(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
India’s Got Talent: डोक्यावर ठेवलेल्या चुलीवर चहा! मलायका अरोराचा अनोखा स्टंट, चाहते थक्क
२०२३ मध्ये अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या घरात गोंडस बाळाचे हास्य घुमले. गेल्या महिन्यात शूराने एका मुलीला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या लाडक्या मुलीचे नाव सिपारा असे ठेवले आहे. आता, जवळजवळ दोन महिन्यांनंतर, त्यांच्या मुलीची एक झलक त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहे. जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शूरा खान आणि अरबाज यांनी त्यांची मुलीच्या सिपाराची पहिली झलक एका संयुक्त पोस्टमध्ये शेअर केली आहे. एका फोटोमध्ये तिचे छोटे पाय दिसत आहेत आणि दुसऱ्यामध्ये तिचे छोटे हात. आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘सर्वात लहान हात आणि पाय, पण आमच्या हृदयाचा याची सर्वात मोठा जागा आहे.’ असे लिहून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
सिपारा नावाचा अर्थ काय आहे?
अरबाज आणि शूरा यांनी ८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले. त्यांनी पोस्टमध्ये तिचे नाव सिपारा असे ठेवले आहे. माहितीनुसार, याचा धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे, ज्याचा अर्थ “पवित्र भाग” किंवा “कुराणचा भाग” असा होतो. पर्शियन भाषेत, “सिपारा” चा अर्थ “सुंदर आणि प्रिय” असा होतो. या सुंदर नावाचा अर्थ जाणून चाहते देखील खुश झाले आहेत. आणि चाहत्यांसह अनेक कलाकार त्यांना कंमेंट करून चांगला प्रतिसाद देत आहेत.
अरबाज आणि मलायकाचे १९ वर्षांचे वैवाहिक जीवन
अरबाजने १९९८ मध्ये मलायकाशी लग्न केले. त्यांचा मुलगा अरहानचा जन्म २००२ मध्ये झाला. या जोडप्याने २०१६ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अरबाज जॉर्जियाला डेट करू लागला तेव्हा मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. अरबाजने शूराशी लग्न केले. दरम्यान, मलायकाचे अर्जुनशी ब्रेकअप झाले आहे. अरबाज ५८ वर्षांचा आहे तर शूरा ३५ वर्षांची असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ दोघांमध्ये २३ वर्षांचा फरक आहे.






