Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वयंघोषित कॅप्टन’च्या ‘त्या’ कृत्याने हादरला महाराष्ट्र; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त, धार्मिक विधीच्या नावाखाली…

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्याच कार्यालय असून याच कार्यालयातून तो त्याचे कारनामे करत होता. या तपासादरम्यान पोलिसांना 58 व्हिडिओ सापडले असून, यामध्ये काही नामवंत महिला आणि सेलिब्रिटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 19, 2026 | 01:02 PM
सेक्स स्कँडलने हादरला महाराष्ट्र; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; धार्मिक विधीच्या नावाखाली चाळे

सेक्स स्कँडलने हादरला महाराष्ट्र; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; धार्मिक विधीच्या नावाखाली चाळे

Follow Us
Follow Us:

नाशिक : अशोक खरात उर्फ ‘स्वयंघोषित कॅप्टन’ याला नाशिक गुन्हे शाखा युनिट-१ ने अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्याच कार्यालय असून याच कार्यालयातून तो त्याचे कारनामे करत होता. या तपासादरम्यान पोलिसांना 58 व्हिडिओ सापडले असून, यामध्ये काही नामवंत महिला आणि सेलिब्रिटी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडिओंची सखोल चौकशी केली जात असून, यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही नामवंत महिला, वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींशी संबंधित संदर्भ असण्याची शक्यता आहे.

भोंदूबाबाने धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच या महिलेशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग करतो आणि त्यानंतर तिथेच महिलेशी गैरवर्तन करताना दिसत आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याप्रकरणी आरोपीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

6 दिवसांची पोलिस कोठडी

नाशिकमधील एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अशोक खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने आपल्याला धमकावून आणि गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला. पोलिसांनी आरोपीला बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास ताब्यात घेतले, त्यानंतर नाशिक जिल्हा न्यायालयाने खरातला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. २०२२ ते २०२४ या दरम्यान, अशोक खरातने अशा आणखी किती महिलांना फसवले याचा तपास सुरू आहे.

पाद्यपूजा करणाऱ्या रुपाली चाकणकर अडचणीत

सिन्नर तालुक्यात अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्तपदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात चर्चेत आला होता. अशोक खरात याची पाद्यपूजा करणाऱ्या रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

सुषमा अंधारेंचे आरोप चाकणकरांनी फेटाळले

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, जेव्हा एका संघटनेने खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता, तेव्हा चाकणकर यांनी त्या संघटनेकडून माफी मिळवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला. मात्र, चाकणकर यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. कॅप्टन खरातांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलिस तपासावर आपला पूर्ण विश्वास आहे, असे चाकणकरांनी म्हटले.

हेदेखील वाचा : Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; विरोधकांच्या मागणीला जोर

Web Title: 58 objectionable videos seized from ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • maharashtra news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
2

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश
4

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.