Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

Ganeshotsav 2026:श्री गणेशमूर्तींच्या मिरवणूक मार्गावरील तब्बल २० स्पीड ब्रेकर आणि उपरस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेश मंडळांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान ब्रेकरमुळे गणेशमूर्तीची विटंबना झाल्यास संबंधित ठिकाणीच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 05:58 PM
श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा (फोटो सौजन्य-ChatGPT)

श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गणेशमूर्तींच्या मिरवणुकीत ब्रेकरचा अडथळा
  • ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
  • गणेश मंडळांचा प्रशासनाला गंभीर इशारा
 

नाशिक: शहरातील रस्त्यांवर अगोदरच पडलेले खड्डे व मदतीला जागोजागी स्पीड ब्रेकर टाकून रस्ता अडविण्यामुळे पंधरा दिवसांवर येवून ठेपलेल्या गणरायांच्या मिरवणूकीवरही विघ्नाचे सावट आहे. एकीकडे दुर्घटना टाळण्यासाठी मुर्तीची स्ट्रक्चर ऑडीट करण्याचा आग्रह धरला जात असतांना दुसरीकडे शहरातील प्रमुख मिरवणूक (Ganeshotsav 2026) मार्गावर अलिकडच्या काळात २० ठिकाणी ब्रेकर टाकण्यात आल्याने दुर्घटना होवून मुर्ती खंडीत होण्याची भिती गणेशोत्सव महामंडळाने व्यक्त केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र तयारी केली जात असून, यापुर्वीच पोलीस, मनपाने सार्वजनिक मंडळांची बैठक घेवून त्यांच्या मागण्या व अडचणी जाणून घेतल्या.

त्यात सर्वप्रथम रस्त्यांवरील खड्यांकडे लक्ष वेधले गेले. जागोजागी खड्डे, रस्त्याच्या कडेला साचणाऱ्या पाण्यामुळे गणेश मंडपाची उभारणी करणेही अवघड होणार असल्याची जाणिव मंडळांनी करून दिली. अजून रस्त्यांवरील खड्यांचा प्रश्न पुर्णतः मिटलेला नाही. प्रमुख मार्गावर तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम केले जात असले तरी, उपरस्त्यांचा प्रश्न कायम आहे. अशातच गेल्या तीन महिन्यांपासून मनपाकडून रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिकांच्या मागणीवरून प्लॅस्टिकचे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून, मुख्य रस्त्याला येवून मिळणाऱ्या उपरस्त्यांच्या कोपऱ्यावरच प्रामुख्याने हे ब्रेकर टाकले गेले आहेत.

Ganpati Special Train: कोकणातील चाकरमान्यांसाठी खुशखबर! दादरहून सुटणार ‘मोदी एक्सप्रेस’; जाणून घ्या वेळ, थांबे अन् बुकिंग

शहरात सुमारे चारशेहून अधिक ठिकाणी ब्रेकर टाकण्यात आले आहे. त्यामुळे अगोदरच खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था जर्जर झालेली असताना त्यात ब्रेकरची भर पडली. याचा परिणाम गणेशोत्सवावर होणार आहे. एम. जी. रोडसह मुख्य विसर्जन व आगमन मागाँवर प्रमाणापेक्षा मोठे खड्डे पडले आहेत. एम. जी. रोडवर वाहनांचा वेग ताशी २० किमीपेक्षा जास्त असू शकत नाही, त्यातच या मार्गावर २० पेक्षा अधिक स्पीड ब्रेकर्स टाकण्यात आले आहेत. अशा बिकट परिस्थितीतून गणेशमूर्ती घेऊन जाणारी वाहने कशी जाणार, असा प्रश्न महामंडळाने उपस्थित केला आहे.

मूर्तीचे स्ट्रक्चरल प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबईतील मुर्ती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना प्रतिष्ठापणा करण्यात आलेल्या मुर्तीच स्ट्रक्चरल प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. एकीकडे मुर्तीची भक्कमता तपासणाऱ्या प्रशासनाने मात्र रस्त्यांवरील खड्डे व स्पीड ब्रेकरच्या अडथळ्यांबाबत मात्र विचार केलेला नाही.

शहरातील प्रत्येक मार्गावर ब्रेकर

सार्वजनिक गणेशोत्सव कॉलनी, सोसायट्या, मोठ्या रस्त्यांवर साजरा केला जातो. श्रींची प्रतिष्ठापणा व विसर्जन हे दोन्ही सोहळे वाजत गाजत मिरवणूकीने साजरे होतात. लहान, मोठ्या वाहनात श्रींची मुर्ती ठेवली जाते. अशा वेळी रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच स्पीड ब्रेकरचा अडथळा निर्माण होण्याची भिती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने व्यक्त केली आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

प्रशासनाच्या सूचनेनुसार गणेशमूर्ती सक्षम असल्याचे स्ट्रक्चरल इंजिनिअरचे प्रमाणपत्र मंडळे घेतीलही, पण रस्त्यांवरील खड्चांचे काय? स्वागत मिरवणुकीदरम्यान खड्ड्यांमुळे अपधात होऊन एखादी गणेशमूर्ती पडल्यास ज्या खड्यात मूर्ती पडेल, त्याच खड्हुच्चात ती स्थापन केली जाईल, प्रशासनाने येत्या १० सप्टेंबर पर्यंत खड्डे बुजवावेत, अशी प्रतिक्रिया गणेशोत्सव महामंडळा अध्यक्ष समीर शेटे यांनी दिली.

प्रसाद तपासणीला विरोध

प्रसाद वाटपापूर्वी अन्न व औषध 66 विभागाकडून प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केली जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रसादाच्या स्वच्छतेची आणि गुणवत्तेची स्वतः पूर्ण काळजी घेतात, त्यामुळे अन्न व औषध विभागाने याबाबत कोणतीही बळजबरी केल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, अशी माहिती अध्यक्ष हिंदू एकता रामसिंग बावरी यांनी दिली.

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

Web Title: Ganeshotsav 2026 20 speed breakers pose hurdle on shree procession route potholes remain concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
1

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
2

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
3

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
4

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.