Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथेनॉल खरेदी बंदीने साखर उद्योग संकटात; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

साखर कारखान्यांचे इथेनॉलपासून मिळणारे उत्पन्न कमी होणार असल्याने, साखर उद्योग अडचणीत येण्याची भीती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2026 | 06:09 PM
इथेनॉल खरेदी बंदीने साखर उद्योग संकटात; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

इथेनॉल खरेदी बंदीने साखर उद्योग संकटात; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

Follow Us
Follow Us:
  • इथेनॉल खरेदी बंदीच्या निर्णयामुळे साखर उद्योग चिंतेत
  • साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता
  • इथेनॉल खरेदी बंदी मागे घेण्याचीची हर्षवर्धन पाटलांची मागणी
बावडा : केंद्र सरकारने साखर कारखान्यांच्या ऊसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीवर पुरवठा वर्ष २०२६-२७ साठी बंदी घातली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे इथेनॉलपासून मिळणारे उत्पन्न कमी होणार असल्याने, साखर उद्योग अडचणीत येण्याची भीती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्र सरकारचा या निर्णया पाठीमागचा उद्देश हा देशांतर्गत साखरेची उपलब्धता वाढविणे हा असल्याचे सांगितले जात आहे. त्याकरिता उसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या साखर कारखान्यांकडील इथेनॉलची तेल कंपन्यांकडून खरेदी बंद करण्यात आली आहे. मात्र कारखान्यांच्या उत्पादित सी-हेवी मोलॅसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी सुरू राहणार असल्याचे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मात्र सी-हेवी मोलॅसिसचा दर हा अत्यल्प असा प्रति लि. 57.97 रुपये एवढा आहे, त्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे. तर साखर कारखान्यांच्या डिस्टिलरी विभागावर आणि त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. महाराष्ट्र राज्यात 40 हजार कोटी आणि देशात 1 लाख कोटींची गुंतवणूक इथेनॉल निर्मितीमध्ये झाली आहे. या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीवरही विपरीत असा परिणाम होणार असल्याने इथेनॉल प्रकल्पासाठी कर्ज पुरवठा केला त्यांच्यावरही कर्ज फेडी संदर्भात परिणाम होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

कारखान्याचे अर्थकारण कोलमडून जाईल

तसेच, इथेनॉल हा देशाचा अर्थकारण बदलणारा विषय असल्याने, या निर्णयामुळे साखर कारखान्याचे अर्थकारण कोलमडून जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने सदरचा इथेनॉल खरेदी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा व सी-हेवी मोलॅसिसचा दर हा वाढवून प्रति लि. ७० रुपये करावा, अशी मागणीही अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील नाट्यगृहांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिकेकडून दुरुस्तीची कामे; नेहरू भवन ‘या’ तारखेपर्यंत बंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र सरकारने इथेनॉल खरेदीबाबत कोणता निर्णय घेतला?

    Ans: २०२६-२७ पुरवठा वर्षासाठी उसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीवर बंदी घातली आहे.

  • Que: या निर्णयामुळे साखर कारखान्यांवर काय परिणाम होणार आहे?

    Ans: इथेनॉलपासून मिळणारे उत्पन्न कमी होऊन साखर कारखान्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • Que: हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे काय मागणी केली?

    Ans: इथेनॉल खरेदी बंदीचा निर्णय मागे घ्यावा आणि सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Harshvardhan patil has demanded that the central government lift the ban on ethanol procurement nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Harshvardhan Patil
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Chhatrapati Sugar Factory:‘वजन चोख, पैसे रोख’ धोरणाचा छत्रपती कारखान्याला फायदा!
1

Chhatrapati Sugar Factory:‘वजन चोख, पैसे रोख’ धोरणाचा छत्रपती कारखान्याला फायदा!

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल
2

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
3

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.