Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक कोंडी मुक्तीसाठी ३०० कर्मचारी; पोलीस आयुक्तांचे ठोस पाऊल

आता वाहतूक शाखेला शिस्त लागेल अशी अपेक्षा असून, त्यादृष्टीने पोलीस आयुक्तांनी ठोस पाऊल उचलले आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मनुष्यबळाचे देखील कारण दिले जात असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी वाहतूक शाखेला देत वाहतूक नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 21, 2022 | 06:55 PM
वाहतूक कोंडी मुक्तीसाठी ३०० कर्मचारी; पोलीस आयुक्तांचे ठोस पाऊल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या “कारवाई ब्रेक”नंतरही पुन्हा कारभाराची परिस्थिती “जैसे थी”च झाल्याने अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचा सर्व कारभार “कडक शिस्ती”च्या अधिकाऱ्यांकडे सोपवत वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना रिपोर्ट करण्याचे आदेश देत कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता वाहतूकीला नाही पण, वाहतूक शाखेला तरी शिस्त लागेल, अशी अपेक्षा पोलीस दलातचं व्यक्त केली जात आहे.

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे वाहतूक शाखेचा कार्यभार देण्यात आला असून, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे वेळोवेळी  नवटके यांना वाहतूक शाखे संदंर्भातील कामकाज व कर्तव्याचा अहवाल सादर करतील असे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश दिले असून, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी देखील वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतचं वाहतूक शाखेला शिस्त लागेल, अशी अपेक्षा आहे.

शहरात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण आहेत. पण, त्यानंतरही वाहतूक पोलीस चौकातील नियोजन न करता आपला कोपरा धरून दंड वसूलीवर भर देत असल्याचे पाहिला मिळाले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर ठप्प होत असतानाही हे वाहतूक पोलीस रस्त्यांवर थांबायला तयार नसल्याचे दिसल्यानंतर सह पोलीस आयुक्तांनी कारवाई बंदचे आदेश देत रस्त्यांवर उभा राहून वाहतूक नियमन करण्यास सांगितले. पण, त्याचा परिणाम या वाहतूक शाखेवर झाला नाही. त्यात एका तरुणाने अलका चौकात वाहतूक पोलिसांच्या निषेधार्थ आंदोलन केले. तत्पुर्वी वाहतूक शाखेच्याच एका पोलीस निरीक्षकांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या बॉडीगार्डची अतिवरिष्ठांकडे तक्रार केल्याचे प्रकरण नुकतेच घडले होते. अशा अनेक कारणामुळे वाहतूक शाखा सतत चर्चेत होती.

पण, आता वाहतूक शाखेला शिस्त लागेल अशी अपेक्षा असून, त्यादृष्टीने पोलीस आयुक्तांनी ठोस पाऊल उचलले आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मनुष्यबळाचे देखील कारण दिले जात असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरीक्त ३०० कर्मचारी वाहतूक शाखेला देत वाहतूक नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात रस्त्यांवर वाहतूक पोलीस उभा असल्याचे पाहिला मिळणार असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा फायदा देखील होणार आहे.

Web Title: 300 employees for traffic congestion relief a concrete step by the commissioner of police nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2022 | 06:55 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amitabh Gupta
  • chandrakant patil
  • devendra fadanvis
  • Pune

संबंधित बातम्या

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
1

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
4

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.