Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढयात १२ घरफोड्या उघड, १३ लाख ५० हजारांचा मुद्दमाल जप्त; दोघे चोरटे जेरबंद

मंगळवेढा शहरात भर दिवसा बंद घरे फोडीची मालिका सुरु असल्याने चोरटयांना जेरबंद करणे स्थानिक पोलिसांना आव्हान होते. दरम्यान हे आव्हान डीवायएसपी राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी स्विकारून कर्तबगार पोलिसांची टिम तयार करून दोघांना जेरबंद केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2023 | 02:09 PM
मंगळवेढयात १२ घरफोड्या उघड, १३ लाख ५० हजारांचा मुद्दमाल जप्त; दोघे चोरटे जेरबंद
Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : मंगळवेढा शहरात भर दिवसा बंद घरे फोडीची मालिका सुरु असल्याने चोरटयांना जेरबंद करणे स्थानिक पोलिसांना आव्हान होते. दरम्यान हे आव्हान डीवायएसपी राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी स्विकारून कर्तबगार पोलिसांची टिम तयार करून १२ घरफोडया व २ मोटर सायकली चोरीचे गुन्हे सीसीटिव्ही कॅमेराच्या माध्यमातून उघड करून शिक्षण घेण्याच्या वयात चोऱ्या करणाऱ्या प्रदिप धनाजी हेंबाडे (वय २०, ढवळस रोड) व अजित बिरू मेटकरी (वय २३, धर्मगांव रोड, मंगळवेढा) यांना जेरबंद करण्यात यश आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवेढा शहरामध्ये रात्रीच्या ऐवजी भर दिवसा बंद घरे टार्गेट करून हातोहात लोकांच्या नजरा चुकवून बंगले फोडण्याची मालिका सुरु होती. भर दिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले होते. वृत्ताची दखल घेवून पोलीस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाली विशेष क्राईम कामगिरी करणाऱ्या पोलिसांची टिम तयार करून रेकॉर्डवरील गुन्हे चेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रिक विश्‍लेषणाव्दारे तपास करणे, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, अकलूज, सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील अन्य गुन्हेगार व परराज्यातील गुन्हेगारांचा अभ्यास करीत असताना मंगळवेढा शहरात संशयितरित्या वरील दोन आरोपी सातत्याने गल्लीबोळातून फिरत असल्याचे पोलिस पथकांच्या निदर्शनास आले.

व्यवसायिकाकडून फुटेज हस्तगत

याचा कायदेशीर आधार घेण्यासाठी मित्रनगर परिसरातील एका व्यवसायिकाकडून फुटेज हस्तगत केले व याची तपासणी केली असता वरील संशयित आरोपी हे सातत्याने गल्ली बोळातून रेकी करीत असल्याचे निदर्शनास येताच त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवून बोलते केले असता चौकशीत १२ घरफोडया व २ मोटर सायकलची चोरी केल्याची कबुली दिली. या चोऱ्या जानेवारी महिन्यापासून सायंकाळी ६ ते रात्री ८ च्या दरम्यान व भर दुपारीही शिक्षक कॉलनी, मित्र नगर, वनराई कॉलनी, सप्तश्रृंगी नगर, चैतन्य कॉलनी, बनशंकर कॉलनी तसेच ग्रामीण भागात झाल्या होत्या. यापुर्वी पोलिसांनी जुने दरोडयातील चोरटेही जेरबंद केले होते. मात्र भर दिवसा होणाऱ्या बंगले फोडतील चोरटे पकडणे पोलिसांना एक आव्हान ठरल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला होता. या तपासात चोरटयांकडून १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे २५ तोळयाचे सोन्याचे दागिने,१ लाख रूपये किमतीच्या दोन मोटर सायकली असा एकूण १३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी चोरटयाकडून हस्तगत केला आहे.

ही कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी राजश्री पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुहास जगताप, पोलिस निरिक्षक रणजित माने, स.पो.नि.अंकुश वाघमोडे,सत्यजीत आवटे, हजरत पठाण, दयानंद हेंबाडे, पोलिस नाईक सुनिल मोरे, पोलिस शिपाई अजित मिसाळ, अजय शिंदे, हंडप्पा हत्ताळे,कैलास खटकळे, सायबर कडील युसूफ पठाण यांनी या कामी परिश्रम घेतले.

Web Title: 12 house burglaries revealed in mangalvedha 13 lakh 50 thousand seized both thieves jailed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2023 | 02:09 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Mangalvedha
  • Mangalwedha

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.