Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन

Maharashtra Breaking News- पुण्यातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे असे ते म्हणाले. पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 11, 2026 | 06:08 PM
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन

 

पुणे : देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांविरोधात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. त्यानुसार, आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला आहे.

पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि स्पर्धा परीक्षार्थीचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. यासाठी संबंधित यंत्रणांसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाही जबाबदार धरले पाहिजे, असे ते म्हणाले. दिपके यांनी सांगितले की, ६ जून रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला असून, आता ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे.

The liveblog has ended.
  • 11 Jun 2026 05:50 PM (IST)

    11 Jun 2026 05:50 PM (IST)

    Aamchya Ladkya Naik Bai : ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा!

    ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही मालिका प्रसारित होण्यासाठी तयार होत आहे. अद्याप या मालिकेची तारीख निश्चित झाली नाहीये, तरीही या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्कंठा लागून आहे. मुळात, या मालिकेत महाराष्ट्राचे लोकप्रिय चेहरे पाह्यला मिळणार आहेत. ऐश्वर्या नारकर या मालिकेत मुख्य पात्र साकारणार आहे. त्याचबरोबर तरुणांची मन मोजणारी अभिनेत्री अमृता धोंगडे या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तिला पाहण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. दक्षता जोईलदेखील मालिकेत एक महत्वाचे पात्र साकारणार आहे. मालिकेतील इतर पात्रांविषयी माहिती अद्याप गुपितच ठेवण्यात आली आहे.

  • 11 Jun 2026 05:40 PM (IST)

    11 Jun 2026 05:40 PM (IST)

    ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

  • 11 Jun 2026 05:30 PM (IST)

    11 Jun 2026 05:30 PM (IST)

    AUS Vs BAN Live: धडाधड कोसळली! ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट

    Bangladesh Vs Austrelia: सध्या ढाका येथे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात वनडे सिरिज सुरू आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने सामना जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र आता दूसरा सामना देखील ऑस्ट्रेलिया हरणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली आहे.

    दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय एकदम चुकीचा ठरला, दुसऱ्या सामन्यात  ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अशाच एका थक्क करणाऱ्या आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन फलंदाज शून्यावर आउट झाले असताना मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी शानदार खेळी करत सांनीयचे चित्र बदलून टाकले.

  • 11 Jun 2026 05:25 PM (IST)

    11 Jun 2026 05:25 PM (IST)

    मुंबईत एसुसचे नवीन एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर

    मुंबई, 11 जून 2026: सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या आणि देशभरातील विक्रीपश्चात सेवा नेटवर्क मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत, तैवानची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी एसुस इंडियाने आज मुंबईत एका नवीन एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ स्थित असलेली ही नवीन सुविधा, एसुसच्या ग्राहक उत्पादनांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांना अखंड सेवेचा अनुभव सुनिश्चित होईल.

  • 11 Jun 2026 05:14 PM (IST)

    11 Jun 2026 05:14 PM (IST)

    IGNOU PhD Admission 2026: इग्नूमध्ये ३६ विषयांसाठी पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू

    IGNOU PhD: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै २०२६ च्या सत्रासाठी पीएचडी (PhD) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १० जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. विद्यापीठाने आपल्या अधिकृत प्रवेश पोर्टलवर अर्ज प्रक्रिया खुली केली असून, विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

  • 11 Jun 2026 04:57 PM (IST)

    11 Jun 2026 04:57 PM (IST)

    ‘सलमानपासून दूर रहा’, गायक गुरु रंधावाच्या जिमवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी?

    पंजाबी आणि बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक गुरू रंधावाच्या जिमवर गुरुवारी पहाटे जोरदार गोळीबार झाला. त्याची ’24HS फिटनेस दिल्ली’ नावाची जिम दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात आहे. या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या घटना घडवणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. या संपूर्ण घटनेचा संबंध सलमान खानशी असल्याचे म्हटले जात आहे. वाचा सविस्तर 

  • 11 Jun 2026 04:47 PM (IST)

    11 Jun 2026 04:47 PM (IST)

    गृहिणींना सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक दिलासा! अपघाती मृत्यूप्रकरणी नुकसानभरपाईसाठी नवे निकष

    गृहिणी आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे कुटुंबासाठी आणि त्यांच्या घरगुती कामाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहिणी, घरकाम करणाऱ्या महिलांचा अपघातात मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई निश्चित करताना तिच्या घरगुती सेवांचे स्वतंत्र मूल्यांकन करणे आवश्यक आहे. तसेच, गृहिणींना केवळ “गृहिणी” म्हणून नव्हे तर “राष्ट्रनिर्मात्या” म्हणून पाहिले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

  • 11 Jun 2026 04:37 PM (IST)

    11 Jun 2026 04:37 PM (IST)

    CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; ‘या’ दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!

