Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माघी यात्रेमुळे भरला विठुरायाचा खजिना, ‘इतक्या’ कोटींचे भाविकांनी दिले दान, उत्पन्नात डायरेक्ट चौपट वाढ

माघी यात्रेमध्ये (Maghi Yatra) सुमारे 8 लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरमध्ये येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे यंदा सोन्याच्या स्वरुपात तब्बल 1 कोटी 59 लाख 90 हजार रुपयांचे दागिने आले आहेत. याशिवाय 6 लाख 71 हजार रुपयांचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत.

  • By साधना
Updated On: Feb 09, 2023 | 12:12 PM
ओटीटीवर पाहता येणार विठोबाच्या पाऊलखुणांवर चालायला लावणारे चित्रपट, आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तीचा गजर अनुभवा

ओटीटीवर पाहता येणार विठोबाच्या पाऊलखुणांवर चालायला लावणारे चित्रपट, आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तीचा गजर अनुभवा

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : यंदाच्या माघी यात्रेमध्ये (Maghi Yatra) पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Temple) समितीचे उत्पन्न चार पटीने वाढले आहे. विठूरायाच्या चरणी तब्बल 4 कोटी 88 लाख 62 हजार 28 रुपयांचे दान करण्यात आले आहे. यामध्ये सोने, रोख देणगी पावती, दानपेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश आहे.

[read_also content=”तुर्कस्थानात झालेल्या भूकंपामुळं पृथ्वीच्या नकाशावर मोठे बदल, भारत सरकतोय युरोपकडे, पाण्याच्या- पेट्रोलच्या वाहिन्याही दिशा बदलण्याची शक्यता https://www.navarashtra.com/india/due-to-the-earthquake-in-turkey-major-changes-in-the-map-of-the-earth-india-is-moving-towards-europe-water-petrol-channels-are-also-likely-to-change-direction-nrdm-368418.html”]

माघी काळात वसंतपंचमीला एका भाविकाने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर जवळपास पावणेदोन कोटी रुपयाचे सोन्या चांदीचे दान दिले आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात फार मोठी वाढ झाली आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी माघीसाठी विक्रमी संख्येने वारकरी आले होते. या काळात सुमारे पाच लाख भाविकांनी श्रींचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. भाविक संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

यंदाची माघ शुद्ध जया एकादशी 1 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यात्रा कालावधी 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी असा होता. या काळात मंदिर समितीला प्राप्त झालेल्या उत्पन्नाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा माघी यात्रा काळात मंदिर समितीचे उत्पन्न मागील वर्षी झालेल्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास चौपट झाले आहे. यंदा माघी एकादशीला पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने वारकरी आले होते. यावेळी कार्तिकी यात्रेहून अधिक विक्रमी माघी यात्रा झाल्याचे दिसून आले. एकादशीच्या दिवशी सुमारे पाच लाख वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

यात्रा काळात सुमारे 8 लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरमध्ये येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे यंदा सोन्याच्या स्वरुपात तब्बल 1 कोटी 59 लाख 90 हजार रुपयांचे दागिने आले आहेत. याशिवाय 6 लाख 71 हजार रुपयांचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत. भाविक मोठ्या संख्येने आल्याने मंदिर समितीच्या वेदांता, व्हिडीओकॉन, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथून एकूण 19 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पायावर 32 लाख रुपये देणगी जमा झालेली आहे. मंदिर समितीच्या हुंडी पेटीतून गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्प्पट म्हणजे 78 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ऑनलाईन स्वरुपात 12 लाख 41 हजार रुपये देणगी जमा झाली आहे. यावरून हे स्पष्ट होते की यंदाची माघी यात्रा मंदिर समितीसाठी देवाचा खजिना भरणारी झाली आहे.

Web Title: 4crore 88 lakh rupees donated to vitthal rukmini temple of pandharpur nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2023 | 12:10 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pandharpur News
  • Vitthal Rukmini Temple

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.