Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५७० रुपयाच्या वीजबिलाने केला महिला वीज कर्मचाऱ्याचा घात; कोयत्याने सपासप वार करत केला खात्मा

वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला करत खून केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2024 | 05:42 PM
५७० रुपयाच्या वीजबिलाने केला महिला वीज कर्मचाऱ्याचा घात; कोयत्याने सपासप वार करत केला खात्मा
Follow Us
Follow Us:

बारामती : वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन खात्मा केल्याची घटना मोरगाव (ता. बारामती) येथे आज सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा हाकनाक बळी गेला आहे.

मुळच्या लातूर शहरातील रहिवाशी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे या दहा वर्षापूर्वी दि. २९ ऑगस्ट 2013 रोजी महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या दहा वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांची सुटी उपभोगून त्या आज (दि. २४) मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या.बुधवारी (दि. २४) सकाळी ११.१५ च्या सुमारास त्या एकट्याच कार्यालयात होत्या. दरम्यान जणू काळ बनून संपूर्ण तयारीनिशी आलेल्या अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना बील जास्त आल्याचा जाब विचारला आणि एकामागोमाग एक असे जवळपास १६ वार रिंकू यांच्या हातापायावर तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु दुर्दैवाने उपचारा दरम्यान त्यांचे दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

५७० रुपयांच्या बिलासाठी हल्ला

ज्याने हल्ला केला त्या आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. त्या वीजबिलाचा ग्राहक क्रमांक 186640053549 असा असून, चालू एप्रिल २०२४ या महिन्याचे ६३ युनीट वीजवापराचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील १२ महिन्याचा वापर तपासला असता तो ४० ते ७० युनीटमध्ये आहे. थकबाकी नाही. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनीटने वाढला व त्याचे बील ५७० आले होते. हे बील वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच होते.

Web Title: 570 rupees electricity bill assaulted a female electricity worker murder in office by boy nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 05:42 PM

Topics:  

  • baramati
  • Baramati Crime News
  • crime news
  • Murder Case
  • pune crime news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.