Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगावात चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय पाटील आक्रमक

तासगाव शहर सोमवारी सकाळी अक्षरशः ठप्प झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 14, 2025 | 03:13 PM
तासगावात चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय पाटील आक्रमक

तासगावात चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय पाटील आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय पाटील आक्रमक
  • तासगावात चक्काजाम आंदोलन
  • तासगावातील बसस्थानक चौकासह सर्व रस्ते ठप्प

तासगाव/मिलिंद पोळ : तासगाव शहर सोमवारी सकाळी अक्षरशः ठप्प झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेळ्या-मेंढ्या आणि पाळीव जनावरांसह सहभागी झाल्याने बसस्थानक चौकासह सर्व रस्ते ठप्प झाले होते. शहराच्या बाहेरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झालेलं हे आंदोलन तासगावासह सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलं आहे.

या आंदोलनावेळी संजय पाटील म्हणाले, “निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरणांमुळे शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ लागत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने तातडीने कर्जमाफी करावी.” “शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांच्या पुढे राहून लढा देण्याची भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी ढळू देणार नाही.” असं यावेळी पाटील म्हणाले.

या वेळी प्रभाकर पाटील म्हणाले, “शेती परवडत नाही, पण पर्याय नाही. आता चार-पाच एकर जमिनीच्या शेतकऱ्याच्या मुलाला लग्नातही अडचण येते, कारण सगळ्यांना शेतीची अवस्था माहीत आहे.”

हे सुद्धा वाचा : सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी हमीभावाने करावी, अन्यथा मंत्र्यांना…; काँग्रेसचा इशारा

राज्यातील शेतकरी संकटात

गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. एकीकडे कोरोना महामारीचा तडाखा, तर दुसरीकडे अतिवृष्टी, महापूर आणि अस्थिर हवामानामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेकांचे पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. गेल्या वर्षभरातही सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. परिणामी, आता त्यांना कर्जमाफीची तीव्र अपेक्षा आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक कणा पुन्हा उभा राहणे अशक्य आहे. सततच्या नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि घटणारे बाजारभाव या तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: A massive protest has been held in tasgaon for farmers loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • sanjay patil

संबंधित बातम्या

इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार, भाजपाची ताकद वाढली; ‘या’ बड्या नेत्यांचा प्रवेश
1

इचलकरंजी महानगरपालिकेतील समिकरणे बदलणार, भाजपाची ताकद वाढली; ‘या’ बड्या नेत्यांचा प्रवेश

अजित पवारांचा भाजपला धक्का! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार; तारीखही ठरली
2

अजित पवारांचा भाजपला धक्का! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार; तारीखही ठरली

Pune ACB Action : 5 हजाराची लाच घेणं भोवलं; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
3

Pune ACB Action : 5 हजाराची लाच घेणं भोवलं; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

माळशिरसमधील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच? ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत
4

माळशिरसमधील भाजपाचे नेतृत्व राम सातपुतेंकडेच? ‘या’ बड्या नेत्याने दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.