Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर 

Maharashtra Breaking News : अतिट येथे गोठ्याजवळ बांधलेल्या गाईवर वीज पडून ती जागीच ठार झाली. यामध्ये रामदास राजाराम जाधव यांचे मोठे नुकसान झाले. असवली, कण्हेरी, लोहोम व परिसरात पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 23, 2026 | 11:30 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 23 May 2026 11:30 AM (IST)

    23 May 2026 11:30 AM (IST)

    धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

    धाराशिवच्या कार्ला गावात सामायिक बोअरवेलच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाली. यात ब्रह्मदेव मोटे यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. पोलिसांनी मृताच्या भावासह चौघांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

  • 23 May 2026 11:15 AM (IST)

    23 May 2026 11:15 AM (IST)

    पेपरफुटीला बसणार आळा? दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाचा ‘हा’ नवा डिजिटल प्रयोग यशस्वी ठरेल का?

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पारंपारिक पद्धतीने प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि उत्तरपत्रिकांची तपासणी करते. मात्र, बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी-मार्च परीक्षेत बारामती येथून डिजीटल ट्रंकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता त्यापुढील टप्पा म्हणून थेट डिजीटल प्रश्नपत्रिका पाठवण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे.

  • 23 May 2026 11:05 AM (IST)

    23 May 2026 11:05 AM (IST)

    समुद्रकिनाऱ्यांचे रक्षक नामशेष होणार? प्लास्टिक प्रदूषण आणि मानवी स्वार्थाचा कासवांना मोठा फटका; वाचा सविस्तर

    पृथ्वीवरील सर्वात जुन्या आणि शांत जीवांपैकी एक असलेल्या कासवांच्या संरक्षणासाठी आजचा दिवस म्हणजेच २३ मे हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी २३ मे हा दिवस जगभरात ‘जागतिक कासव दिन’ (World Turtle Day) म्हणून साजरा केला जातो. निसर्गाची अन्नसाखळी आणि सागरी परिसंस्था (Marine Ecosystem) टिकवून ठेवण्यात कासवांची भूमिका अनन्यसाधारण आहे. परंतु, दुर्दैवाने आधुनिक मानवाच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर राज्य करणारे हे जीव आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

  • 23 May 2026 11:00 AM (IST)

    23 May 2026 11:00 AM (IST)

    पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

    भारतात प्रत्येकवेळी लोकांना ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागतो. ट्रॅफिकमध्ये वैतागलेल्या लोकांसाठी ऑटोमॅटिक कारचा पर्याय नेहमीच फायद्याचा आणि आरामदायक ठरू शकतो. कारण मॅन्युअल कार्सप्रमाणे ऑटोमॅटिक कारमध्ये वारंवार क्लच दाबण्याची आणि गिअर बदलण्याची कटकट नसते. ऑटोमॅटिक कार चालवण्याची पद्धत मॅन्युअल गाडीपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक कार चालवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच लोकं ड्रायव्हिंगदरम्यान काही अशा चूका करतात, ज्यामुळे गियरबॉक्स खराब होतो आणि गाडीचे नुकसान होऊ शकते. ऑटोमॅटिक कार चालवाताना खालील चुका टाळा.

  • 23 May 2026 10:50 AM (IST)

    23 May 2026 10:50 AM (IST)

    धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

    धाराशिव येथून एक हत्येची बातमी समोर आली आहे. सुक्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतातील सामाजिक बोरवेलच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला होता. याच वादातून हत्या करण्यात आल्याच्या समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना धारेश्वर जिल्ह्यातील कार्ला येथील आहे.

  • 23 May 2026 10:40 AM (IST)

    23 May 2026 10:40 AM (IST)

    पेपरफुटीला बसणार आळा? दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाचा ‘हा’ नवा डिजिटल प्रयोग

    पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेची गोपनीय प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट केंद्रावर पाठवणे आणि उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन स्क्रिनवर मुल्यांकन केले जाणार आहे. येत्या जुन-जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून फक्त एका केंद्रासाठीच मर्यादित असेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तरच पुढील परीक्षांना ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

  • 23 May 2026 10:30 AM (IST)

    23 May 2026 10:30 AM (IST)

    समुद्रकिनाऱ्यांचे रक्षक नामशेष होणार? प्लास्टिक प्रदूषण आणि मानवी स्वार्थाचा कासवांना

