Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: मान्सून अरबी समुद्रातच खोळंबला: अफगाणिस्तानच्या वाऱ्याचा अडथळा

Maharashtra Breaking News- हवामान तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या विरोधी वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या कोरड्या आणि गतिरोधक वाऱ्यांनी मान्सूनला पुढे सरकण्यापासून रोखले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 11:40 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 15 Jun 2026 11:40 AM (IST)

    15 Jun 2026 11:40 AM (IST)

    धीरज बोम्मादेवराने मिळवले आर्चरी विश्व कपमध्ये Double Gold, फायनलमध्ये साऊथ कोरियाच्या खेळाडूला मात

    भारताच्या धीरज बोम्मादेवराने तुर्कस्तानमधील अंताल्या येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात एक संस्मरणीय कामगिरी केली. रविवारी कुमकुम मोहोडसोबत मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्यानंतर, त्याने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारातही सुवर्णपदक जिंकून दुहेरी सुवर्णपदक पटकावले. २४ वर्षीय धीरजने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण कोरियाच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता ली वू-सेओकचा ७-३ असा पराभव केला. या विजयामुळे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद मिळवले.

  • 15 Jun 2026 11:40 AM (IST)

    15 Jun 2026 11:40 AM (IST)

    धावत्या कारच्या छतावर डान्स अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी

    सध्या एक अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही तरुण कारच्या छतावर उभे राहून डान्स करत आहे. तर काहीजण खिडकीतून अर्ध बाहेर लटकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कपडे काढून त्यांचा हा उर्मटपणा सुरु आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा हिमाचलमधील प्रसिद्ध पर्यटनस्थल कसोल येथील आहे.

  • 15 Jun 2026 11:30 AM (IST)

    15 Jun 2026 11:30 AM (IST)

    चॅटजीपीटीमुळे अभ्यास सोपा झाला पण त्याच्या अतिवापरावर शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ मोठी चिंता!

    आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या प्रगत साधनांनी (Tools) शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. आज विद्यार्थी अवघड प्रश्नांची उत्तरे, नोट्स, असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्सची माहिती काही सेकंदांत मिळवू शकतात. यामुळे अभ्यास पूर्वीपेक्षा खूपच सोपा आणि वेगवान झाला आहे. मात्र, याच्या वाढत्या वापरासोबतच एक नवीन चिंताही समोर येत आहे की, यामुळे विद्यार्थी स्वतः विचार करण्याची आणि समजून घेण्याची सवय तर गमावून बसत नाहीयेत ना?

  • 15 Jun 2026 11:30 AM (IST)

    15 Jun 2026 11:30 AM (IST)

    वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोस्टमास्तरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून तरुणाची आर्त हाक

    उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे 26 वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तर निखिल वर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • 15 Jun 2026 11:20 AM (IST)

    15 Jun 2026 11:20 AM (IST)

    शांतता करार की पोकळ दावा? अमेरिका-इराण करारावर ट्रम्प यांची घोषणा, इराण मात्र मौन

    मध्यपूर्वेत गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका(America)-इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. अखेर हा संघर्ष संपवण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली. त्यांनी जगातील महत्त्वाचा व्यापारी वाहतूकीचा समुद्री मार्ग होर्मुझही कोणत्याही शुल्काशिवाय खुला केल्याचे म्हटले. आपल्या सैन्याला तातडीने नाकेबंदी हटवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा करार झाल्याचे सांगितले जात आहे. पण इराणने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे करार झाला का नाही याबाबत शंका कायम आहे.

