5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज
अरबी समुद्रात मान्सून दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसात केळमध्ये धडक देण्याची शक्यता आहे. दरम्यान या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. काही जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं असताना आता हवामान विभागाने पुढचे ६ ते ७ दिवस मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्यता वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रात कोकण, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यासह, ढगफुटीसदृश पावसाने ओढ्या नाल्यांना पूर
पूर्वमध्य अरबी समुद्रावर दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. हा पट्टा 23 मे 2025 च्या संध्याकाळच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम किनाऱ्यावर (गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून म्हणजे 22 ते 24 मे 2025 रोजी कोकण आणि गोव्यात आणि 24 मे 2025 रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात कोसळली दरड; आंबोली-गोवा मार्गावरील वाहतूक बंद
मान्सूनचा प्रवास असाच कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिला तर पुढील 2 ते 3 दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तसंच उष्णतेची लाटही येणार आहे. 22 ते 26 मे रोजी राजस्थानमध्ये तीव्र तर 22 आणि 23 मे रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पूर्व राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.