    पृथ्वीवरील सर्वात जुन्या आणि शांत जीवांपैकी एक असलेल्या कासवांच्या संरक्षणासाठी आजचा दिवस म्हणजेच २३ मे हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी २३ मे हा दिवस जगभरात ‘जागतिक कासव दिन’ (World Turtle Day) म्हणून साजरा केला जातो. निसर्गाची अन्नसाखळी आणि सागरी परिसंस्था (Marine Ecosystem) टिकवून ठेवण्यात कासवांची भूमिका अनन्यसाधारण आहे. परंतु, दुर्दैवाने आधुनिक मानवाच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर राज्य करणारे हे जीव आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

  • 23 May 2026 10:20 AM (IST)

    23 May 2026 10:20 AM (IST)

    कोयत्याने तरुणाची निर्घृण हत्या; अखेरच्या क्षणी सांगितली आरोपींची नावे

    रत्नागिरी येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली. हत्या झालेल्या तरुणाचे वार केल्यानंतर चे व्हिडिओ देखील वायरल झाले आहेत. एवढेच नाही तर त्याने आपल्या अखेरच्या श्वासात आरोपींची देखील नावे सांगितली आहेत. घडलेली घटना ही रत्नागिरी शहरा नजीकच्या कुमार भाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे गुरुवारी रात्री साडेनऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

  • 23 May 2026 10:10 AM (IST)

    23 May 2026 10:10 AM (IST)

    कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर, वीज कोसळून गाय ठार

    तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतिट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे

  • 23 May 2026 10:00 AM (IST)

    23 May 2026 10:00 AM (IST)

    FYJC Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी २५ मेपर्यंत मुदतवाढ

    FYJC Admission:  अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या (FYJC Admission) नियमित फेरीत सलग दुसऱ्या दिवशीही मोठा तांत्रिक गोंधळ पाहायला मिळाला. संकेतस्थळ (वेबसाईट) वारंवार हँग होणे आणि लॉगिन केल्यानंतर भरलेला डेटा गायब होणे, अशा गंभीर तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. या वाढत्या त्रासाची गंभीर दखल घेत अखेर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

    वेबसाईटवरील तांत्रिक त्रुटींमुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, अर्जाचा भाग-१ भरणे आणि अर्जाचा भाग-२ (महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम - College Options) लॉक करण्यासाठी सोमवार, २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीमुळे तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आपला अर्ज अचूक भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

  • 23 May 2026 09:55 AM (IST)

    23 May 2026 09:55 AM (IST)

    Rajya Sabha By-Election:  राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक 

    Rajya Sabha By -Election:   उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या रिक्त जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

     

  • 23 May 2026 09:50 AM (IST)

    23 May 2026 09:50 AM (IST)

    Pune Congress: काँग्रेसमध्ये दीप्ती चौधरी आणि प्रशांत जगताप यांच्या नियुक्तीमुळे अंतर्गत नाराजी 

    Pune Congress:  पुण्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत सध्या शहराध्यक्ष पदावरून मानापमानाचे राजकारण रंगताना दिसत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने पुणे शहरासाठी दोन स्वतंत्र शहराध्यक्षांची नियुक्ती केली असली, तरी या नव्या प्रयोगामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी उफाळून आली आहे.

    पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानुसार, पुणे शहराच्या पश्चिम भागासाठी माजी आमदार दीप्ती चौधरी यांची, तर पूर्व भागासाठी प्रशांत जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे. पक्षाची वाढ करणे आणि स्थानिक पातळीवर संघटन अधिक बळकट करणे हा या दुहेरी नियुक्तीमागील मुख्य हेतू असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.

  • 23 May 2026 09:45 AM (IST)

    23 May 2026 09:45 AM (IST)

    Inflation Warning: इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची दुसरी लाट येण्याचा 'आरबीआय'चा इशारा

    Inflation Warning: फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या इस्रायल-इराण आणि त्यानंतरच्या अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक पातळीवरील तणाव अजूनही निवाळलेला नाही. दिवसेंदिवस या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता अधिक गडद होत चालली असून, या संघर्षाचा थेट फटका जागतिक ऊर्जा पुरवठ्याला बसला आहे. या जागतिक ऊर्जा संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला असून देशात महागाई वाढली आहे.

    याच पार्श्वभूमीवर, आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशाला एक मोठा आणि धोक्याचा इशारा दिला आहे. आखाती देशांमधील युद्धाची ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास, भारतात महागाईची दुसरी लाट (Second Wave of Inflation) येऊ शकते, असा इशारा केंद्रीय रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात दिला आहे. यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 23 May 2026 09:40 AM (IST)

    23 May 2026 09:40 AM (IST)

    Maharashtra Weather Update: विदर्भात उष्णतेचा हाहाकार, ब्रह्मपुरीत ४७.१ अंश सेल्सिअस तापमान 

    Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीचा बदल पाहायला मिळत असून, राज्यभरात कुठे कडक ऊन तर कुठे मुसळधार पाऊस अशी दुहेरी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा इशारा जारी केला आहे.

