File Photo : Physical Harassment
वडगाव मावळ : चॉकलेटचे आमिष दाखवून एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape on Minor Girl) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी (दि.9) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
दिलशाद अलाम खान (रा. माळीनगर वडगाव, मावळ, जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला जबरदस्तीने दुकानात घेऊन जाऊन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते करत आहेत.