Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात पावसाळ्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई, महापालिका क्षेत्रात 51 टक्के नालेसफाई पूर्ण

पावसाळ्यात मुंबई आणि तिच्या लगतच्या जिल्ह्याना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे ठिकठिकाणी पाणी भरणे. हीच समस्या टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 22, 2025 | 07:50 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि अन्य लगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. काही मिनिटांच्या पावसातच रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात होते, त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडथळा, पायाभूत सुविधांचा अभाव आणि आरोग्याच्या समस्या भेडसावतात.

पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे मुख्य कारण म्हणजे नालेसफाईचा अभाव. हे लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागाने यावर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. वेळेत आणि प्रभावीपणे सफाई न केल्यास दरवर्षीप्रमाणेच पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने यंदा वेळेवर तयारी करण्याचे ठोस पाऊल उचलले आहे.

दहशतवादविरोधी मोहीमेत यूएईचा भारताला पूर्ण पाठिंबा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची माहिती

ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईचे काम ५१ टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. यांत्रिक पद्धतीने होणारी मोठ्या नाल्यांची सफाई ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. आता प्रामुख्याने मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत अशा छोटे नाल्यांचा सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे २७८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने बहुतांश सफाई झालेली आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्रे जाऊ शकत नाहीत. तेथे आता नालेसफाईचे काम सुरू झाले आहे.

Rain Alert : सावधान! पुढचे 6 ते 7 दिवस तुफान पाऊस पडणार, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोका

नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. नाल्यांतून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलविण्यात यावा, असे निर्देश या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. नियोजित वेळेत नालेसफाईची कामे पूर्ण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नालेसफाईबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. तेथे येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी दिली.

Web Title: 51 percent drain cleaning completed in municipal area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Thane Municipal Corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू
1

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
2

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
3

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी
4

Thane : ठाण्यात गुंडगिरी आणि ड्रग्सविरोधात सर्वपक्षीय मोर्चा; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.