    द्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड(CBSE) इयत्ता १२ वीचे निकाल घोषित झाल्यापासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरम्यान स्वत:वर झालेले आरोप आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी बोर्डाने या विद्यार्थ्यांसाठी री-इव्हॅल्युएशन प्रक्रिया सुरू केली होती. ज्यांना आपले गुण कमी वाटत होते. ते  २ जूनपासून ७ जून २०२६ पर्यंत अर्ज करू शकत होते. या प्रक्रियेअंतर्गत १.६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ओएसएमम (OSM) आणि मार्क व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केले होते. तर ३.८ लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांच्या प्रती(Answer Sheets) मिळवण्यासाठी अर्ज केले होते. वाचा सविस्तर 

  • 11 Jun 2026 04:27 PM (IST)

    11 Jun 2026 04:27 PM (IST)

    West Bengal Politics : राज्यसभेत ममता बॅनर्जींना मोठा धक्का? तिसऱ्या राजीनाम्यानंतर TMC ची संख्या १० वर

    काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. गुरुवारी (11 जून 2026) पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बारेक यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे, एका आठवड्यात राज्यसभेतून राजीनामा देणारे हे तिसरे खासदार आहेत. केवळ एक दिवस आधी, बुधवार, १० जून रोजी, सुष्मिता देव यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. वाचा सविस्तर 

  • 11 Jun 2026 04:17 PM (IST)

    11 Jun 2026 04:17 PM (IST)

    IND Vs SL: ऑगस्टमध्ये कसोटी मालिका; तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार?

    India Visit Sri Lanka: सध्या भारतीय क्रिकेट संघ अफगणिस्तान विरुद्ध एकदिवसीय सिरिज खेळत आहे. मात्र पुढील काही महीने भारतीय संघ व्यस्त असणार आहे. लवकरच भारत इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी 20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र लवकरच ऑगस्ट महिन्यात भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे. वाचा सविस्तर 

  • 11 Jun 2026 04:07 PM (IST)

    11 Jun 2026 04:07 PM (IST)

    नाशिक विधानपरिषदेच्या तिढा संपला ! अखेर गोकुळ गीतेंनी घेतला मोठा निर्णय

    नाशिक विधान परिषदेच्या जागेबाबतचा तिढा आता संपला असल्याचे समजते. नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती. या विधान परिषदेसाठी शिंदे गटाच्या नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यामुळे भाजपमधील गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी नाराजी व्यक्त करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता मात्र गोकुळ गीते यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर गोकुळ गीतेच्या मनधरणीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत होते. आता मात्र हा तिढा सुटला असून गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर केला आहे.

  • 11 Jun 2026 04:00 PM (IST)

    11 Jun 2026 04:00 PM (IST)

    दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी

    राजेगाव : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या दौंड तालुक्याच्या पूर्व मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव, खानवटे, स्वामी चिंचोली, खडकी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्व भागात वरुणराजाने दमदार एन्ट्री केली असून, तब्बल तीन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे शेतकरी राजा कमालीचा आनंदी झाला असून, सुखावलेल्या बळीराजाने रखडलेल्या शेतीच्या कामांना आता जोमाने सुरुवात केली आहे. वाचा सविस्तर

  • 11 Jun 2026 03:55 PM (IST)

    11 Jun 2026 03:55 PM (IST)

    ICC ODI Rankings मध्ये भारत पुन्हा अव्वल

    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुष एकदिवसीय क्रमवारी (ICC Men’s ODI Rankings) जारी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत ICC पुरुष वनडे संघ क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचे ११८ रेटिंग गुण आहेत. तर, न्यूझीलंड ११३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ICC च्या वार्षिक अपडेटनंतरही टीम इंडियाने वनडे क्रिकेटमधील आपली बादशाही कायम राखली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारखे बलाढ्य संघ पाठलाग करत असले तरी भारत अजूनही शिखरावर विराजमान आहे. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. वाचा सविस्तर

