जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण
सर्वांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ही चूक कोणत्याही हॅकर्स ग्रुपकडून झाली नाही. ही चूक WhatsApp ची पेरेंट कंपनी Meta च्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. एवढंच नाही तर 9To5Mac ने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, कंपनीला याबाबत 8 वर्षांआधीच माहिती देण्यात आली होती. मात्र तरी देखील कंपनीने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं 2017 मध्ये University of Vienna च्या रिसर्चर्सने या त्रुटीकडे लक्ष वेधत सांगितलं होतं की, या त्रुटीमुळे WhatsApp युजर्सचे मोबाईल नंबर अगदी सहज लीक केले जाऊ शकतात. हेच आता घडलं आहे. एवढंच नाही तर रिसर्चर्सने अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात अमेरिकेतील 3 करोडहून अधिक लोकांचे मोबाईल नंबर एकत्र केले होते. त्यानंतर टिमने हा डेटा डिलीट केला आणि या त्रुटीबाबत पुन्हा एकदा मेटाला माहिती दिली होती. यासोबतच सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने या त्रुटीला simple नाव दिलं आणि त्यानंतर असा इशारा दिला होता की, जर हे तंत्रज्ञान हॅकर्सच्या हाती लागले तर तर हा इतिहासातील सर्वात मोठ्या डेटा लीकमध्ये बदलू शकतो.
रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ही समस्या WhatsApp च्या नंबर-वेरिफिकेशन प्रोसेसमध्ये आहे. जेव्हा जेव्हा एखादा यूजर त्यांच्या फोनमध्ये नवीन नंबर सेव्ह करतो तेव्हा अॅप तो नंबर WhatsApp वर सक्रिय आहे की नाही हे तपासते. या प्रक्रियेतील एका त्रुटीमुळे मोठी डेटा लीक झाली आहे.
या अहवालाला प्रतिसाद देत मेटाने म्हटले आहे की, ही समस्या त्यांच्या बग बाउंटी प्रोग्रामचा भाग आहे आणि व्हिएन्ना विद्यापीठाच्या सहकार्याने ही मोठी त्रुटी शोधण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ती त्यावर उपाय शोधत आहे. मात्र यामुळे यूजर्सची चिंता वाढली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
Ans: WhatsApp हा एक मोफत मेसेजिंग अॅप आहे ज्याद्वारे टेक्स्ट, व्हॉईस, व्हिडिओ कॉल आणि मीडियाची देवाणघेवाण करता येते.
Ans: मोबाइल नंबर टाकून OTP व्हेरिफाय केल्यानंतर अकाऊंट तयार होते.
Ans: हो, इंटरनेट डेटा वापरतो, वेगळे शुल्क नाही.






