Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

शिक्षणासोबतच खेळांनासुद्धा विशेष महत्व आहे. पण अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नाही. यात १४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १,५७१ शाळांचा समावेश आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2026 | 03:00 PM
जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

Follow Us
Follow Us:

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीणराव विकासावरी शिक्षणासोबतच खेळांनाही महत्त्वाचे स्थान आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगण उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची या बाबतीतील स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण १,५७१ शाळा असून, त्यापैकी तब्बल २८३ शाळांकडे स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नाही.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्हा परिषदेच्या १,५७१ शाळांपैकी १,२८८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध आहे. मात्र, २८३ शाळांमधील विद्यार्थ्यांना योग्य क्रीडांगणाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळांच्या वेळापत्रकात दर आठवड्याला खेळांसाठी दोन ते चार तासांचा वेळ निश्चित करण्यात आला असतो. अशा परिस्थितीत मैदानच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसमोर ‘खेळायचे तरी कुठे?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शाळांकडून विद्यार्थ्यांना क्रीडा उपक्रमांसाठी इतर उपलब्ध मैदानांवर नेले जाते. तर काही शाळा खासगी भूखंड, व्यायामशाळा, सार्वजनिक ठिकाणे अथवा सरकारी जमिनीचा वापर क्रीडा उपक्रम आणि स्पर्धांसाठी करीत आहेत. तसेच अंजनगाव सुर्जी तालुका मुख्यालयातही अद्याप स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उपलब्ध झाले नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव दीर्घकाळापासून प्रलंबित आहे.

शहराच्या आसपास योग्य जागा उपलब्ध नसल्याने हा विषय पुढे सरकू शकलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या क्रीडा सुविधा अखेर कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. सार्वजनिक ठिकाणांचा आधारः क्रीडांगण उपलब्ध नसले तरी विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमांना पूर्णपणे ब्रेक लागला नाही. अनेक शाळा परिसरातील खासगी भूखंड, व्यायामशाळा, सार्वजनिक ठिकाणे अथवा सरकारी जमिनीचा वापर करून विद्याथ्यर्थ्यांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत आहेत. मात्र, ही ठिकाणे कायमस्वरूपी आणि पुरेशा क्रीडा सुविधांना पर्याय ठरू शकत नाहीत.

राज्याचे आरोग्य मंत्री कुठे आहेत? रुग्णालयाच्या फायर ऑडिटचे काय झाले? अमरावतीच्या घटनेवरुन सपकाळ संतापले

शाळांची मान्यता आणि तपासणी प्रक्रियेत क्रीडांगणासह विविध आवश्यक सुविधांना महत्त्व दिले जाते. माध्यमिक शाळांची दर तीन वर्षांनी ११ निकषांच्या आधारे तपासणी केली जाते. यामध्ये क्रीडांगण, मुख्याध्यापक कक्ष, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ग्रंथालय, अध्यापन-अध्ययन साहित्य तसेच शाळेची सुरक्षा आणि संरक्षक भिंत आदी सुविधांचा समावेश आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या २८३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे क्रीडांगण उपलब्ध नसणे हा गंभीर प्रश्न आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 283 zilla parishad schools lack playgrounds sports development stalled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Amaravati
  • maharashtra
  • Maharashtra Schools

संबंधित बातम्या

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
1

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
2

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
3

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के
4

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.