Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरमोरी’ ब्रिटिशकाळातील ‘शस्त्रागार’! वैनगंगेच्या काठावर वसलेले शहर; गोंड राजांचे वैभवशाली राज्य

पूर्वीच्या काळी आरमोरी परिसरावर शतकानुशतके गोंड राजांचे वैभवशाली राज्य होते. तसेच शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रामसागर तलाव, प्राचीन त्रिमूर्ती शिव मंदिर आणि तालुक्यातील ऐतिहासिक वैरागड किल्ला हे आरमोरीच्या सांस्कृतिक आणि लष्करी समृद्धीची आजही साक्ष देत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2026 | 03:30 PM
'आरमोरी' ब्रिटिशकाळातील 'शस्त्रागार'! वैनगंगेच्या काठावर वसलेले शहर; गोंड राजांचे वैभवशाली राज्य

'आरमोरी' ब्रिटिशकाळातील 'शस्त्रागार'! वैनगंगेच्या काठावर वसलेले शहर; गोंड राजांचे वैभवशाली राज्य

Follow Us
Follow Us:

गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वैनगंगा नदीच्या संथ प्रवाहाकाठावर वसलेले आरमोरी शहर आज शिक्षण, व्यापार आणि सांस्कृतिक वैभवाचा केंद्रबिंदू म्हणून मिरवत आहे. मात्र, वरकरणी आधुनिक वाटणाऱ्या या शहराच्या नावाच्या गर्भात आणि मातीत इतिहासाचे अनेक रंजक पदर दडलेले आहेत. आरमोरी हे नाव नक्की कुठून आले? याचा शोध घेतला असता, एका अत्यंत गौरवशाली आणि संशोधनात्मक इतिहासाचा पट समोर येतो. स्थानिक आख्यायिका, इतिहास अभ्यासकांचे मत आणि उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार, ‘आरमोरी’ या नावाचाथेट संबंध तत्कालीन ‘आरमार’ किंवा इंग्रजीतील ‘शस्त्रागार’ या संकल्पनेशी जोडला गेला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढली! कृषी विभागाकडून सतर्कतेचा इशारा, पेरणीची घाई करू नये

आरमोरी परिसरावर शतकानुशतके गोंड राजांचे वैभवशाली राज्य होते. शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रामसागर तलाव, प्राचीन त्रिमूर्ती शिव मंदिर आणि तालुक्यातील ऐतिहासिक वैरागड किल्ला हे आरमोरीच्या सांस्कृतिक आणि लष्करी समृद्धीची आजही साक्ष देत आहे. एकेकाळी वैनगंगा नदी हा या संपूर्ण परिसरातील व्यापाराचा मुख्य जलमार्ग होता. लाकूड, लोखंड आणि इतर वस्तूंची वाहतूक याच नदीमार्गे होत असे. या महत्त्वाच्या व्यापारी जलमार्गाच्या सुरक्षेसाठी येथे लष्करी तळ आणि शस्त्रसाठा उभारण्यात आला होता. सैनिकांची शस्त्रे, तलवारी, ढाली आणि दारूगोळा ठेवण्याचे हे मुख्य ठिकाण असल्याने या परिसराला ‘आरमार’ किंवा ‘आर्मरी’ म्हटले जाऊ लागले. पुढे स्थानिक बोलीभाषेत या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि ‘आरमोरी’ हे नाव कायमचे रूढ झाले.

नक्षीदार बैलगाड्यांना मोठी मागणीः

पूर्व विदर्भातील महत्त्वाचे लोखंड व्यापार केंद्र म्हणूनही आरमोरीची ओळख ब्रिटिशकालीन नोंदींमध्ये आढळते. कच्चे लोखंड येथे आणून स्थानिक कारागीर त्यापासून उत्कृष्ट दर्जाची अवजारे आणि उपयुक्त वस्तू तयार करीत असत. येथील कारागिरांनी तयार केलेल्या मजबूत, टिकाऊ आणि नक्षीदार ‘धामणी’ (दमणी) बैलगाड्यांना संपूर्ण विदर्भात मोठी मागणी होती.

धक्कादायक ! अवघ्या चार महिन्यांत 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, कर्जबाजारीपणा ठरलं कारण

८८ ब्रिटिशकाळात या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणावर शुद्ध लोखंड गाळले जात असे. या स्थानिक लोखंडापासून शेतीची अवजारे आणि युद्धासाठी लागणारी शस्त्रे मोठ्या प्रमाणात तयार होत होती. याच कारणामुळे इंग्रजांनी या भागाला ‘शस्त्रागार’ असे संबोधले असावे आणि त्यातूनच पुढे’ आरमोरी’ हा शब्द तयार झाला असवा, असे इतिहास अभ्यासक -प्रा. गंगाधर जुआरे म्हणाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: A british era armoury on the banks of the wainganga river once a glorious stronghold of the gond kings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • History
  • India History
  • maharashtra

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा
1

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

Travel Tips: युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी
2

Travel Tips: युद्धात कधीच पराभूत न झालेला भारतातील एकमेव किल्ला! जाणून घ्या या दुर्गाची रंजक कहाणी

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
3

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार
4

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.