Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Accident : साताऱ्यात भीषण अपघात; कार दुभाजकावर आदळली अन्…

राजवाड्यावरून पोवई नाक्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 11, 2025 | 05:53 PM
Satara Accident : साताऱ्यात भीषण अपघात; कार दुभाजकावर आदळली अन्...

Satara Accident : साताऱ्यात भीषण अपघात; कार दुभाजकावर आदळली अन्...

Follow Us
Follow Us:

सातारा : राजवाड्यावरून पोवई नाक्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला. मात्र, नागरिकांनी तीन जखमींना तातडीने कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. हा अपघात शुक्रवारी रात्री अकरा वाजता झाला.

सागर गाडे, शुभम पवार (रा. करंजे पेठ, सातारा), साहील जमादार (बुधवार नाका, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघे रात्री कारमधून राजवाड्यावरून पोवई नाक्याकडे निघाले होते. यावेळी साहील जमादार कार चालवत होता. महाराजा सयाजीराव शाळेसमोर आल्यानंतर कारचालक साहील याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार आदळली. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने नागरिक घटनास्थळी धावले. कारने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी जखमी तरूणांना तातडीने कारमधून बाहेर काढले. त्यानंतर सातारा नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. हवालदार कारळे अधिक तपास करीत आहेत.

अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे कारचेही फारसे नुकसान झाले आहे. जखमी तरूणांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली.

दीर- भावजयचा मृत्यू

पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महिला पोलिसाला कारने उडवले

राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 3 people have been injured in a terrible accident in satara nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • Car Accident
  • maharashtra news
  • Satara Accident
  • Satara Police

संबंधित बातम्या

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम
1

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
3

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

महाराष्ट्रात आज काय काय घडलं?… वाचा आजच्या घडामोडी !
4

महाराष्ट्रात आज काय काय घडलं?… वाचा आजच्या घडामोडी !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.