  • 11 Jun 2026 03:50 PM (IST)

    11 Jun 2026 03:50 PM (IST)

    मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज

    गेल्या महिन्यात Star Pravah वाहिनीने तब्बल सहा नव्या मालिकांची घोषणा केली होती. त्यामध्ये उल्लेख असणाऱ्या काही नव्या मालिकांना सुरुही करण्यात आले आहे. Star Pravah च्या या नव्या मालिकांमध्ये एका मालिकेचा उल्लेख होता ती म्हणजे ‘मी कात टाकली’! मराठी मालिका क्षेत्रात Star Pravah वाहिनेचा प्रतिस्पर्धी म्हणून Zee Marathi कडे पाहिले जाते. त्यामुळे अशा वेळी Zee Marathi नेही कोणती कमतरता ठेवली नाहीये. ‘मी कात टाकली’ मालिकेसोबतच मराठी मालिका प्रेक्षकांना आणखीन एका नागीण आधारित मालिकेचा लाभ घेता येणार आहे. वाचा सविस्तर

  • 11 Jun 2026 03:45 PM (IST)

    11 Jun 2026 03:45 PM (IST)

    नाशिक विधानपरिषदेच्या तिढा संपला ! अखेर गोकुळ गीतेंनी घेतला मोठा निर्णय

    आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी बातमी समोर येत असून नाशिक विधान परिषदेच्या जागेबाबतचा तिढा आता संपला असल्याचे समजते. नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती. या विधान परिषदेसाठी शिंदे गटाच्या नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यामुळे भाजपमधील गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी नाराजी व्यक्त करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता मात्र गोकुळ गीते यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर गोकुळ गीतेच्या मनधरणीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत होते. आता मात्र हा तिढा सुटला असून गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर केला आहे. वाचा सविस्तर

  • 11 Jun 2026 03:40 PM (IST)

    11 Jun 2026 03:40 PM (IST)

    इराणचा अमेरिकेच्या १८ लष्करी तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा

    मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र पेटला असून इराण-अमेरिका दोघांमध्ये सतत हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. गुरुवारी सकाळी कुवेत आणि बरीन येथे अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे इराणने म्हटले आहे. तसेच आतापर्यंत इराणने अमेरिकेच्या १८ लष्करी तळांना नष्ट केल्याचा दावा केला आहे. मात्र या दाव्यांची अद्याप अमेरिकेकडून पुष्टी करण्यात आलेली नाही.

  • 11 Jun 2026 03:35 PM (IST)

    11 Jun 2026 03:35 PM (IST)

    IND Vs SL: ऑगस्टमध्ये कसोटी मालिका; तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार? तारखा जाहीर?

    India Visit Sri Lanka: सध्या भारतीय क्रिकेट संघ अफगणिस्तान विरुद्ध एकदिवसीय सिरिज खेळत आहे. मात्र पुढील काही महीने भारतीय संघ व्यस्त असणार आहे. लवकरच भारत इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी 20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र लवकरच ऑगस्ट महिन्यात भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे. वाचा सविस्तर

  • 11 Jun 2026 03:30 PM (IST)

    11 Jun 2026 03:30 PM (IST)

    मुलीला बाहेर पाठवलं, आईला संपवलं, नंतर आरोपीनेही संपवलं जीवन

    मध्यप्रदेश: एका बंद दरवाज्यामागे घडलेल्या रक्तरंजित घटनेने मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा हादरून गेला आहे. 37 वर्षीय आशा कार्यकर्त्या रजनी शुक्ला यांची त्यांच्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली, तर काही क्षणांनंतर त्याच घरात आरोपीचाही मृतदेह आढळून आला. मुलीला खोलीबाहेर काढून आईवर सपासप वार करण्यात आल्याच्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 11 Jun 2026 03:25 PM (IST)

    11 Jun 2026 03:25 PM (IST)

    पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक

    आळेफाटा : पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारला कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील बोटा येथील पाच भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना बुधवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील गुळंजवाडी शिवारात घडली आहे. वाचा सविस्तर

  • 11 Jun 2026 03:20 PM (IST)

