Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोरेगाव येथील धक्कादायक घटना, दोन मुलींना सोबत घेऊन केली आईने कोकण रेल्वे खाली आत्महत्या

मोटारमन यांनी या अपघाताची माहिती माणगाव रेल्वे स्थानकात दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला गोरेगाव पोलिसांनी तातडीने रेल्वे ट्रॅक गाठले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 02, 2023 | 03:43 PM
गोरेगाव येथील धक्कादायक घटना, दोन मुलींना सोबत घेऊन केली आईने कोकण रेल्वे खाली आत्महत्या
Follow Us
Close
Follow Us:

माणगाव : मुलींचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन जगताना झालेले कर्ज त्यातच नवरा लक्ष देत नाही की कसलीही मदत करत नाही यामुळे जगणे असह्य झाल्याने आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका आईने स्वतः ही कोकण रेल्वे खाली आत्महत्या केल्याची ह्रदय द्रावक घटना माणगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे घडली या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ जनक वातावरण तयार झाले आहे.

गोरेगाव येथील गावडे काॅम्पलेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रिना जयमोहन नायर या महिलेने आपली चौदा वर्षांची मुलगी जिया आणि अकरा वर्षांची मुलगी लक्ष्मी या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन कोकण रेल्वेच्या कोकण कन्या एक्स्प्रेस या गाडी खाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केली. मोटारमन यांनी या अपघाताची माहिती माणगाव रेल्वे स्थानकात दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला गोरेगाव पोलिसांनी तातडीने रेल्वे ट्रॅक गाठले. मात्र दोनच मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर, सोपान रासकर, हवालदार यशवंत चव्हाण, दिलीप बेंडूगडे, धोंडिबा गिते यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी कसून शोध घेतला असता दुपारी जिया हिचा मृतदेह ट्रॅक नजीकच्या झुडपात आढळून आला.

व्हॉइस मेसेज मुळे झाला उलगडा….
गोरेगाव रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर दोन महिलांचा अपघात झाला इतकाच मेसेज पोलीस यंत्रणेला मिळाला होता मात्र या अपघाताची चर्चा होताच पहाटे दुर्दैवी रिना यांची मैत्रीण स्वतःहून गोरेगाव पोलीस ठाण्यात आली व तिने आपल्याला मैत्रीणीने व्हॉइस मेसेज पाठवला होता अशी माहीती दिली. रिना यांनी पाठवलेल्या व्हॉइस मेसेज मध्ये… वहिनी मला माफ करा मी तुम्हाला बोलली परंतू माझ्याकडून नाही होत मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन जातेय जीव द्यायला मोहनमुळे. त्याला इकडे बोलवून माझे जे देणे आहे ते द्यायला सांगा आणि रूम सोडून जायला सांगा. रिना यांचा हा शेवटचा आवाज जड अंतःकरणाने त्यांनी हा आपल्या आवाजातील मेसेज जवळच्या मैत्रीणीला रात्री मरणापूर्वी पाठवला होता. यानंतर हा धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला आणि दोन मृतदेहांची ओळख पटली त्यांनतर रिना आणि लक्ष्मीचा शोध सुरू झाला तो जिया मृतदेह रेल्वे ट्रॅक वरती कुठेही काही सापडत नव्हता त्यामुळे संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. जिया जर जिवंत असेल तर ती एकमेव घटनाक्रमाची साक्षीदार होती त्यामुळे पोलीस, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ सर्वत्र शोध घेत होते मात्र हा शोध अखेर दुपारी थांबला कारण जिया हिचा मृतदेह अपघातस्थळाच्या शेजारी झुडपात सापडला.

असा झाला शेवटचा प्रवास…
गुरूवारी रिना आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा दिवस नेहमी प्रमाणेच गेला. जिया ही इयत्ता नववीत तर लक्ष्मी इयत्ता सातवीत लोणेरे येथील एस एस निकम शाळेत शिकत होत्या गुरुवारी नेहमी प्रमाणे त्या शाळेत गेल्या होत्या. दिवसभर शाळा आणि क्लासेस उरकल्या नंतर घरी रात्रीचे जेवण सुध्दा झाले मध्यरात्रीनंतर अडीच वाजता गोरेगाव येथून तिघींचा स्कूटी वरती प्रवास सुरू झाला दिड किलोमीटर इतक्या अंतरावर रेल्वे ब्रिज जवळ स्कूटी उभी राहिली आणि तीन वाजता तीन जीवांचा प्रवास कायमचा थांबला…

काय होते जीवन…
रिना या मुळच्या गोरेगाव मधल्या त्यांनी केरळ येथील जयमोहन नायर याच्या सोबत प्रेम विवाह केला होता. त्यांना दोन मुली झाल्या पण जयमोहन सोबत राहत नव्हता रिना दोन्ही मुलींना घेऊन भाडोत्री घरात राहत होत्या त्या स्वतः सर्व खर्च चालवत होत्या. त्यांनी जी यादी केली आहे त्यानुसार मुलींच्या शाळेची, बसची, क्लासेसची फी भरायची होती तसेच दुधाचे पेमेंट, रूम भाडे थकले होते. दैनंदिन खर्चासाठी पैसे हात उसने घेतले होते ते परत करायचे होते शिवाय फायनान्स वरती घेतलेल्या मोबाईलचे हप्ते थकले होते यासाठी जयमोहन कोणतीच मदत करत नव्हता म्हणूनच हे टोकाचे पाऊल उचलून तीन जिवांना या जगाचा निरोप घ्यावा लागला.

Web Title: A shocking incident in goregaon a mother committed suicide under the konkan railway taking her two daughters with her mangaon raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2023 | 11:05 AM

Topics:  

  • konkan railway
  • Mangaon
  • Suicide case

संबंधित बातम्या

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
1

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

धनगर आरक्षणासाठी 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
2

धनगर आरक्षणासाठी 38 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

दागिने चोरीसंदर्भात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतलं अन्…
3

दागिने चोरीसंदर्भात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

नाव दुरुस्तीसाठी चार महिन्यांचा विलंब; संतप्त पालकाने शाळेतच केला आत्महत्येचा प्रयत्न
4

नाव दुरुस्तीसाठी चार महिन्यांचा विलंब; संतप्त पालकाने शाळेतच केला आत्महत्येचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.