मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ हुमरमळा येथे आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या बाजूने सकाळी जॉगिंगसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या चारचाकी भरधाव कारने ठोकले. या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणारी भरधाव चारचाकीवर चालकाचे नियंत्रण न राहिल्याने हा भीषण अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती दिली आहे. कालिदास झणझने असे मृत पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कालिदास हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून ओरोस आरटीओ ऑफिस क्लार्क पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जाणारी चारचाकी Pb 65 AA/4411 ने पादचारी कालिदास झणझने यांना जोरदार धडक दिली. यात पादचारी कालिदास हे जवळपास ५० फूट अंतरावर जावून आदळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.