    11 Jun 2026 03:20 PM (IST)

    मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक स्मार्ट

    वोडाफोन आयडिया (वी) ने मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन ३ च्या मार्गिकेवरील ‘आरे जेवीएलआर’ ते ‘आचार्य अत्रे चौक’ दरम्यानच्या सर्व १६ स्थानकांवर त्यांची मोबाईल नेटवर्क सेवा सुरू झाली असल्याची घोषणा केली आहे. या १६ स्थानकांमध्ये: सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, सीएसएमआय एअरपोर्ट टी२, सहार रोड, सीएसएमआय एअरपोर्ट टी१, सांताक्रूझ, वांद्रे कॉलनी, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, धारावी, शितला देवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी यांचा समावेश आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि एसेस इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील काही न सुटलेल्या वादांमुळे ही नेटवर्क सेवा काही काळासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. वाचा सविस्तर

  • 11 Jun 2026 03:15 PM (IST)

    11 Jun 2026 03:15 PM (IST)

    बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली

    पुणे : भरदिवसा रस्त्यात महिलेला चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३४ वर्षीय ट्रकचालकाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. पीडितेने केलेल्या वर्णनाच्या आधारे गुन्हा करून पसार झालेल्या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी जेरबंद केले होते. कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये आणि न्यायालयात साक्ष नोंदवताना पीडितेने आरोपीला ओळखले. पीडितेची साक्ष, त्याला सुसंगत डीएनए आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी हा निकाल दिला. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 11 Jun 2026 03:10 PM (IST)

    11 Jun 2026 03:10 PM (IST)

    अमेरिकेतही महागाई फोफावली

    US inflation Effects On India: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत महागाईचा दर पुन्हा एकदा ४ टक्क्यांच्या वर गेला आहे. यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘फेडरल रिझर्व्ह’ची चिंता वाढली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, अमेरिकेतील वाढत्या महागाईचा भारतावर किती मोठा परिणाम होईल आणि त्यामुळे RBI ला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो? जाणून घेऊयात सविस्तर

  • 11 Jun 2026 03:05 PM (IST)

    11 Jun 2026 03:05 PM (IST)

    होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य

    Hormuz Attack News in Marathi : मध्यपूर्वेत अमेरिका-इराण संघर्षाने तीव्र पेट घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय नाविकांना बसत आहे. गुरुवारी (११ जून) शिनास बंदराजवळ आणखी एका जहाजालर हल्ला करण्यात आला आहे. या जहाजावर २० भारतीय नाविक आहेत. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रुमला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर

    🚨Another commercial vessel with Indian sailors on board attacked in Hormuz Strait

    MT Jalveer has come under attack off the Oman coast.

    The incident comes just one day after another attack on a commercial tanker off Oman left three Indian seafarers dead. pic.twitter.com/Ln65uPkkr0

    — Sputnik India (@Sputnik_India) June 11, 2026

  • 11 Jun 2026 02:59 PM (IST)

    11 Jun 2026 02:59 PM (IST)

    पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा

    सरकारकडून जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, ज्या पेट्रोलमध्ये २२% ते ३०% पर्यंत इथेनॉलचे प्रमाण असणार आहे. त्यावर आता कोणतेही उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही. सामान्य जनतेसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणार आहे.

  • 11 Jun 2026 02:51 PM (IST)

    11 Jun 2026 02:51 PM (IST)

    लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणर? तारीख आली समोर

    लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षा आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या १२ ते १५ जून दरम्यान योजनेचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

  • 11 Jun 2026 02:42 PM (IST)

    11 Jun 2026 02:42 PM (IST)

    आम्ही कुठलंही ऑपरेशन टायगर करत नाही - संजय शिरसाट

    आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करीत नाही. ज्यांना यायचं आहे, त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. आता आमची मानसिकता नाही मात्र जेव्हा ऑपरेशन टायगर करायचं असेल तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील असं वाटत नाही.

  • 11 Jun 2026 02:30 PM (IST)

    11 Jun 2026 02:30 PM (IST)

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्यदालाकडून रणगाडा भेट

    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दलाकडून रणगाडा भेट देण्यात आला आहे अण्णा हजारे यांचे सैन्य दलातील कार्य आणि समाजसेवा यांची दखल घेत संरक्षण विभाग आणि सैन्य दलाकडून राळेगणसिद्धी येथे हा रणगाडा भेट देण्यात आला आहे T55 म्हणजेच भीम नावाचा हा रणगाडा सैन्यदलाकडून देण्यात आला आहे.

