Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Crime : जास्त परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 70 लाखांना घातला गंडा

कराड तालुक्यातील सात जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2024 | 12:31 AM
Karad Crime : जास्त परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; तब्बल 70 लाखांना घातला गंडा
Follow Us
Close
Follow Us:

कराड : कराड तालुक्यातील सात जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी (रा. गांधीनगर-काले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद रमेश पाटील (रा. पंचरत्न अपार्टमेंट, आगाशिवनगर-मलकापूर, कराड) याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काले- गांधीनगर येथील अल्लाउद्दीन तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा या दोघांची आगाशिवनगर येथील प्रमोद पाटील याच्याशी ओळख झाली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचे प्रमोद पाटील याने त्या दोघांना सांगितले. तसेच त्यांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्या गुंतवणुकीची विश्वसार्हता म्हणून त्याच रकमेचे धनादेश आणि नोटरी करुन देण्याचेही प्रमोद पाटील याने कबूल केले. त्यानुसार अल्लाउद्दीन तांबोळी यांनी मार्च २०२२ मध्ये १० लाख ५० हजार रुपये, तर त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा यांनी २१ लाख रुपये प्रमोद पाटील याला दिले. मात्र, २०२२ पासून २०२४ पर्यंत प्रमोद पाटील याने दोघांनाही मूळ रक्कम अथवा त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार पैशाची मागणी करूनही प्रमोद पाटील याने त्यांना टाळले. तसेच शेअर मार्केट पडले आहे. थोड्या दिवसांनी पैसे देतो, असे सांगून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

हे सुद्धा वाचा : कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारी; येरवडा कारागृहात नेमकं काय घडलं?

अल्लाउद्दीन तांबोळी, श्यामसुंदर सारडा यांच्यासह अन्य पाच जणांकडून प्रमोद पाटील याने दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे, तसेच सर्वांची मिळून सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अल्लाउद्दीन तांबोळी यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांच्यासह प्रमोद पाटील याने हिना चेतन मोठा यांचे ३ लाख, जयकर जयसिंग पाटील यांचे ३ लाख, डॉ. नितीन नरेंद्रकुमार जाधव यांचे १० लाख, गणेश पाटील यांचे १० लाख, राजाराम पांडुरंग माने यांचे १५ लाख ५० हजार असे एकूण ७० लाख ५० हजार रुपये घेतले असल्याचे अल्लाउद्दीन तांबोळी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: 70 lakh has been defrauded with the lure of paying higher returns nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 12:31 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • maharashtra

संबंधित बातम्या

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल
1

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 3 कोटींना गंडा; 11 जणांवर गुन्हा दाखल
2

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 3 कोटींना गंडा; 11 जणांवर गुन्हा दाखल

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
3

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! दोनच दिवसात अनेक ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरला
4

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! दोनच दिवसात अनेक ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.