Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी ऊस गाळप धोरणासाठी मंत्री समितीची ‘या’ तारखेला बैठक; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय

यंदाच्या २०२६-२७ ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ९) मुंबईत मंत्री समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 04:54 PM
आगामी ऊस गाळप धोरणासाठी मंत्री समितीची 'या' तारखेला बैठक; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय

आगामी ऊस गाळप धोरणासाठी मंत्री समितीची 'या' तारखेला बैठक; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय

Follow Us
Follow Us:
  • आगामी ऊस गाळप धोरणासाठी मंत्री समितीची बैठक
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय
  • १५ ऑक्टोबरपासून गाळपाच्या केंद्राच्या सूचनेवर चर्चा
पुणे : यंदाच्या २०२६-२७ ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ९) मुंबईत मंत्री समितीची बैठक होणार आहे. ऑगस्टमध्ये साखरेच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनेनुसार गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अन्य मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उताऱ्यातील घट ठरणार महत्त्वाचा मुद्दा

लवकर गाळप सुरू केल्यास साखर उताऱ्यात घट होण्याची शक्यता असल्याने त्याचा कारखान्यांच्या अर्थकारणावर होणारा परिणाम हा बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. उतारा कमी झाल्यास कारखान्यांना होणारी आर्थिक झळ भरून काढण्यासाठी अनुदान अथवा अन्य उपाययोजनांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री समितीच्या निर्णयाकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : ‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

१५ लाख ४३ हजार हेक्टरवर ऊस

राज्यात यंदाच्या हंगामात ३१ जुलैअखेर प्राथमिक अंदाजानुसार १५.४३ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक उभे आहे. राज्यातील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ऊस उत्पादन आणि उत्पादकतेत विभागनिहाय चढ-उतार होण्याची शक्यता आहे. हवामान परिस्थिती, उपलब्ध ऊस क्षेत्र, अपेक्षित उत्पादन, साखरेचे दर आणि कारखान्यांची आर्थिक स्थिती या सर्व बाबींचा विचार करून यंदाच्या गाळप हंगामाचे धोरण निश्चित केले जाणार आहे. गाळपाची तारीख, साखर उतारा आणि कारखान्यांच्या आर्थिक हिताचा समतोल साधताना सरकार कोणता निर्णय घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : डीजेविरोधात पुणेकर एकवटले! बालगंधर्व चौक ते पुणे महापालिकेपर्यंत निषेध मोर्चा; ध्वनीप्रदूषणावर कारवाईची मागणी

Web Title: A meeting of the ministerial committee regarding the upcoming sugarcane crushing policy will be held in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Farmers
  • Harshvardhan Patil
  • Sugarcane

संबंधित बातम्या

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
1

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
2

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
3

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली
4

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.