Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसबा गणपती मंडळाची यंदा आगळीवेगळी संकल्पना; अष्टविनायकांतील बल्लाळेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारणार

रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराची भव्य प्रतिकृती यंदा कसबा गणपतीच्या मंडपात उभारली जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2025 | 04:03 PM
कसबा गणपती मंडळाची यंदा आगळीवेगळी संकल्पना; पालीतील बल्लाळेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारणार

कसबा गणपती मंडळाची यंदा आगळीवेगळी संकल्पना; पालीतील बल्लाळेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती उभारणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्याचा मानाचा पहिला आणि शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती मंडळ यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांसाठी एक आगळीवेगळी आणि आध्यात्मिक अनुभव देणारी संकल्पना घेऊन येत आहे. रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराची भव्य प्रतिकृती यंदा कसबा गणपतीच्या मंडपात उभारली जाणार आहे. त्यामुळे पुण्यातच ग्रामदैवत व अष्टविनायकाचे दर्शन एकाच ठिकाणी घडणार असून, लाखो गणेशभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आम्ही अष्टविनायक मंदिरांच्या प्रतिकृती साकारतो आहोत. यंदा पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराची प्रतिकृती साकारून भक्तांना पालीला प्रत्यक्ष न जाता येथेच त्याचा अनुभव घेता यावा, हा आमचा हेतू आहे. त्यामुळे भक्तांची आध्यात्मिक यात्रा समृद्ध होईल.

पाली येथील श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकातील एकमेव गणेश मंदिर आहे, ज्याचे नाव भक्ताच्या नावावरून ठेवले गेले आहे. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला, सूर्योदयावेळी मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण आणि परिसरातील ऐतिहासिकता याचे दर्शन यंदा पुण्यातच घडणार आहे. या विशेष मंडपाची प्राणप्रतिष्ठा गुजरातचे स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही शेटे यांनी दिली.

मंडपाच्या बांधकामासाठी विशेष कुशल कारागिरांची नियुक्ती करण्यात आली असून, गिरीश कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. पाली मंदिरातील प्रत्येक बारकावे, दगडी नक्षीकाम, मुख्य गाभाऱ्याची रचना, तसेच सूर्योदयावेळी मूर्तीवर पडणाऱ्या किरणांचा देखावा इथेही प्रत्यक्षात उभा केला जाणार आहे. कसबा गणपती पुण्यातील गणेशोत्सवात मानाचा पहिला म्हणून विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व करतो. त्यामुळे दरवर्षी येथे हजारो भाविकांची गर्दी असते. यंदाच्या या भव्य व वैभवशाली संकल्पनेमुळे पुण्यातील गणेशोत्सवाला एक नवे रुप येईल.

कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो. कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता (ग्रामदेवता) आहे. कसबा गणपती हा पुणे, महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती, किंवा सर्वात आदरणीय गणपती मानला जातो. या मूर्तीची स्थापना 1893 मध्ये झाली आणि ती पुण्यातील कसबा पेठ परिसरात आहे, जो शहराचा एक प्राचीन भाग आहे. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असतो

Web Title: A grand replica of the pali ballaleshwar temple will be erected at the kasba ganapati mandap this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • Ganesh Utsav 2025
  • maharashtra
  • pune ganpati
  • pune news

संबंधित बातम्या

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर
1

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध
2

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
3

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
4

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.