Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: गेल्या १० दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग

Maharashtra Breaking News : गेल्या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पेट्रोल प्रति लिटर ₹७.३५ ने आणि डिझेल प्रति लिटर ₹७.५३ ने महाग झाले आहे. या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे मालवाहतुकीसह सर्वच क्षेत्रांत महागाई आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 25, 2026 | 09:20 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 25 May 2026 09:20 AM (IST)

    25 May 2026 09:20 AM (IST)

    MS Dhoni: लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीला लष्कराकडून पगार मिळतो का?  

    MS Dhoni Salary From Army: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मैदानातील आपल्या उत्कृष्ट कामगिरीसोबतच देशप्रेमासाठीही ओळखला जातो. वर्ष २०११ मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर, भारतीय प्रादेशिक सेनेने (Territorial Army) धोनीला 'लेफ्टनंट कर्नल' ही मानद पदवी देऊन गौरवले होते. लष्करातील या मानाच्या पदवीनंतर धोनीला सैन्यदलाकडून किती पगार मिळतो, असा प्रश्न अनेकदा चाहत्यांच्या मनात येतो.

    लष्कराकडून धोनीला पगार मिळतो का?

    भारतीय लष्करात नियमित सेवा बजावणाऱ्या लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकाऱ्याचा मासिक पगार साधारणपणे १.२१ लाख रुपयांपासून ते २.१२ लाख रुपयांच्या दरम्यान असतो, ज्यामध्ये विविध भत्त्यांचाही समावेश असतो.

  • 25 May 2026 09:15 AM (IST)

    25 May 2026 09:15 AM (IST)

    Pune Crime: पुण्यात हॉटेलमधील वादातून गोळीबार; दोघे गंभीर जखमी,  

    Pune Crime:  पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राजगड तालुक्यातील कोदवडी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये किरकोळ वादातून थेट फायरिंग (गोळीबार) झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोदवडी फाटा येथील एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये वाद झाला. हा वाद पाहता पाहता इतका विकोपाला गेला की, आरोपींनी थेट बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दशरथ शिळीमकर आणि मस्कु दसवडकर हे दोघेजण गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • 25 May 2026 09:10 AM (IST)

    25 May 2026 09:10 AM (IST)

    Solapur Rain Update: सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार 

    Solapur Rain Update:  गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह व्यावसायिक प्रतिष्ठानांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

     जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात वादळी वाऱ्याने भीषण रूप धारण केले होते. या वादळामुळे येथील प्रसिद्ध 'जयशंकर' हॉटेल आणि एका पेट्रोल पंपाच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. वादळाचा वेग इतका तीव्र होता की, हॉटेल जयशंकरचे छताचे पत्रे अक्षरशः हवेत उडून गेले. वादळी वाऱ्याची ही भयानक दृश्ये तेथील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत.

  • 25 May 2026 09:03 AM (IST)

    25 May 2026 09:03 AM (IST)

    Pimpri Chinchwad: चिंचवडमध्ये तरुणीची छेडछाड करणाऱ्या विकृताला २४ तासांत बेड्या 

    Pimpri Chinchwad Crime: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवडमधून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील (Flyover) एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एका २४ वर्षीय तरुणीची अश्लील हावभाव करत छेडछाड करण्यात आली. मात्र, पीडित तरुणीने दाखवलेले विलक्षण धाडस आणि पिंपरी पोलिसांचा तात्काळ तांत्रिक तपास यामुळे या विकृत आरोपीला २४ तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जाकीर हमीद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    भररस्त्यात अश्लील चाळे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास पीडित २४ वर्षीय तरुणी तिच्या कंपनीच्या बसची वाट पाहत एम्पायर इस्टेट बीआरटी स्टँडवर उभी होती. सकाळी कामावर जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असतानाही, आरोपी जाकीर शेख तिथे आला आणि त्याने तरुणीला पाहून अश्लील चाळे व हावभाव करण्यास सुरुवात केली.

Maharashtra to National And International Breaking News:

Fuel Price Hike: महागाईचा भडका! गेल्या १० दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग; मुंबई-दिल्लीत नवे दर लागू

सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लावणारी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दहा दिवसांतील इंधनाच्या दरात वाढ होण्याची ही चौथी वेळ असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या ताज्या दरवाढीत पेट्रोलच्या किमतीत २.६१ रुपयांनी, तर डिझेलच्या किमतीत २.१७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांतील दर खालीलप्रमाणे आहेत:

मुंबई: मुंबईमध्ये पेट्रोलचे दर २.७६ रुपयांनी वाढले असून आता पेट्रोल १११.२१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात २.८१ रुपयांची वाढ झाल्याने डिझेल ९७.८३ रुपये प्रति लिटर झाले आहे.

दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत नव्या दरवाढीनंतर पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर झाले आहे.

 

 

Web Title: 25rd may 2026 live breaking news marathi maharashtra national international sports crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • national news

संबंधित बातम्या

Cockroach Janta Party वर सरकारचा आणखी एक ॲक्शन? एक्सनंतर वेबसाईटही बंद
1

Cockroach Janta Party वर सरकारचा आणखी एक ॲक्शन? एक्सनंतर वेबसाईटही बंद

आधी Donald Trump यांनी दिले संकेत… आणि आता केलं ‘हे’ विधान, लवकरच क्रॅश होणार तेलाचे दर?
2

आधी Donald Trump यांनी दिले संकेत… आणि आता केलं ‘हे’ विधान, लवकरच क्रॅश होणार तेलाचे दर?

पश्चिम आशियातील युद्ध आता लवकरच थांबणार; ‘या’ अटींवर झाले एकमत
3

पश्चिम आशियातील युद्ध आता लवकरच थांबणार; ‘या’ अटींवर झाले एकमत

Maharashtra Breaking News Updates Today: कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर 
4

Maharashtra Breaking News Updates Today: कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.