Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॉर्निंग वॉक करताना महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू

लेकीकडे आल्यानंतर बारामती शहरातील नीरा डावा कालव्याच्या कडेने मॉर्निंग वॉक (Morning Walk) करत असताना महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बारामती शहरात घडली. सरस्वती गुणवंत तोंडारे (वय ६७, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे मयत महिलेचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2022 | 05:05 PM
मॉर्निंग वॉक करताना महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : लेकीकडे आल्यानंतर बारामती शहरातील नीरा डावा कालव्याच्या कडेने मॉर्निंग वॉक (Morning Walk) करत असताना महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बारामती शहरात घडली. सरस्वती गुणवंत तोंडारे (वय ६७, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तोंडारे या आपल्या मुलीकडे राहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील ओझर्डे ईस्टेट याठिकाणी आल्या होत्या. गुरुवारी (दि.९) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी त्या नीरा डावा कालव्यावर गेल्या होत्या. वॉकिंग करत असताना कालव्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

संबंधित महिलेचे पती हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून, ते भिगवण या ठिकाणी स्थायिक आहेत. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करे हे करत आहेत.

नागरिकांनी काळजी घ्यावी : पोलिस निरीक्षक

महिलेचा मृतदेह बारामती शहरातील कालव्याच्या पुलाजवळ लोकांनी पाहिला, पोलिसांनी तत्काळ बीट मार्शल ठोंबरे व मनोज पवार यांनी जनतेचे सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला. कालव्यात पोहताना ज्याला पोहता येते, त्यांनी काळजी घ्यावी, कारण अंग कोरडे असताना कालव्यात पोहण्यास गेल्यानंतर कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण झाल्याने अंग ओले झाल्यानंतर वर चढता येत नाही. एखाद्याला बाहेर काढणे देखील जिकरीचे होते. नंतर प्रवाहात अडकला की दम लागतो आणि त्यातून गटांगळ्या बसून अनूचित प्रकार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

Web Title: A woman died while morning walk in baramati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2022 | 05:05 PM

Topics:  

  • baramati
  • Morning Walk

संबंधित बातम्या

मोठी बातमी! वीर धरणातील ‘इतका’ टक्के पाणीसाठा शिल्लक; तर निरा प्रणालीत…
1

मोठी बातमी! वीर धरणातील ‘इतका’ टक्के पाणीसाठा शिल्लक; तर निरा प्रणालीत…

Baramati News: शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! बनावट नियुक्तीपत्र देत 1.36 कोटींची फसवणूक
2

Baramati News: शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा! बनावट नियुक्तीपत्र देत 1.36 कोटींची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.