  • 15 Jun 2026 11:15 AM (IST)

    15 Jun 2026 11:15 AM (IST)

    ‘गद्दार म्हणा..’, प्रकाश राज यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, ‘कॉकरोच जनता पार्टी’ आंदोलनात घोषणा

    ‘कॉकरोच इज बॅक’च्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रकाश राज हे कार्यकर्त्या सोनम वांगचुक आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके याच्यासोबत उभे असलेले दिसले. ते म्हणाले, “निवडलेल्या नेत्यांनी आपलं काम करायला हवं! तुम्ही समीकरण का बदललं आहे? तुम्ही तुमचं काम करण्याऐवजी राजकारण खेळत आहात. नाही! या देशातील तरुणांनी स्वतःची लढाई स्वतः लढण्याचा निर्णय घेतला आहे. या देशातील तरुण दलित आहेत. काका आणि काकू, तुम्ही निवृत्तीनंतरही या देशावर राज्य करत आहात. निघून जा. आम्ही तरुण आमच्या भविष्यासाठी लढत आहोत. हे तरुण त्यांच्या स्वप्नांसाठी लढत आहेत.”

  • 15 Jun 2026 11:05 AM (IST)

    15 Jun 2026 11:05 AM (IST)

    महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली

    महावितरण कंपनीच्या उदासीन व आडमुठ्या धोरणामुळे सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक मसूर गाव सध्या भीषण पाण्याच्या संकटात आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत मंजूर झालेली १४ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आली. मात्र केवळ एका वीज कनेक्शनअभावी संपूर्ण गावाला पाण्यासाठीची भटकंती सुरू आहे….. एकंदरीत महावितरणने मसूरची पेयजल योजना रखडवली.

  • 15 Jun 2026 10:59 AM (IST)

    15 Jun 2026 10:59 AM (IST)

    स्लोव्हाकियामध्ये PM मोदींचे ‘ब्रेड आणि मीठ’ देऊन स्वागत

    पंतप्रधान मोदींचे ब्रातिस्लावा येथे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत कोणत्याही फुलांच्या हाराने किंवा बुके देऊन करण्यात आले नाही, तर त्यांना पारंपरिक पद्धतीने ‘ब्रेड आणि मीठ’ (Bread and Salt) अर्पण करण्यात आले. ही केवळ एक साधी स्वागत प्रथा नसून स्लोव्हाकियाच्या संस्कृतीतील आणि स्लाव्हिक (Slavic) परंपरेतील सर्वात जुनी, आदरणीय आणि पवित्र प्रथा मानली जाते. परदेशी पाहुण्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा आणि त्यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. स्लोव्हाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी पंतप्रधानांचे स्वागत करत या आदरातिथ्याची परंपरा पूर्ण केली.

  • 15 Jun 2026 10:50 AM (IST)

    15 Jun 2026 10:50 AM (IST)

    बाबा रामदेव यांची मोठी घोषणा!

    Baba Ramdev tri-education model: भारतीय संस्कृती, आधुनिक विज्ञान आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि इतर केंद्रीय सेवांमधील अधिकाऱ्यांची जडणघडण करण्याच्या उद्देशाने ‘पतंजली’ने ‘पतंजली सिव्हिल सेवा अकादमी’ (Patanjali Civil Services Academy) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक प्रशासकीय गरजांचा मेळ घालून भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेला एक नवीन दिशा देईल.

  • 15 Jun 2026 10:41 AM (IST)

    15 Jun 2026 10:41 AM (IST)

    आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm

    Emergency Alarm Service Suspended: तुम्हाला आठवतंय का काही दिवसांपूर्वी तुमच्या फोनवर इमर्जेन्सी अलार्म वाजला होता? अचानक वाजलेल्या या अलार्ममुळे सर्वत्र मोठा गोंधळ उडाला होता. याचसंबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजेच NDMA ने सेल ब्रॉडकास्ट सर्विस तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.

  • 15 Jun 2026 10:30 AM (IST)

    15 Jun 2026 10:30 AM (IST)

    अमेरिका-इराण शांतता करारानंतर होर्मुझ शुल्कमुक्त होणार?

    US-Iran Peace Deal News in Marathi : अखेर गेल्या तीन-चार महिन्यांपासून मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिका-इराण(Iran) मध्ये शांतता करार झाल्याचा ट्रम्प यांना दावा केला आहे. यासोबतच स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबतही मोठे माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे.

  • 15 Jun 2026 10:20 AM (IST)

    15 Jun 2026 10:20 AM (IST)

    प्रणित मोरेवर कुणाल कामराचा निशाणा?

    प्रणीतच्या माफीवर प्रतिक्रिया देताना कुणाल कामराने इन्स्टाग्रामवर लिहिले, ‘विनोदी कलाकारांनी कथाकथन, प्रेक्षकांशी संवाद, मेहनत, बँक बॅलन्स आणि पालक या गोष्टींमागे लपणे थांबवले पाहिजे.’ दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने उपहासाने लिहिले, ‘प्रणीत मोरेमुळे हर्ष गुजराल बराक ओबामांसारखे दिसतात.’

  • 15 Jun 2026 10:10 AM (IST)

    15 Jun 2026 10:10 AM (IST)

    अमेरिकेत स्कायडायव्हिंग विमानाचा भीषण अपघात

    अमेरिकेच्या (America) मिसूरी राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. एका सुंदर, निरभ्र रविवारी स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवण्यासाठी हवेत झेपावलेल्या निष्पाप लोकांवर काळाने झडप घातली. मिसूरीमधील बटलर मेमोरियल विमानतळावरून (Butler Memorial Airport) उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच स्कायडायव्हिंगचे एक विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि नाक जमिनीच्या दिशेने होऊन एका शेतात कोसळले. या भीषण अपघातानंतर विमानाला प्रचंड मोठी आग लागली, ज्यामध्ये विमानातील वैमानिक आणि ११ स्कायडायव्हर्ससह एकूण १२ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील एकही प्रवासी जिवंत वाचू शकलेला नाही.

  • 15 Jun 2026 09:59 AM (IST)

    15 Jun 2026 09:59 AM (IST)

    क्रॉफर्ड मार्केटमध्ये एफडीएची कारवाई!

    मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक ठिकाणी छप्पेमारी करण्यात आली आहे. यामध्ये दूध, चीज, पनीर तर जीवनावश्यक वस्तूंच्या वापरात केलेली भेसळ थांबवण्यासाठी अनेक छप्पेमारी करून खराब वस्तू गोळा केल्या जातात. मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर करून बनवलेल्या पदार्थांमुळे शरीराला गंभीर हानी पोहचू शकते. मुंबईतील सुप्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत १.२० लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.

  • 15 Jun 2026 09:50 AM (IST)

    15 Jun 2026 09:50 AM (IST)

    होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली

    आंतरराष्ट्रीय राजकारणातून आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या दशकातील सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ मध्यपूर्वेत (Middle East) सुरू असलेले भीषण युद्ध अखेर संपले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रविवारी अधिकृतपणे जाहीर केले की, युनायटेड स्टेट्स आणि इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक यांच्यात एक सर्वसमावेशक आणि ऐतिहासिक शांतता करार (US-Iran Peace Deal) पूर्ण झाला आहे. या करारामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेला प्रचंड तणाव आता निवळला असून, युद्धामुळे ठप्प झालेला आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 15 Jun 2026 09:38 AM (IST)

    15 Jun 2026 09:38 AM (IST)

    सोन्या – चांदीच्या दरात किंचीत घसरण!

    भारतात 15 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,907 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,664 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,180 रुपये आहे. भारतात 15 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,36,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,49,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,800 रुपये आहे. भारतात 15 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 259.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये आहे.

  • 15 Jun 2026 09:30 AM (IST)

    15 Jun 2026 09:30 AM (IST)

    US-Iran Deal: ‘इराणसोबतचे युद्ध संपले, वाहू द्या तेल’ असे म्हणून ट्रम्प यांचे नौदलाला परतीचे आदेश;

    Donald Trump Truth Social Iran announcement : आंतरराष्ट्रीय राजकारणातून आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या दशकातील सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ मध्यपूर्वेत (Middle East) सुरू असलेले भीषण युद्ध अखेर संपले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रविवारी अधिकृतपणे जाहीर केले की, युनायटेड स्टेट्स आणि इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक यांच्यात एक सर्वसमावेशक आणि ऐतिहासिक शांतता करार (US-Iran Peace Deal) पूर्ण झाला आहे. या करारामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेला प्रचंड तणाव आता निवळला असून, युद्धामुळे ठप्प झालेला आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 15 Jun 2026 09:25 AM (IST)

    15 Jun 2026 09:25 AM (IST)

    Butler Missouri : आकाशात झेपावले अन् काळ बनून कोसळले!

