस नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 10 Aug 2026 09:07 AM (IST)

    10 Aug 2026 09:07 AM (IST)

    E20 Fuel Controversy: 'शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येते का? भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

    E20 Fuel Controversy:  पुढील वर्षापासून देशातील वाहने २० टक्के इथेनॉल मिश्रित (E-20) पेट्रोलवर चालवण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेवरून देशभरात संतापाची लाट आहे. असे असतानाच भाजपच्या एका बड्या खासदाराने वादग्रस्त विधान केले आहे. "शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येते का?" असे म्हणत मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर थेट आणि अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.

  • 10 Aug 2026 09:00 AM (IST)

    10 Aug 2026 09:00 AM (IST)

    NCP Internal Conflict: सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद घटनाबाह्य? नियुक्तीविरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार

    NCP Internal Conflict:   अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत गटबाजी आणि नाराजी सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील अनेक नेते आधीपासूनच नाराज असल्याची चर्चा आहे. यानंतर थेट सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदालाच पक्षातून अधिकृत आव्हान देण्यात आले आहे.  तटकरे यांची नियुक्ती बेकायदेशीर व घटनाबाह्य असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ECI) तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार जालन्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी केली आहे. पक्षाच्या घटनेतील नियमांचे उल्लंघन करून आणि योग्य निवडणूक प्रक्रिया न राबवता सुनील तटकरे यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे गोरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

  • 10 Aug 2026 08:50 AM (IST)

    10 Aug 2026 08:50 AM (IST)

    Defense Sector Orders: भारतीय संरक्षण कंपन्यांना २.६ लाख कोटींची कामे 

    Defense Sector Orders:   संरक्षण क्षेत्रात भारत सध्या अभूतपूर्व आणि धमाकेदार कामगिरी करत असून, देशातील संरक्षण उत्पादक कंपन्यांना ऐतिहासिक ऑर्डर मिळाल्याची माहिती आहे. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील ९ प्रमुख सरकारी संरक्षण कंपन्यांकडे तब्बल ५ लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.  या यादीत सरकारी मालकीची 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' (HAL) ही कंपनी अव्वल स्थानी असून, एकट्या HAL कडे २,६०,९६० कोटी रुपयांच्या भव्य ऑर्डर  देण्यात आल्याआहेत.  यामध्ये भारतीय हवाई दल आणि नौदलासाठी नवीन लढाऊ विमाने तयार करणे, सध्याच्या विमानांची देखभाल-दुरुस्ती (MRO) करणे आणि विविध हेलिकॉप्टरची निर्मिती करणे यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

Delimitation Bill: शरद पवारांचे खासदार आज पंतप्रधान मोदींच्या भेटीला 

 संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा आठवडा सुरू होत असून, या काळात अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर असणार आहे. संसदेत नव्याने सादर होणाऱ्या बहुचर्चित ‘डीलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत या भेटीबाबत माहिती दिली आहे.

 

 

Web Title: 10 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime national international student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यात अचानक गोंधळ! कारवर दगडफेक, ‘चोर-चोर’च्या घोषणा
1

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यात अचानक गोंधळ! कारवर दगडफेक, ‘चोर-चोर’च्या घोषणा

Har Ghar Tiranga: संबलपूरमध्ये तिरंग्याची लाट! धर्मेंद्र प्रधानांच्या नेतृत्वात जमला जनसागर; दृश्य पाहून थक्क व्हाल
2

Har Ghar Tiranga: संबलपूरमध्ये तिरंग्याची लाट! धर्मेंद्र प्रधानांच्या नेतृत्वात जमला जनसागर; दृश्य पाहून थक्क व्हाल

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप
3

Crime News: ऑनलाइन मैत्री… मग गुप्त माहितीचा खेळ! हवाई दलाच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप

१६२ किमी ताशी वाऱ्यांचा तडाखा! महाभयंकर चक्रीवादळाची धडक; विमानसेवाही ठप्प
4

१६२ किमी ताशी वाऱ्यांचा तडाखा! महाभयंकर चक्रीवादळाची धडक; विमानसेवाही ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.