Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिळक चौकात वाहतूक पोलीस महिलेला चप्पलने मारहाण..!

प्रतिनियुक्तीवर असलेल्या महिला पोलीस शिपायाला टिळक चौकात भरदुपारी महिलेने अश्लील भाषेत शिवीगाळ करत चप्पलने मारहाण करून त्यांच्या अंगावरील वर्दी फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ गाडीबाबत माहिती न दिल्यावरून या महिलेने हा गोंधळ घालत मारहाण केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2022 | 04:23 PM
टिळक चौकात वाहतूक पोलीस महिलेला चप्पलने मारहाण..!
Follow Us
Follow Us:

पुणे : प्रतिनियुक्तीवर असलेल्या महिला पोलीस शिपायाला टिळक चौकात भरदुपारी महिलेने अश्लील भाषेत शिवीगाळ करत चप्पलने मारहाण करून त्यांच्या अंगावरील वर्दी फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ गाडीबाबत माहिती न दिल्यावरून या महिलेने हा गोंधळ घालत मारहाण केली आहे. एका महिलेला भररस्त्यात दुसऱ्या महिलेने चप्पलने मारहाण केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मारहाण, सरकारी कामात अडथळानिर्माण करणे व इतर कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिला पोलीस शिपाई यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, ३५ वर्षीय महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या विश्रामबाग वाहतूक विभागात कर्तव्यास असून, त्या प्रतिनियुक्तीवर येथे आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी त्यांना टिळक चौकात कर्तव्य देण्यात आले होते. त्या टिळक चौकात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियमन करत होत्या. दरम्यान, यातील आरोपी महिला ताडीवाला रस्ता परिसरात राहत आहे.

संबंधित महिला मध्यवस्थीत आली होती. त्या दरम्यान, या महिलेची दुचाकी वाहतूक पोलिसांनी उचलून आणली होती. त्यामुळे संबंधित महिला दुचाकीसाठी या ठिकाणी आली होती. तक्रारदार या उभारल्या असताना महिला त्यांच्याजवळ आली व माझी गाडी येथे का आणली अशी विचारणा केली. तक्रारदारांनी त्यांची गाडी उचलली नसल्याने तसेच त्या विश्रामबाग विभागात असल्याने त्यांनी महिलेला मला माहित नाही. मी दुसऱ्या विभागात कर्तव्यास आहे. तुम्ही शेजारी असलेल्या फरासखाना वाहतूक विभागात चौकशी करा. त्याचा राग या महिलेला आला. तिने थेट अरेतुरेवर येत “तु पोलीस खात्यात असून, तुला माहिती नाही का”, असे म्हणत वाद घातला.

ही महिला इतकी चिडली की तिने अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना पायातील चप्पल काढून थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. भरदुपारी गजबजलेल्या चौकात तिने महिला कर्मचाऱ्यांना चप्पलने बेदम मारहाण केली. तर, त्यांचा ड्रेस फाडून त्यांच्या चेहऱ्यावर नख देखील ओरखाडले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत मागविली. तरीही ही महिला शांत झाली नाही. तिने अश्लील शिवीगाळ सुरूच ठेवली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

मारहाण सीसीटीव्हीत कैद..!

टिळक चौक परिसर सतत गर्दीने भरलेला असतो. तर, टिळक चौकात सीसीटीव्ही देखील आहेत. वाद सुरू झाल्याने या महिला कर्मचारी वाद नको म्हणून तेथून निघून पुढे जाऊन थांबल्या होत्या. तरीही या महिलेने तिथे जाऊन त्यांच्याशी वाद घातला व त्यांना चप्पलने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एका महिला कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Web Title: A traffic police woman was beaten with slippers in tilak chowk nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2022 | 04:23 PM

Topics:  

  • Amitabh Gupta
  • crime news
  • devendra fadanvis
  • Pune
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
3

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.