नांदेड : सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. आज एकनाथ शिंदे बंडाळी गटाचा पाचवा दिवस आहे. त्यामुळंराज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. तर तिकडे शिंदे गटानी आपल्या गटाचे ‘शिवसेना बाळासाहेब गट’ (Shivsena balasaheb Group) असे नाव ठेवले आहे. तसेच त्यांचे नेतेपद व काही आमदारांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता शिंदे गटाने सर्वोच्य न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. याचा परिणाम राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींवर होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात बैठकीचं (Shivsena, congress, and NCP Meeting) जोरदार सत्रं सुरु आहे.
[read_also content=”पक्षात सर्वाधिकार उद्धव ठाकरेंना, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/strict-action-against-those-who-are-dishonest-with-shiv-sena-all-rights-in-the-party-to-uddhav-thackeray-296891.html”]
दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबरोबर (Shivsena MLA) शिवसेनेचे काही खासदार सुद्धा बंडाच्या तयारीत असल्याचं नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (BJP Nanded MP Pratap patil Chikhlikar) यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे 18 पैकी 10 खासदारही आमदारांप्रमाणे बंड करण्याच्या तयारीत असल्याचा दावा चिखलीकर यांनी केलाय. बालाजी कल्याणकर (Balaji kalyankar) यांच्या घरावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे कल्याणकर यांना घाबरण्याची गरज नाही. वर्तमानपत्रात फोटो झळकण्यासाठी जे जिल्हाप्रमुख एकनिष्ठतेची आव आणत आहेत. बाकी काही नाही अशी टिका सुद्धा चिखलीकरांनी केली आहे. आमदार कल्याणकर हे शिवसेना- भाजप युतीचे आमदार आहेत. त्यामुळे आमदार कल्याणकर यांच्या पाठीशी आम्ही उभे असून त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, चिखलीकरांनी म्हटलं आहे.