Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

मोठा भाऊ जितेंद्रने प्रवीणला कामावर जाण्याबाबत विचारले असता त्याने इच्छा नसल्याचे सांगितले. घरीच खोलीला शटर लावून दुकान काढले आहे. जी रिकामी होती. प्रवीण दुकानात गेले आणि शटर आतून बंद केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2026 | 12:05 PM
असह्य वेदनांना कंटाळून आई-मुलाची आत्महत्या

असह्य वेदनांना कंटाळून आई-मुलाची आत्महत्या

Follow Us
Follow Us:

नागपूर : लग्नानंतर अवघ्या सात दिवसांत पत्नी माहेरी निघून गेली. संसार सुरू होण्यापूर्वीच तो उद्धवस्त झाल्याचा प्रकार घडला. यात प्रवीण रामचंद्र कुमरे (वय ३२, रा. मानेवाडा जुनी वस्ती) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा मजुरीचे काम करत होता. २०२५ मध्ये त्याचे लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या सातव्या दिवशी पत्नी सोडून माहेरी गेली. त्यानंतर ती पुन्हा सासरी परतली नाही. याचा प्रवीणला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातून तो नैराश्येत गेला आणि हळूहळू त्याला व्यसन लागल्याचे सांगितले जाते. तसेच त्याने कामाकडेही दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती.

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

शुक्रवारी मोठा भाऊ जितेंद्रने प्रवीणला कामावर जाण्याबाबत विचारले असता त्याने इच्छा नसल्याचे सांगितले. घरीच खोलीला शटर लावून दुकान काढले आहे. जी रिकामी होती. प्रवीण दुकानात गेले आणि शटर आतून बंद केले. सायंकाळी ६ वाजता जितेंद्रने घरी परतल्यानंतर प्रवीणबाबत विचारले असता दुकानाच्या खोलीत असल्याचे समजले. त्याने त्याला आवाज दिला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

संशय आल्याने पोलिसांनी दिली माहिती अन्…

संशय आल्याने जितेंद्रने पोलिसांना माहिती दिली. शटर उघडले असता प्रवीण आतमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घटनेमागे अन्य कोणतेही कारण सध्या समोर आले नाही. पत्नी सोडून गेल्याच्या धक्क्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आईसोबत झालेल्या आर्थिक वादातून आत्महत्या

आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ३८ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

Web Title: Husband commits suicide by hanging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • crime news
  • Nagpur Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
1

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
2

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले
4

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.