  • 11 Jun 2026 02:21 PM (IST)

    11 Jun 2026 02:21 PM (IST)

    नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला

    नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बंडखोर उमेदवार गोकुळ गीते थोड्याच वेळात नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून गोकुळ गितेंची मनधरणी सुरू होती. अखेर त्यांचे मन वळवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं आहे. मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गितेंच्या माघारीसाठी सर्वाधिक प्रयत्न केले.

  • 11 Jun 2026 02:10 PM (IST)

    11 Jun 2026 02:10 PM (IST)

    अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. 20 जूनला अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांचं उद्घाटन होणार आहे. या आराखड्यांतर्गत अद्याप सुरू असलेल्या कामांची देखील अमित शहा पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर अमित शहांची जाहीर सभा देखील घेणार आहेत.

  • 11 Jun 2026 02:02 PM (IST)

    11 Jun 2026 02:02 PM (IST)

    दिल्लीला जाताना सुनेत्रा पवारांचं विमान बिघडलं; 45 मिनिटं...

    सुनेत्रा पवार यांचा दिल्लीला जाताना सीएमआर कंपनींच्या विमानामधे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर 45 मिनिट पवार यांच्यावर थांबण्याची वेळ आली. एनडीच्या बैठकीसाठी 9 जून रोजी दिल्लीसाठी निघाल्या होत्या सुनेत्रा पवार. दिल्लीला जाताना आणि येताना सीएमआर कंपनीच्या विमानाने सुनेत्रा पवारांनी प्रवास केला.

  • 11 Jun 2026 02:00 PM (IST)

    11 Jun 2026 02:00 PM (IST)

    एकाची जमीन दुसऱ्याच्या नावे! म्हावशी गावातील १७९ हून अधिक चुकीच्या नोंदींचा मुद्दा ऐरणीवर

    भूमीअभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभाराचा विरोधी भाजपचे सदस्य शंकरराव घाडगे यांनी सभागृहात पर्दाफाश केला. २००९ मध्ये म्हावशी गावचा सिटी सर्व्हे होवून २०१७ ला फेरफार झाला. यात अनेक दोष आहेत. एकाची प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावे अशा जवळपास १७९ पेक्षा जास्त चुकीच्या नोंदी भूमी अभिलेख कार्यालयात झाल्या आहेत. अनेक नोंदी महाराष्ट्र शासनाच्या नावेही झाल्याने लोकांची गैरसोय तसेच विनाकारण त्रास झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत, असा अनेक गावात चुकीचा सर्व्हे झाला आहे. त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी शंकरराव घाडगे यांनी सभागृहात लावून धरली. पाटण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गटविकास अधिकारी सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभापती सविता पवार, उपसभापती विजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक सभा झाली.

  • 11 Jun 2026 01:55 PM (IST)

    11 Jun 2026 01:55 PM (IST)

    खेड तालुक्यातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत; धूळवाफेवर भात पेरणीला सुरुवात

    खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामाची चाहूल लागली असून भात रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी धूळवाफेवर साळीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. काही भागात झालेल्या वळवाच्या पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली असून आता बळीराजा समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागाची ओळख भाताचे आगार म्हणून आहे. पोषक हवामान, सुपीक जमीन आणि मुबलक पर्जन्यमान यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. दरवर्षी सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते.

  • 11 Jun 2026 01:45 PM (IST)

    11 Jun 2026 01:45 PM (IST)

    हुंड्याच्या छळानंतर विवाहितेचा मृतदेह विहिरीत सापडला

    बीड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. तिचा मृत्यू अपघाती नसून हत्या आहे असा आरोप मृत्यू झालेल्या महिलेच्या माहेरच्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बीड तालुक्यातील कुटेवाडी येथे घडली.

  • 11 Jun 2026 01:35 PM (IST)

    11 Jun 2026 01:35 PM (IST)

    पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं

    यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षांतराबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, पक्ष बदलण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. मोहिते यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सुमारे दहा वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता आणि आजही त्याच पक्षात कार्यरत आहे. पवार कुटुंबाशी आमच्या कुटुंबीयांचे अनेक दशकांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू असून, २१ जून रोजी मतदान होणार आहे.

