
निमसाखर : घोरपडवाडी (ता.इंदापूर) गावातील स्वागत कमानी पासून ते हनुमान मंदिराकडे जाणारा गावातील मुख्य रस्ता अतिशय खराब झाला आहे. साधारण तीनशे मिटरचा गावातील प्रमुख अंतर्गत रस्ता अतिशय खराब झाल्याने पावसाळ्यात हा संपूर्ण रस्ता चिखलात हरवून गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
गावातील हनुमान मंदिर परिसरातील या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. परिसरात बालचमुंना खेळण्यासाठी मोठे प्रांगण आहे. मात्र हे प्रांगण दुर्लक्षितच राहिले आहे. सध्या याच परिसरात महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान चालवत असून या ठिकाणी धान्य नेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून व मैदान सुसज्ज करण्याची मागणी घोरपडवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
[blockquote content=”घोरपडवाडी ग्रामपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टी करवसुलीसाठी ग्रामस्थांकडे तगादा लावला जातो. मात्र, त्यांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ” pic=”” name=”-दिलीप लावंड, सामाजिक कार्यकर्ते, घोरपडवाडी.”]