Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: जायकवाडीत ४७.८७ टक्के साठा! उन्हाच्या तीव्रतेने होतेय दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी उभारण्यात आलेली समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 02, 2026 | 03:00 PM
जायकवाडीत ४७.८७ टक्के साठा! उन्हाच्या तीव्रतेने होतेय दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन

जायकवाडीत ४७.८७ टक्के साठा! उन्हाच्या तीव्रतेने होतेय दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन

Follow Us
Follow Us:

मराठवाड्‌याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नाथसागर अर्थात जायकवाडी धरण्याच्या पाणीसाठ्यावर उन्हाच्या तीव्रतेचा मोठा परिणाम होत असून, दररोज कोट्यवधी लिटर पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. वाढते तापमान, वाढती मागणी आणि सततचा पाण्याचा विसर्ग यामुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला आहे. गुरुवार (दि. ३०) रोजी धरणातील एकूण पाणीसाठा १७७७.३७७ दलघमी नोंदवण्यात आला असून, त्यापैकी जिवंत साठा १०३९.२७१ दलघमी अर्थात ४७.८७ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा ८७५.३५० दलघमी (४०.३२%) इतका होता. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी उभारण्यात आलेली समांतर जलवाहिनी योजना कार्यान्वित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच डिएमआयसी अंतर्गत शेंद्रा औद्योगिक क्षेत्रासाठी सुरू असलेला पाणीउपसा ही अतिरिक्त गरज निर्माण करत आहे.(फोटो सौजन्य – AI)

जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

औद्योगिक विस्तार आणि शहरीकरणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, धरणातील उपलब्ध साठ्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. एप्रिलपासूनच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, मे महिन्यात ते ४३ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून, साठ्यातील घट अधिक तीव्र होण्याचा धोका आहे. नाथसागर धरणावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंब आहे. तसेच लाखो हेक्टर शेती विशेषतः कापूस, ऊस आणि भाजीपाला ही कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे साठ्यातील घट ही केवळ आकडेवारीपुरती मर्यादित न राहता, ती थेट जनजीवन आणि अर्थकारणावर परिणाम करणारी ठरत आहे.

सध्या शेतीसाठी उजव्या कालव्यातून १५०० क्युसेक (३.६६९९ दलघमी) आणि डाव्या कालव्यातून २२०० क्युसेक (५.३८२५ दलघमी) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पाणीपातळी १५१०.९२ फूट (४६०.५२८ मीटर) इतकी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, दररोज सुमारे १.९०२ दलघमी पाणी केवळ वाष्पीभवनामुळे कमी होत असून, हे प्रमाण कोट्यवधी लिटरमध्ये असल्याने धरणाच्या साठ्यावर मोठा परिणाम होत आहे.

Maharashtra Politics : विरोधी पक्षांचा असंवैधानिक पवित्रा…! महिला आरक्षणावरुन चव्हाण पिता-पुत्री आक्रमक

तिहेरी ताणामुळे परिस्थिती गंभीर:

समातर जलवाहिनी, औद्योगिक पाणीउपसा आणि शेतीसाठी सुरू असलेला विसर्ग या तिन्ही घटकामुळे धरणावर तिहेरी ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, वापरावर नियंत्रण आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनाची अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे. एकंदरीत्, दररोज कोट्यवधी लिटर पाणी बाष्पीभवनामुळे हवेत जात असताना वाढती मागणी ही परिस्थिती अधिकच गभीर करत असून, नाथसागर धरणाची धोक्याची घंटा आता स्पष्टपणे वाजू लागली आहे. आगामी उन्हाळा मराठवाड्यासाठी कठीण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 47 87 percent stock in jayakwadi millions of liters of water evaporates every day due to the intensity of summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Jalna District
  • jalna news
  • Jayakwadi Dam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.