सांगली: मिरजमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिरजेत ऊसतोड मजुरांचा भीषण अपघात (Miraj Solapur Accident)झाल्याची माहिती समोर आली आहे. ऊसतोड करुन घरी परत येत असताना मजुरांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरजार धडक दिली. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
[read_also content=”भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं जपान, 6.1 रिश्टर स्केल तिव्रता; लोकांना घरांपासून दूर राहण्याचा इशारा! https://www.navarashtra.com/world/earthquake-in-japan-of-6-1-richter-scale-nrps-519824.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील काही मजूर सोमवार ऊसतोडणीच्या कामाला गेले होते. ऊसतोडणीचं काम आटोपून घरी परत येत असताना नागपूर रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ त्यांचा टॅक्ट्रर बंद पडला. चालक ट्रॅक्टर दुरुस्त करत असताना सगळे मजूर खाली उतरले आणि रस्त्यावर उभे होते. तितक्यात पाठीमागून आलेल्या ट्रकने मजूरांना धडक दिली. यावेळी चार मजुरांसह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले. मृतांमधील तीनजण चिखलगीचे, तर एकजण शिरनांदगीचा रहिवाशी आहे.
मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय 30 रा. शिरनांदगी, जगमा तम्मा हेगडे वय 35, दादा आप्पा ऐवळे वय 17, निलाबाई परशुराम ऐवळे वय 3 रा. चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला आणि 11 जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.या अपघाताची वृत्त समजतात चिक्कलगी किंवा शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली आहे.