Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा कारभारही झेपेना, जमत नसेल तर…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

भाजपा महायुतीच्या निर्लज्ज व नालायक सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकली असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 14, 2026 | 05:04 PM
देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा कारभारही झेपेना, जमत नसेल तर...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा कारभारही झेपेना, जमत नसेल तर...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे नाटक सुरु आहे पण मुंबईतील एका भागात चार ते पाच हजार तरुण तरुणांची ड्रग्ज पार्टी होते, याची भनक पोलीसांना कशी लागली नाही. मुंबईतील ही घटना दोन मृत्यूमुळे उघड झाली पण मुंबईतच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात ड्रग्जचा काळा धंदा सरकारच्या आशिर्वादाने सुरु असून, भाजपा महायुतीच्या निर्लज्ज व नालायक सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकली असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस व सरकारी यंत्रणाच्या नाकावर टिच्चून अशा ड्रग्ज व दारुच्या पार्ट्या खुलेआम होत आहेत, हे गृहविभाग व सर्व यंत्रणाचे मोठे अपयश आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकण्यास भाजपा महायुती सरकारचा आंधळा कारभार जबाबदार आहे. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या शेतातच ड्रग्जचा कारखाना सुरु असतो, तो उघड होऊनही थातूर मातूर कारवाई करून प्रकरण दडपले जाते. मुख्यमंत्री फडणवीसही त्याला क्लीन चिट देऊन टाकतात हे अत्यंत गंभीर आहे. राज्यात ड्रग्जचा धंदा खुलेआम सुरु असल्याचे नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथील घटनांवरून याधीच उघड झाले पण सरकार काही झोपेतून जागे झाले नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटील असो, नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण असो वा साताऱ्यातील ड्रग्जचा कारखाना, या सर्वांचे धागेदोरे सरकारमधील बड्या धेंड्यांशी असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. ड्रग्जने आणखी किती मृत्यू होईपर्यंत फडणवीस सरकार गप्प बसून फक्त क्लिन चिट वाटत बसणार ? असा सवाल सपकाळांनी उपस्थित केला आहे.

नेस्कोतील चार-पाच हजार विद्यार्थ्यांच्या अशा पार्टीला परवानग्या कोणी दिल्या, सरकार व पोलीस कोणाला पाठीशी घालत आहे, हे समजले पाहिजे. सरकारने पोलीस व सर्व यंत्रणांना फक्त टक्केवारी, हप्ते वसूली करणे व सर्वसामान्य जनतेकडून कायद्याचा गैरवापर करत ‘वसुली’ करणे याच कामाला जुंपल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मोठमोठ्या गप्पा मारत असतात पण फडणवीस यांना गृहखातेच काय महाराष्ट्राचा राज्यकारभारही हाकता येत नाही. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : रस्ते अपघातात बळींची संख्या उच्चांकीवर, प्रताप सरनाईकांनी राजीनामा द्यावा; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the government over the drug party in goregaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Drugs Case
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री फडणविसांच्या हस्ते होणार चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ‘रांजे व्हिजन पार्क’चे उद्घाटन
1

मुख्यमंत्री फडणविसांच्या हस्ते होणार चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ‘रांजे व्हिजन पार्क’चे उद्घाटन

RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशात एसइबीसी कोट्याला तडा; शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
2

RTE Admission : ‘आरटीई’ प्रवेशात एसइबीसी कोट्याला तडा; शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

रस्ते अपघातात बळींची संख्या उच्चांकीवर, प्रताप सरनाईकांनी राजीनामा द्यावा; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी
3

रस्ते अपघातात बळींची संख्या उच्चांकीवर, प्रताप सरनाईकांनी राजीनामा द्यावा; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची मागणी

आशाताईंच्या स्मृतींना शासन मानवंदना देणार! मुंबईत उभारणार जागतिक दर्जाची संगीत संस्था; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

आशाताईंच्या स्मृतींना शासन मानवंदना देणार! मुंबईत उभारणार जागतिक दर्जाची संगीत संस्था; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.