    विदर्भात सूर्य आग ओकत आहे, ब्रह्मपुरीत उच्चांकी तापमान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेचा कहर झाला असून, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वोच्च म्हणजे ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भातील अनेक भागांत तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. हवामान विभागाने पुढील सतर्कतेचे इशारे दिले आहेत:

    रेड अलर्ट: अमरावती, अकोला आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना आजही उष्णतेचा 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

    ऑरेंज अलर्ट: नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट पाहता 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

  • 23 May 2026 09:35 AM (IST)

    23 May 2026 09:35 AM (IST)

    Gold Price Today: सोन्याच्या सुसाट दरवाढीला ब्रेक; मुंबई आणि दिल्लीत भावात मोठी घसरण

    Gold Price Today:  गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वायू वेगाने धावत होते, मात्र आज या दरवाढीला अखेर ब्रेक लागला असून देशभरात सोन्याच्या दरातील वाढ थांबली आहे. २३ मे रोजी सकाळी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५९,६५० रुपयांपर्यंत घसरला आहे. आदल्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ६०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,६४,९०० रुपयांवर आला होता.

  • 23 May 2026 09:30 AM (IST)

    23 May 2026 09:30 AM (IST)

    Cockroach Janta Party:   ट्विटरनंतर अभिजीत दीपके यांचे इन्स्टाग्राम अकाउंटही हॅक

    Cockroach Janta Party: सोशल मीडियावर अवघ्या काही दिवसांत कोट्यवधी फॉलोअर्स मिळवून धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना हॅकर्सनी आणखी एक मोठा झटका दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे ट्विटर (X) खाते हॅक झाले होते, आणि आता त्यांचे अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) खातेही हॅकर्सनी हायजॅक केले आहे.

    अभिजीत दीपके यांनी त्यांचे इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याची माहिती देणारा स्क्रीनशॉट स्वतः 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट केला आहे. यासोबतच त्यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी 'मेटा' (Meta) ला टॅग करत आपली व्यथा मांडली आहे. "मला माझे इन्स्टाग्राम अकाउंट ॲक्सेस करता येत नाहीये. हा ॲक्सेस पूर्णपणे संपला आहे.

  • 23 May 2026 09:25 AM (IST)

    23 May 2026 09:25 AM (IST)

    America Iran War: इराणवर मोठ्या लष्करी हल्ल्याच्या तयारीत अमेरिका 

    America Iran War:  इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता अत्यंत टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचले असून, जागतिक स्तरावर शांततेचे प्रयत्न सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका एकीकडे जगासमोर युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी आणि प्रयत्न करत असल्याचे दाखवत असली, तरी पडद्यामागे त्यांचा काहीतरी वेगळाच आणि मोठा डाव असल्याचे दिसून येत आहे. इराणसोबतचे हे युद्ध अधिकृतपणे थांबवण्यापूर्वी अमेरिकेला इराणवर एक अत्यंत भयंकर आणि मोठी लष्करी कारवाई करायची असून, त्याबाबतची जोरदार तयारी अमेरिकेकडून सुरू आहे. या वाढत्या तणावादरम्यान, पाकिस्तानचे फील्ड मार्शल असिम मुनीर हे तातडीने इराणची राजधानी तेहरानमध्ये दाखल झाले आहेत.

Maharashtra to National And International Breaking News:

Satara Heavy Rainfall: कण्हेरीत ढगफुटीसदृश्य पाऊस; ओढ्यांना पूर

Satara Heavy Rainfall: तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतिट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या परिसरात नागरिकांना शुक्रवारी उकाडा असह्य झाला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाले. तर दुपारी दीड वाजता पावसाला सुरुवात झाली. मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली

 

Web Title: 23rd may 2026 marathi news maharashtra national international breaking sports crime middle east war breaking updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; बड्या नेत्याच्या नावाची चर्चा
1

Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक; बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

विधान परिषदेतील जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी; भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी…
2

विधान परिषदेतील जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी; भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी…

MLC Election 2026: विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत धुसफूस? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
3

MLC Election 2026: विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत धुसफूस? संजय शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण

Maharashtra Breaking News Updates Today:सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ; अवघ्या ८ दिवसांत १ कोटीहून अधिक फॉलोअर्स
4

Maharashtra Breaking News Updates Today:सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा धुमाकूळ; अवघ्या ८ दिवसांत १ कोटीहून अधिक फॉलोअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.