Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : एक राखी अशीही; सिव्हिल रुग्णालयात साजरा अनोखं रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या निमित्ताने ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयात देखील राखी पौर्णिमेचा कार्यक्रम करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 09, 2025 | 02:05 PM
Thane News : एक राखी अशीही; सिव्हिल रुग्णालयात साजरा अनोखं रक्षाबंधन
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : “रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा फक्त एक ‘केस’ किंवा ‘रुग्ण क्रमांक’ नसतो, तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो,” महिला कर्मचारी यांनी रुग्णांच्या मनगटावर राखी बांधली, तेव्हा त्या धाग्यात फक्त दोरा नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीची ऊब असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.

रेल्वे पुलाखालील रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करा; आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

आज ठाणे सिव्हिल रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा आणि हृदयाला स्पर्श करणारा सोहळा रंगला. विविध वॉर्डांमधील रुग्णांना महिला डॉक्टर आणि नर्सांनी राखी बांधली. घरापासून आणि कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांसाठी हा क्षण जणू भावनिक औषध ठरला. रुग्णालयाच्या वातावरणात या दिवशी केवळ औषधांचा गंध नव्हता, तर स्नेह, माया आणि मानवी नात्यांचा सुगंधही पसरला होता. महिला कर्मचाऱ्यांनी चॉकलेट, मिठाई वाटून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे. काही रुग्णांनी आशीर्वाद देखील दिले आहेत.

Kolhapur News : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू; सोमवारपासून आंदोलन आणखी तीव्र होणार

हा उपक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, रुग्ण आणि आरोग्यसेवक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक घट्ट करणारा ठरला. आजारपणाच्या लढाईत औषधांइतकाच भावनिक आधारही महत्त्वाचा असतो, हे या उपक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. अर्चना पवार, डॉ.ज्ञानेश्वर सलगर आदी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: A unique raksha bandhan was celebrated at the civil hospital in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • Marathi News
  • Raksha Bandhan
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले
1

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया
2

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी
3

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!
4

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.