Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

ठाण्यात एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांच्या केबल संघटनेतील नियुक्तीची चर्चा रंगली आहे. शिंदे सेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू असताना आपण एमआयएममध्येच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांचाही त्यांनी उल्लेख केला.

  • By विवेक
Updated On: Oct 15, 2026 | 06:20 PM
yunus sheikh on eknath shinde

yunus sheikh on eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • सहर शेख यांच्या वडिलांची शिंदे सेनेशी जवळीक? ठाण्यात राजकीय चर्चा
  • ‘शिंदे साहेबांसोबत गेलं तर फायदाच’; जुन्या संबंधांचाही उल्लेख
  • शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचं युनुस शेख यांचं स्पष्टीकरण
 

ठाण्याच्या राजकारणात सध्या गोंधळाचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे सेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील राजकारण तापलेले असतानाच आता पुन्हा एक अजब राजकीय प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील ‘मुंब्रा हरा कर देंगे’ फेम एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांची एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित एका पदावर नियुक्ती झाली आहे. या न्यूकीमुळे ठाण्यातील राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

युनुस शेख यांना एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित केबल संघटनेत कळवा-मुंब्रा परिसराचं अध्यक्षपद मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, आपण अद्याप एमआयएममध्येच असून शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असं युनूस शेख यांनी स्पष्ट केलं आहे.

केबल संघटनेत पद, पण एमआयएममध्येच असल्याचा दावा

युनूस शेख यांच्या म्हणण्यानुसार, “केबल आणि इंटरनेटचा व्यवसाय हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा व्यवसाय आहे. केबल व्यावसायिकांसाठी एमआयएमची स्वतंत्र संघटना नसल्याने आपण केबल ऑपरेटरच्या संघटनेशी जोडले गेलो,” असं त्यांनी सांगितलं.

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

“या संघटनेत कळवा-मुंब्रा परिसराचं अध्यक्षपद मिळालं असलं, तरी त्याचा अर्थ आपण शिवसेनेत प्रवेश केला असा होत नाही. पक्षप्रवेश करायचा असता, तर एकनाथ शिंदे यांच्या हातून थेट नियुक्तीपत्र स्वीकारलं असतं,” असं त्यांनी म्हटलं.

‘एकनाथ शिंदे साहेब आमचेही बॉस’

युनुस शेख यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं. “एकनाथ शिंदे साहेब हे सर्वांचेच बॉस आहेत, आमचेही बॉस आहेत. शिंदे यांच्यासोबत गेल्यास फायदाच होईल.” असं मत व्यक्त करत त्यांनी शिंदे यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांचाही उल्लेख केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाचे एकनाथ शिंदे यांच्याशी सुमारे ४० वर्षांपासून संबंध आहेत. संकटाच्या काळात एकनाथ शिंदे आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं.

नियुक्तीपत्र आणि गमछ्यावरून पक्षप्रवेश ठरत नाही!

“शिवसेनेचं नियुक्तीपत्र मिळालं किंवा पक्षाचं चिन्ह असलेला गमछा घातला, म्हणजे पक्षप्रवेश झाला असं होत नाही. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले जुने संबंध आणि केबल व्यवसायामुळे आपण संघटनेशी जोडले गेलो, शिंदे यांनी भविष्यात आणखी एखादी जबाबदारी दिल्यास त्याबाबत विचार करू,” असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना सुरुवात झाली असली, तरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा नाकारला आहे. त्यामुळे त्यांच्या संघटनात्मक भूमिकेबाबत आणि एमआयएमशी असलेल्या संबंधांबाबत पुढे काय घडतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: युनुस शेख कोण आहेत?

    Ans: युनुस शेख हे ठाणे महानगरपालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील आहेत. ते केबल आणि इंटरनेट व्यवसायाशी संबंधित आहेत.

  • Que: युनुस शेख यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे का?

    Ans: युनुस शेख यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

  • Que: युनुस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय म्हटलं?

    Ans: 'एकनाथ शिंदे साहेब हे सर्वांचेच बॉस आहेत, आमचेही बॉस आहेत,' असं युनुस शेख म्हणाले.

Web Title: Yunus shaikh sahar shaikh eknath shinde mim thane politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Thane news

संबंधित बातम्या

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
1

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
2

Yunus Shaikh joins Shiv Sena: मोठी राजकीय घडामोड! ‘कैसे हराया’ फेम सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा
3

Pradeep Purnekar Case : राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी, पाच आरोपींना ओळखत असल्याचं सांगितलं; संजय राऊतांचा मोठा इशारा

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
4

Jalgaon News: ‘जलतारा’च्या विकासकामांना मंजुरी मिळणार? आमदार अमोल पाटलांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.