Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navrashtra Impact : शेवगावमधील हजारो झाडांच्या कत्तलीप्रकरणी सत्यजित तांबे आक्रमक! मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Navrashtra Impact : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि संगमनेर तालुक्यातील कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी आमदार सत्यजित तांबे आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित करण्यासह मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 25, 2026 | 08:14 PM
Navrashtra Impact : शेवगावमधील हजारो झाडांच्या कत्तलीप्रकरणी सत्यजित तांबे आक्रमक! मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Navrashtra Impact : शेवगावमधील हजारो झाडांच्या कत्तलीप्रकरणी सत्यजित तांबे आक्रमक! मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • ‘नवराष्ट्र’च्या बातमीने प्रशासनाचे धाबे दणाणले 
  • सत्यजित तांबे विधानपरिषदेत आवाज उठवणार
  • वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
 

पोपट पिटेकर, शेवगाव,अहिल्यानगर

Navrashtra Impact  : राज्यात एका बाजूला पर्यावरण संवर्धन आणि कोट्यवधींच्या वृक्षारोपण मोहिमांच्या घोषणांचे ढोल बडवले जात असताना, दुसरीकडे मात्र सरकारी यंत्रणेच्या वरदहस्ताने निसर्गाची नंदनवने उद्ध्वस्त केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि संगमनेर तालुक्यात झालेल्या बेसुमार व बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात आमदार सत्यजित तांबे अत्यंत आक्रमक झाले आहेत. या गंभीर प्रकरणी त्यांनी थेट राज्याच्या विधानपरिषदेत आवाज उठवण्याची घोषणा केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून निसर्गाचा बळी देणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आमदार तांबे हे थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे करणार आहेत.

 

‘नवराष्ट्र’च्या बातमीने प्रशासनाचे धाबे दणाणले

शेवगाव तालुक्यात हजारो जुन्या व डेरेदार झाडांची बेसुमार कत्तल झाल्याचा प्रकार ‘नवराष्ट्र’ने वृत्त प्रकाशित करून उघडकीस आणला होता. ‘नवराष्ट्र’च्या या बातमीचा मोठा दणका बसला असून, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेवगावपाठोपाठ संगमनेर तालुक्यातील निमोण गावातही अशाच प्रकारे बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे उघड झाले आहे. यावरून जिल्ह्यात वृक्षतोड माफियांचे जाळे पसरले असून प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर हजारो झाडांची कत्तल होणे हे वनविभागाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संगनमताशिवाय अशक्य आहे, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात प्रशासनाचा दुटप्पी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Ahilyanagar News: शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

नवीन वृक्षारोपणाला खो

निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी किंवा ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत ज्यांना नवीन झाडे लावायची आहेत, त्यांना वनविभागाकडून वेळेवर ना-हरकत प्रमाणपत्र आणि मंजुरी दिली जात नाही. तसेच एकीकडे नवीन झाडे लावण्यास प्रशासनाकडून सतत अडथळे निर्माण केले जात आहेत, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे जतन केलेली निसर्गाची संपदा असलेली जुनी आणि डेरेदार झाडे सर्रास तोडली जात आहेत.

 

Woman Delivery in Rickshaw : उल्हासनगरमध्ये रिक्षात महिलेची सुखरूप प्रसूती; पोलीस कर्मचारी आणि डॉक्टरांची तत्परता!

अधिकाऱ्यांनी एसी कार्यालये सोडलीच पाहिजेत

वनविभागाच्या आशीर्वादाने आणि दुर्लक्षामुळेच निसर्गाचा हा ऱ्हास सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ एसी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून पाहणी केली पाहिजे. एकीकडे नवीन झाडे लावण्यासाठी मंजुरी दिली जात नाही आणि दुसरीकडे उभी झाडे तोडणाऱ्यांना मोकळे रान दिले जाते; प्रशासनाच्या या मुजोरीमुळे जनतेत संतापाची तीव्र लाट आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केल्याशिवाय आणि दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटल आहे.

Kalyan News : ७० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ? कल्याणच्या आतिश खान कंपाऊंडचा प्रश्न ऐरणीवर

विधानपरिषदेत पडणार तीव्र पडसाद- प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर आणि भ्रष्ट कारभारावर आमदार तांबे यांनी तीव्र संघर्ष उभारण्याचा पवित्रा घेतला आहे. आगामी विधानपरिषद अधिवेशनात शेवगाव आणि संगमनेर येथील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा लावून धरत ते सरकारला धारेवर धरणार आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून वृक्षतोड माफियांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेवगावमध्ये वृक्षतोडीचे प्रकरण काय आहे?

    Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हजारो जुन्या आणि डेरेदार झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची बातमी ‘नवराष्ट्र’ने प्रसिद्ध केली होती.

  • Que: वृक्षतोडीप्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांनी काय भूमिका घेतली आहे?

    Ans: या प्रकरणी विधानपरिषदेत आवाज उठवणार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

  • Que: शेवगावव्यतिरिक्त कोणत्या भागात वृक्षतोड झाल्याचा आरोप आहे?

    Ans: संगमनेर तालुक्यातील निमोण गावातही बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप आहे.

Web Title: Navrashtra impact shevgaon illegal tree cutting satyajit tambe high level inquiry rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • environment
  • Forest Department
  • maharashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता
1

पुणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट! १० तालुके दुष्काळग्रस्त; टँकरग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या
2

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप
3

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
4

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.