Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मध्य रेल्वेच्या जागेवर १६ हजार बेकायदेशीर झोपड्या! कुर्ला-ट्रॉम्बे, कल्याण, डोंबिवलीत सर्वाधिक विळखा

रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर हजारो झोपड्या उभ्या राहत असताना जबाबदार यंत्रणा नेमके काय करत होत्या, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे कारवाई नेमकी केव्हा होणार आणि मोठी मोहीम राबविण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 11:34 AM
मध्य रेल्वेच्या जागेवर १६ हजार बेकायदेशीर झोपड्या! कुर्ला-ट्रॉम्बे, कल्याण, डोंबिवलीत सर्वाधिक विळखा

मध्य रेल्वेच्या जागेवर १६ हजार बेकायदेशीर झोपड्या! कुर्ला-ट्रॉम्बे, कल्याण, डोंबिवलीत सर्वाधिक विळखा

Follow Us
Follow Us:

वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये हजारो झोपड्यांवर बुलडोझर चालवल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वेच्या लाखो चौरस मीटर जमिनीवर हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असतानाही कारवाईबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका धूसरच असल्याने संताप व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यातील विकासकामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये तब्बल १६ हजार ३० पेक्षा अधिक झोपड्या आणि अनधिकृत बांधकामांनी ५ लाख चौरस मीटरपेक्षा अधिक रेल्वे जमीन गिळंकृत केली आहे. रेल्वेच्या नोंदीनुसार कुर्ला-ट्रोम्बे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात अतिक्रमणांचा सर्वाधिक विळखा आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai AC Local: मुंबईकरांची ‘AC लोकल’ला पहिली पसंती; दररोज तब्बल 1 लाख 30 हजार प्रवाशांची रेकॉर्डतोड गर्दी

अनेक ठिकाणी रेल्वेच्या आरक्षित जागांवर थेट झोपड्या, गाळे, दुकाने आणि अनधिकृत व्यावसायिक बांधकामे उभी राहिली आहेत. काही भागांत तर रेल्वे रुळालगतच झोपड्यांची साखळी निर्माण झाली असून त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.कुर्ला-ट्रोम्बे परिसरात सर्वाधिक ५,५९५ झोपड्या असून ५०,३५ चौरस मीटर जागा अतिक्रमणाखाली गेली आहे. कल्याणमध्ये ३,१६० झोपड्यांनी तब्बल २,३५,९० चौरस मीटर जमीन व्यापली आहे. डोंबिवलीत २,९०२ झोपड्यांमुळे जवळपास १ लाख चौरस मीटर क्षेत्र बाधित झाले आहे. भायखळा, ऐरोली, कसारा, विक्रोळी आणि ठाणे परिसरातही मोठ्या प्रमाणात रेल्वे जमीन अतिक्रमणाखाली गेली आहे. विशेष म्हणजे, ज्या जागांवर भविष्यात अतिरिक्त रेल्वेमार्ग, स्थानक विस्तार आणि इतर विकासकामे प्रस्तावित आहेत, त्याच जागांवर अतिक्रमणांचे जाळे पसरत आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोट्यवधींची जमीन गिळंकृत; जबाबदार कोण?

गरीब नगरमध्ये काही दिवसांत मोठी मोहीम उभी करणारे प्रशासन आता मध्य रेल्वेच्या हजारो झोपड्यांबाबत मात्र कारवाईसाठी पुढे का येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अतिक्रमणांचा आकडा वर्षानुवर्षे वाढत असताना प्रशासन फक्त कागदोपत्री नोंदी ठेवत आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर हजारो झोपड्या उभ्या राहत असताना जबाबदार यंत्रणा नेमके काय करत होत्या, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे कारवाई नेमकी केव्हा होणार आणि मोठी मोहीम राबविण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai News: कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करा! मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश, विविध चौक्यांची पाहणी करून केल्या सूचना

कुर्ला-ट्रॉम्बे-५५९५ झोपड्या, ५०,३५५ चौ.मी.
कल्याण – ३,१६० झोपड्या, २,३५,९०० चौ. मी.
डोंबिवली २,९०२ झोपड्या, १,००,००० चौ. मी.
भायखळा -८०० झोपड्या, २१,६०० चौ.मी.
ऐरोली : ७९४ झोपड्या, ३१,३५५ चौ.मी.
कसारा : ५५९ झोपड्या, ७.३०२ चौ. मी.
घाटकोपर-विक्रोळी: ४१३ झोपड्या, २४,६५० चौ. मी.
ठाणे: ३६५ झोपड्या, ३.२८५ चौ.मी.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 16 thousand illegal huts on the site of central railway most wild in kurla trombe kalyan dombivli mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • centrail railway
  • Dadar Railway Station
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
2

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
4

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.