    Missouri skydiving plane crash 12 dead : अमेरिकेच्या (America) मिसूरी राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. एका सुंदर, निरभ्र रविवारी स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवण्यासाठी हवेत झेपावलेल्या निष्पाप लोकांवर काळाने झडप घातली. मिसूरीमधील बटलर मेमोरियल विमानतळावरून (Butler Memorial Airport) उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच स्कायडायव्हिंगचे एक विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि नाक जमिनीच्या दिशेने होऊन एका शेतात कोसळले. या भीषण अपघातानंतर विमानाला प्रचंड मोठी आग लागली, ज्यामध्ये विमानातील वैमानिक आणि ११ स्कायडायव्हर्ससह एकूण १२ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील एकही प्रवासी जिवंत वाचू शकलेला नाही.

  • 15 Jun 2026 09:20 AM (IST)

    15 Jun 2026 09:20 AM (IST)

    India Women vs Pakistan T20 World Cup: शेफाली वर्माचा पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून नवा विश्वविक्रम

    India Women vs Pakistan T20 World Cup: आयसीसी वुमन्स टी-२० वर्ल्डकप (Women's T20 World Cup) स्पर्धेत भारतीय महिला संघाने धडाकेबाज कामगिरी करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. पहिल्याच हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला ६४ धावांनी पराभवाची धूळ चारली. या मोठ्या विजयामुळे भारतीय संघाला तब्बल २ गुण मिळाले असून गुणतालिकेत +३.२०० असा मजबूत नेट रनरेट (Net Run Rate) मिळाला आहे.

    भारताचे पाकिस्तानसमोर १७१ धावांचे आव्हान या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाने नाणेफेकीचा (Toss) कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावांचा डोंगरासारखा धावसंख्या उभारली. पाकिस्तानला विजयासाठी १७१ धावांचे कठीण आव्हान देण्यात आले होते.

  • 15 Jun 2026 09:15 AM (IST)

    15 Jun 2026 09:15 AM (IST)

    Gold Rate Down June 15: आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असतानाही देशांतर्गत बाजारात सोने स्वस्त

    Gold Rate Down June 15:  देशभरातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोमवार, १५ जून रोजी सकाळी देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत.

    २४ आणि २२ कॅरेट सोने झाले स्वस्त ताज्या दरांनुसार, देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४९,२२० रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्या संपूर्ण आठवड्याचा विचार केला तर सोन्याच्या दरात मोठी पडझड झाली आहे. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम तब्बल ६,६८० रुपयांची घट झाली आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

Maharashtra Monsoon Delay June 20 : मान्सून अरबी समुद्रातच खोळंबला: अफगाणिस्तानच्या वाऱ्याचा अडथळा

पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) १५ जून २०२६ रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून अजूनही अरबी समुद्रातच खोळंबला असून त्याची पुढील वाटचाल पूर्णपणे थांबली आहे. अरबी समुद्रातून पुढे सरकण्याऐवजी मान्सून एकाच ठिकाणी रेंगाळला असून, आता राज्यात २० जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा नवीन अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. या विलंबाने राज्यातील बळीराजाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

 

 

Web Title: 15th june2026 live breaking news marathi maharashtra politics national international war crime sports share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन
1

Maharashtra Breaking News Updates Today: कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन

Maharashtra Breaking News Updates Today:  सोलापुरातील गोकुळ शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
2

Maharashtra Breaking News Updates Today: सोलापुरातील गोकुळ शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.