Photo Credit- Social media
अमरावती: भाजप खासदार अनिल बोंडे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीत राजकारण चांगेलच तापले आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे,माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी अमरावती पोलीस आयुक्तालयात पोहचले आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद होईपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणात यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘एक मुर्ख माणूस आहे. त्याला अमरावतीत आणि महाराष्ट्रात दंगल करायची आहे. त्यासाठीच ते असं काही ना काही करत असतात. काल मुख्यमंत्र्यांचा माणूस बोलला. आज आमच्या गृहमंत्र्यांचा माणूस बोलत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांचे चमचे संभाळता येत नाहीयेत. ते जर अमरावतीत अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही. हे सर्व पोलीस अधिकारी आज जा उद्या बदल्या झाल्या की निघून जातील पण आम्ही इथेच मरणार आहोत. आम्ही हे सहन करू शकत नाही. आमच्या नेत्याविरोधात कोणी काही बोलत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. जो पर्यंत अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: ‘आम्ही आगामी निवडणूक स्वतःसाठी नव्हे तर…’; आदित्य ठाकरे यांचं विधान
यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “एक वायफळ माणसाला भाजपने खासदार केलं आहे. या राज्य सभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राहुल गांधी आमचे नेते आहे. या महाराष्ट्रात नेहमी सलोखा राहिला आहे. पण गेल्या चार वर्षांपासून अनिल बोंडेंच्या डोक्यात फरक पडला असल्याने इथे जातीय दंगल कशी भडकेल यासाठी ते काम करत असतात. देवेंद्र फडणवीस त्यांना असे करायला लावतात, असा आमचा संशय आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे. असं जर कोणी पंतपधानांबदद्ल असं कोणी बोललं असत, तर पोलिसांनी एवढा वेल लावला असता का, असा आमचा प्रश्न आहे.
आज आम्ही मुली महिला इथे बसणार आहोत. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही इथे बसणार आहोत. किती दिवस लावले असते. संबंधितावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असा आणि त्याला तात्काळ अटक केली. त्यांच्यावर आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस यंत्रणा भ्रष्ट झाली का, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणसीस यांची फेर नॅरेटिव्ह ची भाषा करतात. आख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकला असल्याची त्यांनी टीकाही केली.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून राहुल गांधी आणि काँग्रेसने मते घेतली. पण आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करायला लागेलत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. पण असं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल,” असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं.
हेही वाचा: संजय गायकवाडांनंतर भाजप खासदार बरळला; राहुल गांधींची जीभ…
अनिल बोंडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत. मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत. जे भारतातील बहुसंख्याक नागरिकांच्या भावना दुखावतात. त्यांना किमान जाणीव तरी करून दिली पाहिजे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.