  • 11 Jun 2026 01:25 PM (IST)

    11 Jun 2026 01:25 PM (IST)

    ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट!

    राज्याच्या लाडकी बहिण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांना १२ ते १५ जून दरम्यान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यभरातील पात्र महिला लाभार्थी आता त्यांच्या बँक खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घोषणा केली की, मे महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.

  • 11 Jun 2026 01:15 PM (IST)

    11 Jun 2026 01:15 PM (IST)

    पाकिस्तानच्या विनंतीवर नरमले ट्रम्प? इराणला वेळ दिल्याचा दावा

    अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु केले आहे. यावेळीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे जागतिक राजकारणा मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरुन इराणविरोधातील भूमिका काहीशी मवाळ केल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी होर्मुझमधून कोटींचे तेल सुरक्षित बाहेर काढल्याचाही दावा केला आहे.

  • 11 Jun 2026 01:05 PM (IST)

    11 Jun 2026 01:05 PM (IST)

    प्रशासकीय कामांसाठी ‘पीएमआरडीए’ची ‘त्रिसूत्री’; पायाभूत सुविधा

    पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता प्राधिकरणाने ‘विकास, वाहतूक व्यवस्थापन आणि प्रशासकीय पारदर्शकता’ या त्रिसूत्रीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (दि. १०) आकुर्डी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्राधिकरणाच्या आगामी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आणि प्रशासकीय सुधारणांचा सविस्तर आढावा सादर केला. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, प्रशासकीय फाईल्सचा प्रवास गतिमान करण्यासाठी ‘सिंगल विंडो’ प्रणाली कार्यान्वित करण्यासह अनधिकृत होर्डिंगवर कारवाईसाठी आता ‘एआय’ आधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

  • 11 Jun 2026 01:02 PM (IST)

    11 Jun 2026 01:02 PM (IST)

    पीएमपीच्या 'पर्यटन बस'ला पुणेकरांची पसंती

    उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विशेष पर्यटन बस सेवेला यंदा उदंड प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात या पर्यटन बसेसच्या माध्यमातून पीएमपीच्या गल्ल्यात ६ लाख ५९ हजार रुपयांचे घसघशीत उत्पन्न जमा झाले आहे. अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल १ हजार ३१८ पर्यटकांनी या किफायतशीर आणि निसर्गरम्य सफारीचा लाभ घेतला आहे. पीएमपीच्या या सुविधेमुळे घरच्या घरी आणि कमी खर्चात सहलीचे नियोजन करणे पुणेकरांना शक्य झाले असून, आगामी पावसाळी पर्यटनासाठीही महामंडळाकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

  • 11 Jun 2026 12:48 PM (IST)

    11 Jun 2026 12:48 PM (IST)

    डिलिव्हरी बॉयला अडवून मोबाइल व रोकड हिसकावली

    बिबवेवाडीत डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या तरुणाला अडवून त्याच्याकडील मोबाइल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. नंतर त्याला काही वेळ दुचाकीवरून फिरविण्यात आले. पण, त्याला ओरडल्यास खेळ संपवेल अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अनिकेत हरिदास लोहार (वय २४, रा. खोपडे नगर, गुजरवाडी, कात्रज, पुणे. मूळ रा. बेलवडे हवेली, ता. कराड, जि. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार केतन शाम टेमकर (वय २३, रा. तयब्बा मस्जिदजवळ, राजीव गांधी नगर, अप्पर बिबवेवाडी) आणि खुशाल उर्फ दादया शिंदे (वय २४, रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 11 Jun 2026 12:36 PM (IST)

    11 Jun 2026 12:36 PM (IST)

    खराडीत १४ वर्षीय मुलीचा बालविवाह; नऊ जणांवर गुन्हा

    खराडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी एका अंगणवाडी सेविकेने तक्रार दिली आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २८ मार्च २०२५ रोजी खराडी परिसरात १४ वर्षे ५ महिने वयाच्या मुलीचा विवाह कृष्णा माधव कांबळे (वय २७) याच्यासोबत लावला. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही सूरज गणपत कांबळे, शांताबाई गणपत कांबळे, अमोल गणपत कांबळे, योगेश काकासाहेब टॅकाळे, रुक्मिणी मारुती कांबळे, मोनिका नरसिंग कांबळे, नरसिंग मारुती कांबळे आणि संजना मारुती कांबळे यांनी विवाहास संमती देऊन तो पार पाडल्याचा आरोप आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या पत्रानुसार प्राप्त झालेल्या माहितीनंतर चाइल्ड हेल्पलाइनचे केसवर्कर, सुपरवायझर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलिस करत आहेत.

  • 11 Jun 2026 12:24 PM (IST)

    11 Jun 2026 12:24 PM (IST)

    सराईत गुंडांसह तिघांना ठोकल्या बेड्या

    पुण्यासह राज्यातील विविध शहरात आणि परराज्यात देखील तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखेने जेरबंद केले. दरोड्याच्या तयारीत असताना त्यांना भापकर मळा रोड परिसरतून पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अजयसिंग अर्जुनसिंग दूधानी (रा. मांजरीनगर), रामजीतसिंग रणजीतसिंग टाक (रा. गाडीतळ, हडपसर) आणि अभयसिंग सिकंदरसिंग जुन्नी (रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, सहा धारदार शस्त्रे, दरोड्यासाठी लागणारे साहित्य आणि एक कार असा एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोठा दरोडा आणि गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलिस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख व त्यांच्या पथकाने केली आहे.

  • 11 Jun 2026 12:12 PM (IST)

    11 Jun 2026 12:12 PM (IST)

    नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला; हर्षवर्धन सपकाळांची टीका

    नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करून पंडित जवाहलाल नेहरुंच्या पंतप्रधानपदापेक्षा जास्त काळ ते पदावर आहेत असा ढोल पिटला जात आहे परंतु नरेंद्र मोदी यांचे १२ वर्षातील कर्तृत्व व देशासाठी योगदान काय हे शोधावे लागेल. गेल्या १२ वर्षात नरेंद्र मोदी देशाला चुकीच्या दिशेने घेऊन गेले, त्याची मोठी किंमत पुढील अनेक वर्ष देशाला मोजावी लागणार आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाले तर मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही व दाखवावे असे एकही ‘काम’ नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • 11 Jun 2026 12:00 PM (IST)

    11 Jun 2026 12:00 PM (IST)

    मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! जलपुरवठा यंत्रणा हायटेक करण्यासाठी पालिकेची उपाययोजना, नागरिकांना मिळणार शुद्ध हवा-पाणी

    मुंबईकरांचा पाणीपुरवठा अधिक सुरक्षित, अखंडित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महापालिकेने, पाणीपुरवठ्याचा मुख्य कणा असलेल्या नियंत्रण। कक्षांचे आधुनिकीकरण, वायू प्रदूषण नियंत्रण आणि सुरक्षेसाठी पालिकेने तीन मोठे निर्णय घेत निविदा प्रक्रिया जाहीर केल्या आहेत. या नव्या ‘मास्टरप्लॅन’मुळे पावसाळ्यातही मुंबईची जलवाहिनी अधिक सक्षम आणि हायटेक होणार आहे.

  • 11 Jun 2026 11:50 AM (IST)

    11 Jun 2026 11:50 AM (IST)

    कृष्णा कारखाना निवडणूक : ‘कपबशी’ विरुद्ध ‘नारळ’ लढत, दोन अपक्षांना ट्रॅक्टर व शिट्टी

    यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चिन्हवाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलला ‘कपबशी’, तर विरोधी संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने कारखान्याच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी झालेल्या प्रक्रियेत दोन्ही प्रमुख पॅनेलसह रिंगणात राहिलेल्या अपक्ष उमेदवारांनाही चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये वडगाव हवेली-दुशेरे गटातील अपक्ष उमेदवार विश्वास पांडुरंग जाधव यांना ‘ट्रॅक्टर’, तर बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील अपक्ष उमेदवार महेश राजाराम पवार यांना ‘शिट्टी’ हे चिन्ह देण्यात आले.

