Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक चव्हाणांना मोठा धक्का, ‘हा’ विश्वासू नेता सोडणार साथ; काँगेसकडून उमेदवारीही मागितली

राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या नेांदेडच्या राजकारणात असचं काहीसा प्रत्यय पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू असलेले माजी पालकमंत्री डी. पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2024 | 02:43 PM
अशोक चव्हाणांना मोठा धक्का, ‘हा’ विश्वासू नेता सोडणार साथ; काँगेसकडून उमेदवारीही मागितली
Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या नेांदेडच्या राजकारणात असचं काहीसा प्रत्यय पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू असलेले माजी पालकमंत्री डी. पी सावंत यांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बुधवारी त्यांनी नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडे अर्ज देखील दाखल केला आहे. डी. पी. सावंत यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवय्या उचवल्या आहेत.

अशोक चव्हाण यांची साथ देणारे अनेकजण आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची साथ सोडत आहेत. अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आणि माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे.

आता डी पी सावंत यांनी नांदेड उत्तर मधून काँगेसकडे उमेदवारी मागितली असून जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता अनेक जन त्यांच्यापासून दूर होत आहेत. भाजपमध्ये गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून थेट उमेदवारीच मागितली आहे. दरम्यान मी काँग्रेसमध्येच होतो, पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करील अशी प्रतिक्रिया डी. पी. सावंत यांनी दिली.

काँग्रेसमध्ये इच्छूकांची संख्या वाढली

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. अनेकजण काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे मागणी करत आहेत. तर दुसरीकडे चव्हाण समर्थक देखील काँग्रेसमध्ये घरवापसी करताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर शिंदे यांनी काल भाजप सोडून काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. अशोक यांचे कट्टर समर्थक तथा माजी महापौर जयश्री पावडे यांनी देखील काँग्रेस उमेदवारी मागितली आहे.

 

Web Title: A big blow to ashok chavan the trusted leader will leave saath nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • ashok chavhan
  • BJP
  • Congress
  • Nana patole

संबंधित बातम्या

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
1

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
2

Kerala Election: मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Ashok Kharat Case : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप
3

Ashok Kharat Case : सिलेक्टिव्ह व्हिडिओ लिक करण्यामागे गृहविभागाचा कुटील डाव; खरात प्रकरणावरुन काँग्रेसचा आरोप

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
4

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.