Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित

कदमवाकवस्ती येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 15, 2026 | 12:30 AM
कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित

कदमवाकवस्तीतील आमरण उपोषणाला यश; नुकसान भरपाईबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित

Follow Us
Follow Us:

कदमवाकवस्ती : कदमवाकवस्ती येथील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले असून, प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला होता आणि अखेर अधिकाऱ्यांना थेट उपोषणस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करावी लागली.

 

अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या सूचनेनुसार पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळात नायब तहसीलदार मयुर बनसोडे, मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे आणि ग्राम महसूल अधिकारी महेश वाघमारे यांचा समावेश होता. त्यांनी बाधित नागरिकांच्या नुकसान भरपाईसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगत, निधी प्राप्त होताच पात्र लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे मदत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

जनतेने उचललेले पाऊल प्रभावी

या ठोस आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. उपोषणामुळे प्रशासनाला हालचाल करावी लागली असून, स्थानिक पातळीवरील प्रश्नासाठी जनतेने उचललेले पाऊल प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनाला लोणी काळभोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी जाहीर पाठिंबा दिला. तसेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला बळ देत होते. यावेळी उदय काळभोर, चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, उपसरपंच नासीर पठाण, आकाश काळभोर, अस्मिता लोंढे, संजय भालेराव, सुहास काळभोर, राकेश लोंढे यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती.

हे सुद्धा वाचा : शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली महागात; तब्बल लाखो रुपयांना तरुणाला घातला गंडा

ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, प्रत्यक्षात नुकसानभरपाई कधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आश्वासनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे. उपोषण यशस्वी झाल्यानंतर उपोषणकर्त्या उपसरपंच राजश्री काळभोर यांनी सांगितले की, “हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी भविष्यातही आम्ही लढा देत राहणार आहोत. गरज पडल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू. कदमवाकवस्ती वॉर्ड क्रमांक २ मधील नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कायम सज्ज आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू.”

Web Title: The administration has given written assurances to the citizens regarding compensation for the damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.