  • 11 Jun 2026 11:40 AM (IST)

    11 Jun 2026 11:40 AM (IST)

    बागपतच्या बाजारपेठेत भरदिवसा गोळीबार, व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू; हिस्ट्रीशीटरही जखमी

    उत्तर प्रदेशातील बागपत येथे भरबाजारात झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या फायरिंगमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक सैरबैर होऊन पळू लागले. घटनेत चार लोक गंभीर जखमी असून व्यावसायिक बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

  • 11 Jun 2026 11:30 AM (IST)

    11 Jun 2026 11:30 AM (IST)

    महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली; पुढील तीन दिवसांत प्रगतीची शक्यता, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

    देशासह राज्यातील काही भागांमध्ये मान्सूने हजेरी लावली आहे. तळकोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासी मिळाला होता. पण उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास सध्या स्थिरावला असून, पुढील तीन दिवसांत तो राज्यातील आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 11 Jun 2026 11:30 AM (IST)

    11 Jun 2026 11:30 AM (IST)

    होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय, जगावर पुन्हा इंधन संकट?

    गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका-इराण संघर्ष (US-Iran War) पुन्हा तीव्र झाला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु असून मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वपूर्ण शहरांवर हल्ले केले आहेत. इराणने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच इराणने जागतिक तेल व्यापार वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जाणार मार्ग पुन्हा बंद केला आहे. यामुळे जगावर पुन्हा इंधन संकटाचे सावट उभारले आहे.

  • 11 Jun 2026 11:20 AM (IST)

    11 Jun 2026 11:20 AM (IST)

    डेड बॉडीच्या Private Parts ची करायचे थट्टा, प्रणित मोरेच्या शोमध्ये महिला डॉक्टरचे धक्कादायक वक्तव्य

    या व्हिडिओमध्ये, एक महिला डॉक्टर एका पुरुषाच्या मृतदेहाबद्दल म्हणत आहे, ‘मग पोट कापा, कवटी कापा आणि शेवटी जे काही प्रजनन अवयव असेल ते कापा.’ यावर प्रणीत विचारतो- ‘तुम्ही खऱ्या डॉक्टर आहात की कसाई? तिथे काही विनोद करतात की सगळेच गंभीर असतात?’ यावर ती म्हणते, ‘ते विनोदही करतात, अवयवाच्या आकारावर वगैरे.’ हे ऐकून प्रणीतला आश्चर्य वाटते आणि तो म्हणतो, ‘काय? तुम्ही लोक हे सगळं बोलता? त्या बिचाऱ्या काकांनी एका उदात्त कार्यासाठी आपलं शरीर दान केलं आहे.’ प्रणीत म्हणतो- ‘आता आपण दान कसं करणार, सगळ्यांना वाटेल की मी हे करू शकत नाही.’

  • 11 Jun 2026 11:10 AM (IST)

    11 Jun 2026 11:10 AM (IST)

    वीटभट्टी परिसरात दुर्गंधी, कुत्र्यांचा वावर अन् समोर आला कुजलेला मृतदेह; तुटलेल्या दातावरून पटली ओळख

    सोलापूरच्या कुंभारी परिसरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या ५१ वर्षीय मजुराचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळला. कुत्र्यांनी मृतदेह बाहेर ओढल्याने हा प्रकार उघडकीस आला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • 11 Jun 2026 10:55 AM (IST)

    11 Jun 2026 10:55 AM (IST)

    IND vs AFG: कुठे आणि कधी पाहता येणार आजचा Live सामना

    सामना वेळ आणि Live Streaming 

    तुम्हाला भारत अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यातील हा रोमांचक सामना थेट पहायचा असल्यास, येथे संपूर्ण तपशील आहेत:

    तारीख: गुरुवार, 11 जून, 2026

    वेळ: सकाळी 10:00 IST

    स्थळ: रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डंबुला (श्रीलंका)

    टीव्ही चॅनेल: सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

    Live Streaming: Sony LIV ॲप आणि वेबसाइट.

Web Title: 11th june2026 live breaking news marathi maharashtra national international war economy business updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • national news

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव
1

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव

NEET Paper Leak Case: आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला काँग्रेस! कायदेशीर सहाय्यासाठी हेल्पलाइन जाहीर
2

NEET Paper Leak Case: आंदोलक विद्यार्थ्यांच्या मदतीला काँग्रेस! कायदेशीर सहाय्यासाठी हेल्पलाइन जाहीर

Maharashtra Breaking News Updates Today: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Viral Video: एका क्षणात होत्याच नव्हतं झालं असतं पण… व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
4

Viral Video: एका क्षणात होत्याच नव्हतं झालं असतं पण… व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.