अमरावती: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱे भाजप खासदार अनिल बोंडेंविरोधात अखेर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानानंतर खासदार अनिल बोंडेयांनीदेखील राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह विधान केेले. त्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार य़शोमती ठाकूर यांच्यासह भाजप नेतेमंडळींनी अमरावती पोलीस आयुक्तालय गाठून अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वेळी पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाचीही झाली. अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी अनिल बोडेविरोधात गुन्हा दाखल करून घेतला.
अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत विधान केले होते. “देशात अनुकूल सामाजिक परिस्थिती निर्माण झाल्यावर आरक्षण रद्द करण्याचा विचार करता येऊ शकतो,” असं विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजप, बहुजन समाज पक्ष, शिवसेना आणि भाजपच्या इतर काही मित्रपक्षांनीही राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करणे सुरू केले.
हेही वाचा: मोठी बातमी! ‘वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटकडून ग्रीन सिग्नल
लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून राहुल गांधी आणि काँग्रेसने मते घेतली. पण आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करायला लागेलत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. पण असं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल,” असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं. “महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाची मागणी होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी आणि अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिले. पण, राहुल गांधींनी परदेशात जाऊन, ‘माझ्या देशातील आरक्षण संपवायचं असल्याचे विधानं केले. यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. राहुल गांधींनी पोटातील मळमळ बाहेर ओकली.”
संजय गायकवाडांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंनी ‘”राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा योग्य नाही. त्यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत,” असं खळबळजनक विधान केलं आहे. अनिल बोडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत. मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत. जे भारतातील बहुसंख्याक नागरिकांच्या भावना दुखावतात. त्यांना किमान जाणीव तरी करून दिली पाहिजे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं.
हेही वाचा: अमरावतीत राजकारण तापलं; पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची